Bengaluru Couple Vulgar stunts On Road Bajaj Pulser Video: रस्त्यात धावत्या बाईकवर रोमान्स करू पाहणाऱ्या प्रेमवीरांची बेजबाबदारी मागील काही काळात वाढतच चालली आहे. दर दोन आठवड्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे या जोडप्यांची इतकी बदनामी होऊन, त्यांना दंड ठोठावूनही इतर जोडपी काहीच धडा घेताना दिसत नाही. उलट नवनवीन प्रकारे व नव्या स्तरावरील अश्लीलता दाखवत स्टंटबाजी केली जात आहे. असाच एक नवा व्हिडीओ सध्या बंगळुरूमधून समोर येत आहे. एका गाडीतून जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या पुढे जाणाऱ्या बाईकवर विचित्र प्रकार घडताना पाहिला व रेकॉर्ड केला होता आणि आता तोच व्हिडीओ स्वतः बंगळुरू पोलिसांनी सुद्धा शेअर करून चेतावणी दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय व पोलिसांनी याबाबात काय कारवाई केलीये याविषयी जाणून घेऊया..

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती बजाज पल्सर 220F गाडी चालवत आहे आणि त्याच्यासमोर एक महिला त्याच्या मांडीवर बसलेली आहे. ती खरंतर इंधनाच्या टाकीवर बसून त्या बाईक चालवणाऱ्या पुरुषाला मिठी मारताना दिसतेय. एकतर हे दोघे उड्डाणपुलावरून प्रचंड वेगाने जात आहेत आणि त्यात आणखी वाईट म्हणजे दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नाही. वाहतुकीच्या नियमांचे असे उल्लंघन करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून तर हे जोडपं मूर्खपणा करत आहेच पण त्यांच्यामुळे जर इतर कुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते दोघे जबाबदारी तरी घेतील का असा प्रश्न या व्हिडीओवर केला जात आहे.

Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
indian railways train viral video woman in moving train act possessesd internet calls it staged
चालत्या ट्रेनमध्ये केस मोकळे ठेवून किंचाळत तरुणींचं विचित्र कृत्य; एकीनं तर हद्दच पार केली, VIDEO पाहून संतापले लोक
Young woman's obscene dance on Marine Drive
निर्लज्जपणाचा कळस! रिल्ससाठी मरिन ड्राइव्हवर तरुणीचा अश्लील डान्स; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “आता मुंबईतही घाण..”
Zepto apologises after man gets almost-expired 10 kg atta.
“८ दिवसात संपवा १० किलो गव्हाचे पीठ”, तक्रार करणाऱ्या ग्राहकाला झेप्टोने दिले हे उत्तर, शेवटी मागितली माफी
The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
funny viral video careless girl falls on train track scotty railway crossing
ट्रेन येणार म्हणून घाईघाईत ओलांडू लागली रेल्वे फाटक तितक्यात…; VIDEO तील तरुणीचे कृत्य पाहून तुम्ही पोट धरून हसाल

व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर, बंगळुरू वाहतूक पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आणि बाइकस्वाराचा शोध घेतला. पोलीस विभागाने आपल्या एक्स हँडलवर या प्रकरणाची माहिती देत सांगितले की सदर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आणि बेपर्वाईने वाहन चालवल्याबद्दल हेब्बल वाहतूक पोलिसांनी व्यक्तीला अटक केली आहे. तरी रोमान्ससाठी वेळ व संधी शोधणाऱ्यांनो एक लक्षात घ्या रस्ता हा स्टंटसाठीचा मंच नाही! सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या जबाबदारीने वाहन चालवा.

बंगळुरू पोलिसांची कारवाई, पाहा Video

अगदी मे महिन्याच्याच सुरुवातीला असाच एक प्रकार छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडल्याचे समोर आले होते. धावत्या बाईकवर अश्लील चाळे करताना स्वतः पोलीस अधीक्षकांनी एक जोडप्याला रंगेहाथ पकडले होते. विनय असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी हायवेवर स्टंट करत होता. एसपी जशपूर शशी मोहन सिंग यांनी त्यांना त्यांच्या कारमधून पाहिले आणि धोकादायक स्टंट करत असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ बनवला आणि मग त्या दोघांवर कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा<< “ती अडल्ट आहे, तिला असं पकडताना तुला..”, द ग्रेट खलीने ‘ज्योती’बरोबर केलेला Video पाहून लोक भडकले; चुकलं तरी काय?

महाराष्ट्रात सुद्धा असे प्रकार काही नवीन नाहीत. एकतर प्रेमाच्या नशेत किंवा दारूच्या नशेत असे अपघात घडूनही अजूनही तरुण पिढीला जात येत नाही हे शोकांतिकाच म्हणावी लागेल. सध्या पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेजबाबदारपणे गाडी चालवून दोघांचा जीव घेतल्याचे प्रकरण ही त्यातलाच एक भाग म्हणता येईल.