तोफखाना भागातील अल्पवयीन मुलीस धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणा-या राकेश यशवंत मंगलारम (वय २८, रा. बागरोजा हडको, नगर) या छायाचित्रकार तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने ६ दिवस (दि. २१) पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला.
मुलगी १४ वर्षांची आहे. राकेशचा नवरंग व्यायामशाळेजवळ फोटो स्टुडिओ आहे. तो त्याने तीन महिन्यांपूर्वी विकला. तेथे मुलगी फोटो काढण्यासाठी पूर्वी आली होती, त्यातून राकेशने तिच्याशी ओळख वाढवली. नंतर तिला व तिच्या घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन राकेश गेले आठ महिने तिच्यावर बलात्कार करत होता, अशी फिर्याद आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक  उबाळे करत आहेत. राकेशला काल रात्रीच अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape of minor girl
First published on: 17-08-2013 at 01:51 IST