अमेरिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत वारणानगर येथील प्रा. डॉ. बाळासाहेब लाडगावकर यांनी ‘एक्स्प्लोरिंग स्पेसेस फॉर लर्निग’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्यामध्ये पर्यावरण व ग्रामीण भागातील उच्च शिक्षणातील ज्वलंत समस्यांचा ऊहापोह करण्यात आला. डॉ. लाडगावकर हे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख आहेत. अमेरिकेतील हायर एज्युकेशन टिचिंग, लर्निग असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सुमारे ५०० शोधनिबंध सादर झाले होते. ५० हून अधिक देशांतील अभ्यासकांना निमंत्रित केले होते. भारतातून डॉ. लाडगावकर हे एकमेव या परिषदेत सहभागी झाले होते. रशिया, अमेरिका येथे शोधनिबंध सादर केल्यानंतर आता त्यांनी चीन, वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल डॉ. लाडगावकर व धनश्री लाडगावकर या उभयतांचा सत्कार सुराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रा. दिनेश पाटील, संदीप इंगळे, नसीर कुरणे आदी उपस्थित होते.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Research paper presented by ladgaonkar
First published on: 05-02-2013 at 08:09 IST