तालुक्यातील लिंगदेव येथे एका शेतक-याच्या घरावर आज पहाटे पडलेल्या दरोडय़ात चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले. घरातील महिलांच्या अंगावरील सुमारे ५५ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले. याआधी िलगदेव येथेच अन्य दोन ठिकाणी दरोडे टाकण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न फसला. िलगदेव परिसरात प्रथमच अशा प्रकारची घटना घडली असून त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिंगदेव गावापासून सुमारे अर्धा किमी अंतरावर असणा-या तुकाराम घोमल यांच्या घरावर आज पहाटे पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. दरवाजाची कडी उघडत घरात प्रवेश केलेल्या चोरटय़ांनी घरातील दोन महिलांच्या गळय़ातील गंठण तसेच पोत असे सोन्याचे दागिने त्यांना मारहाण करत काढून घेतले. चोरटय़ांना प्रतिकार करणारे तुकाराम घोमल व त्यांचा मुलगा राहुल हे दोन जण चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत जखमी झाले. तसेच त्यांची मुलगी आशा हिलाही मारहाण करण्यात आली.
मीराबाई तुकाराम घोमल (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या आधी गावातीलच दीपक सूर्यवंशी तसेच गोपीनाथ आंबरे यांची घरे फोडण्याचाही प्रयत्न चोरटय़ांनी केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर, पोलीस निरीक्षक उत्तमराव शेळके यांनी घटनास्थळाला भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onचोरीRobbery
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery on the farmers house at lingadev
First published on: 01-01-2014 at 01:55 IST