मुंबई पोर्ट ट्रस्टमधील जमिनीवर पुनर्वकिासासाठी केंद्राकडून पावले टाकण्यास सुरुवात झाली असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झापडय़ा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात येत आहेत. माझगाव डॉकजवळ असलेल्या पावडर बंदर या सुमारे हजार झापडय़ा असलेल्या वस्तीला नोटीस बजावण्यात आली असून झोपडय़ा तोडण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिकांकडून या मोहिमेला विरोध होत असला तरी अतिरिक्त कुमक मागवून सर्व झापडय़ा तोडण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे समजते.
शहरातील दक्षिण टोकाची जमीन विकासासाठी उपलब्ध करण्यासाठी गेली काही वष्रे प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारच्या मालकीच्या १८०० एकर जमिनीपकी १४०० एकर जमीन पुनर्वकिासासाठी मोकळी करण्याचा विचार सुरू आहे. शहरातील जागेची अडचण आणि त्यामुळे गगनाला भिडलेले भाव या जागेच्या उपलब्धतेमुळे कमी होऊ शकतील, असा अंदाज आहे. या जमिनीची उपलब्धता व त्याचा होणारा उपयोग यासंदर्भातील अहवालही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. पोर्ट ट्रस्ट जागेसंबंधी कोणताही अधिकृत विकास आराखडा जाहीर करण्यात आला नसला तरी जागा मोकळी करून घेण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार माझगाव डॉकला लागूनच असलेल्या पावडर बंदर, लकडी बंदर, दारूखाना, कोळसा बंदर या वस्त्यांमध्ये कारवाईची सुरुवात होत आहे.