गोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे १६ जानेवारीला ठरणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. याकडे जिल्ह्य़ातील नागरिकांसह भाजप कार्यकर्त्यांंचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत असले तरी पक्षांतर्गत गटबाजीवरून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मोच्रेबांधणी सुरू आहे. या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गोंदिया जिल्हा परिषदेतील भाजपचे २८ सदस्य सहलीला सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेले आहेत. ऐन वेळेवर फाटाफुट होऊ नये, यासाठी निवडणुकीच्या एक दिवसाआधी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचा निर्णय नागपुरातील गडकरी वाडय़ातून घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले.  यामुळे सध्या तरी भाजप कार्यकत्रे संभ्रमात आहेत. अडीच वर्षांआधी अध्यक्षपदासाठी माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे सुपुत्र विजय शिवणकर यांचे नाव चच्रेत पुढे होते, मात्र ऐने वेळेवर विजय शिवणकर यांना डावलून नेतराम कटरे यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. यावेळीही या पदासाठी विजय शिवणकर यांना प्रबळ दावेदार समजण्यात येत असले तरी ऐनवेळी भाजप पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेतील, हे सांगता येणे शक्य नसल्याने विजय शिवणकर यांच्यासोबत असलेले ५ जि.प.सदस्यांचा गट वेगळा फुटू नये म्हणून भाजप पूर्ण खबरदारी घेत आहे.
जिल्ह्य़ातील भाजप वर्तुळात माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांची कामगिरी अत्यंत महत्वाची आहे. या सर्व बाबीला अनुसरून, तसेच पक्षांतर्गत गटबाजी लक्षात घेऊन यावेळी अध्यक्षपदासाठी विजय शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे, मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप यावेळी पुन्हा अध्यक्षपदासाठी मतभेदाला सामोरे जाऊन काही नवीन खेळ खेळणार तर नाही, याकडेही लक्ष लागले आहे. याच निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आमदार नाना पटोले यांच्या गटातून जि.प.चे सदस्य राजेश चतुर यांचेही नाव अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या पदांसाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, मोरेश्वर कटरे, मदन पटले ,भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोवार समाजाची सर्वाधिक मते लक्षात घेता समाजाला आकर्षति करण्यासाठी या समाजालाही प्रतिनिधित्व देण्याची चर्चा सुरू आहे. यातील मदन पटले व मोरेश्वर कटरे यांचा अध्यक्षपदासाठी विचार झाला नाही, तर उपाध्यक्षपदासाठी नक्कीच यापंकी एकाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन्ही पदांची नावे ठरल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतीची नावे ठरणार असली तरी यासाठी ही आतापासून फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे. सभापतीपदासाठी देवरी तालुक्यातील सविता पुराम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील किरण कांबळे, गोरेगाव तालुक्यातील सीता रहांगडाले, देवरी तालुक्यातील शिवसेनेचे एकमेव सदस्य राजेश चांदेवार यांचे नाव पुढे येत आहेत. यांच्यापकीच सभापतीची निवड होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे. सहलीला गेलेले सर्व जि.प.सदस्य आज सायंकाळी नागपूरला पोहोचणार त्यानंतर नागपुरातील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या वाडय़ात गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्व पदांसाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान