संपूर्ण जगात भारत देशाला माता असे संबोधण्यात येते, इतर देशांना कोणी मावशीही म्हणत नाही. देशात स्त्रीचे योगदान मोठे आहे. समाजात स्त्रीचे स्थान उच्च असून त्यांचा आदर करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले. शहरातील गोरक्षनगर येथे स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सिंधुताई व सुनिता पाटील यांचा परिचय फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे यांनी करून दिला. पंचवटीतील अमरधाममध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्या सुनिता पाटील यांचा सिंधुताइंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच फाऊंडेशनच्या वतीने सिंधुताईंचा सत्कार करण्यात येऊन ३२ हजार रुपये देणगी देण्यात आली. स्वत:साठी जगताना अवतीभवती बघा, खूप काही करण्यासारखे आहे. स्त्री ही पुरूषापेक्षा अधिक काम करते. घरातील काम करत स्त्री मोठी होते. मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ आहे. स्त्री सर्व दु:ख आणि थकवा विसरून तुमच्या सेवेला हजर असते, असेही सिंधुताईंनी नमूद केले. यावेळी विविध ओव्या, श्लोक, बहिणाबाईंच्या कविता यांची आपल्या व्याख्यानात पेरणी करीत सिंधुताईंनी श्रोत्यांना भारावून टाकले. दिंडोरीरोड परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onमहिलाWoman
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman having top position in society sindhutai sapkal
First published on: 09-04-2013 at 01:53 IST