मूलभूत विज्ञान शाखांमधील एकात्मिक एम.एस्सी.अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या मूलभूत विज्ञान शाखांमधील संशोधनाला प्राधान्य देण्यासाठी पाच वष्रे कालावधीचा एकात्मिक एम.एस्सी. अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च, भूवनेश्वर आणि डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स) व मुंबई विद्यापीठाने सुरू केला आहे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च
आधुनिक काळाशी सुसंगत संशोधनाचे आव्हान विद्यार्थ्यांना स्वीकारणे शक्य व्हावे अशा पद्धतीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम सत्र पद्धतीचा आहे. हा अभ्यासक्रम लवचिक आणि नावीन्यपूर्ण स्वरूपाचा असून
यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सतत मूल्यमापन आणि विश्लेषण केले जाते.
हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या परिसरातच वसतिगृह उपलब्ध आहे. शास्त्रीय संशोधन आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्मितीकरता अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणकीय व्यवस्था आणि वाचनालय परिसरातच उपलब्ध आहे.

ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!

अर्थसहाय्य : या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवांराना केंद्र सरकारच्या ‘इन्स्पायर शिष्यवृत्ती’अंतर्गत दरमहा ५ हजार रुपये शिष्यवृत्ती व दर वर्षी इतर खर्चासाठी २० हजार रुपये सहाय्य दिले जाते. या अभ्यासक्रमातील जे विद्यार्थी उत्तम गुण मिळवतात त्यांना भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेशासाठी थेट मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाते.

नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट : इंटिग्रेटेड एम.एस्सी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान शाखेत ज्या विद्यार्थ्यांना किमान ६० टक्के गुण मिळाले असतील, ते या परीक्षेला बसू शकतात. राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान गुण ५५ टक्के मिळवणे आवश्यक आहे. ही परीक्षा २८ मे २०१६ रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये घेण्यात येईल. यात पुणे, मुंबई आणि नागपूरचा समावेश आहे. १७ जून २०१६ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
पेपर वस्तुनिष्ठ पद्धतीचा व बहुपर्यायी असेल. यात प्रत्येकी ५० गुणांचे पाच विभाग राहतील. पहिला भाग सर्व उमेदवारांसाठी आवश्यक असा आहे. या भागात निगेटिव्ह गुण नाहीत. उर्वरित चार भाग हे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचे असतात. यांपकी सर्व अथवा कोणतेही तीन विभाग विद्यार्थी सोडवू शकतात. जे विद्यार्थी सर्व विभाग सोडवतील त्यांना ज्या तीन विभागांत सर्वोच्च गुण मिळतील त्यांचा विचार गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी केला जातो. विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन व विश्लेषणात्मक क्षमता तपासण्यासाठी प्रश्नांची रचना केली जाते. चारही विषयांच्या विभागात निगेटिव्ह गुण आहेत. काही प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांमध्ये सर्व अचूक उत्तर दिले जाऊ शकतात. त्यामुळे तशी नोंद उमेदवारांना करावी लागेल.
परीक्षेचा पेपर सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन (CBSE) आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन, रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग (NCERT)च्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित राहील. ऑनलाइन अर्ज करण्याचा संपर्क- द, चीफ कोऑíडनेटर, नेस्ट २०१६, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च, पोस्ट जटनी, जिल्हा- खुर्दा- ७५२०५०, ओरिसा. संकेतस्थळ- http://www.nestexam.in

मुंबई विद्यापीठ, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स)
चाळणी परीक्षेद्वारे निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना कौन्सेलिंगच्या वेळेस चाळणी परीक्षेतील त्यांचे गुण व संस्थेच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला जातो.
पहिल्या दोन सत्रांसाठी म्हणजेच पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सारखाच असतो. तिसऱ्या सत्रापासून स्पेशलायझेशन अभ्यासक्रमाची सुरुवात होते. स्पेशलायझेशन म्हणून घेतलेल्या विषयामुळे विद्यार्थ्यांचे संबंधित विषयातील सद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञान पक्केहोण्यास मदत होते. याशिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान संवाद, इतिहास, विज्ञान- तत्त्वज्ञान, जागतिक साहित्य, पर्यावरणीय आणि ऊर्जा विज्ञान अशा विषयांचा अभ्यास करावा लागतो.
चौथ्या आणि पाचव्या वर्षांत स्पेशलाइज्ड विषयातील प्रगत अभ्यासक्रम शिकावा लागतो. पाचव्या वर्षांत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने संशोधन प्रकल्प पूर्ण करावा लागतो. हा प्रकल्प डॉक्टरल संशोधन स्तरापर्यंत विकसित होऊ शकतो. पाचव्या वर्षांत राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये तसेच महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये उन्हाळी संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी करावेत यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी देश-विदेशातील संशोधकाचा सहभाग असलेल्या चर्चासत्रांचे तसेच मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. पहिले शैक्षणिक सत्र १ ऑगस्ट रोजी सुरू होते. दुसरे सत्र १ जानेवारी रोजी सुरू होते.
संपर्क : मुंबई विद्यापीठ- डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स), हेल्थ सेंटर, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई- ४०००९८.
संकेतस्थळ- cbs.ac.in ईमेल- info@cbs.ac.in

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (NISER)
ही संस्था होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबईशी संलग्न आहे. या संस्थेमार्फत पदवी प्रदान केली जाते. संस्थेतील एकात्मिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एम.एस्सीनंतर पीएच.डी प्रवेशासाठी सहाय्यभूत ठरू शकतो तसेच देश-विदेशांतील नामवंत शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये उत्तम दर्जाचे संशोधन करण्याची संधी मिळू शकते. या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत सर्व शाखांसाठी समान अभ्यासक्रम असतो. दुसऱ्या
वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनच्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय विद्यार्थी अभ्यासक्रमाशी निगडित वा इतर शाखांशी निगडित असलेले काही विषय निवडू शकतात. संस्थेमध्ये विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्ररीत्या विश्लेषण केले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हे विश्लेषण उपयुक्त ठरते. संकेतस्थळ- http://www.niser.ac.in
ई-मेल- director@niser.ac.in

उपलब्ध जागा : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (ठकरएफ) या संस्थेत १३२ आणि मुंबई विद्यापीठ- डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी (सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स) या संस्थेत ४२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. २७ टक्के जागा नॉन क्रिमी लेअर ओबीसी संवर्गासाठी राखीव, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती संवर्ग आणि १५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि ३ टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतात.

हवामान संशोधनविषयक शिष्यवृत्ती
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी या संस्थेत हवामान बदल आणि हवामानाशी संबंधित विविध पलूंचे संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. रिसर्च असोसिएट्सना दरमहा ३६ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो यांना दरमहा २५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. नियमानुसार घरभाडे दिले जाते. संपर्क- डॉ. होमी भाभा रोड, पाषाण पुणे- ४११००८, संकेतस्थळ- http://www.tropmet.res.in/careers

सुरेश वांदिले