अपंग विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिक्षणसंस्था, तेथील उपलब्ध प्रशिक्षणक्रम आणि संबंधित प्रवेशप्रक्रियांची सविस्तर माहिती..

२०११ च्या जनगणनेनुसार आपल्या देशातील शारीरिकदृष्टय़ा अपंग व्यक्तींची संख्या पावणेतीन कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्यांना मूलभूत शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या पाच टक्क्यांच्या आसपास असून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था अत्यल्प आहेत. या संवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षणाच्या संधी व्हावी, याकरता जगद्गुरू रामभद्राचार्य हॅण्डिकॅप्ड युनिव्हर्सटिीची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेत शारीरिकदृष्टय़ा अपंगांना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

जास्तीतजास्त अपंग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी व सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना कार्यरत राहता येईल अशा रीतीने या विद्यापीठ परिसराची रचना करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीचे प्लेसमेंट उपलब्ध व्हावे याकरता संस्थेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतात. अपंग संवर्गाच्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा उद्देशही या संस्थेच्या उभारणीमागे आहे. अपंग विद्यार्थ्यांना सामाजिक, आíथकदृष्टय़ा सक्षम करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी या संस्थेमार्फत प्रयत्न केले जातात. या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे.

या संस्थेमध्ये व्यवस्थापन व वाणिज्य शाखा, अध्यापन शाखा, उपयोजित कला शाखा, व्यावसायिक प्रशिक्षण शाखा, संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान शाखा, संगीत शाखा, मानव्यशास्त्र शाखा, समाजशास्त्र शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत इंग्रजी, संस्कृत, िहदी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक कार्य, इतिहास, संस्कृती आणि पुराणवास्तूशास्त्र, चित्रकला, पेन्टिंग्ज, व्यवस्थापन या विषयांचे शिक्षण दिले जाते.

संस्थेचे अभ्यासक्रम

या विद्यापीठात पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत- बीएड, बीएड- व्हिज्युएली इम्पेअर्ड, बीएड- हिअिरग इम्पेअर्ड, एमएड, बीए, एमए, बॅचलर ऑफ म्युझिक, मास्टर ऑफ म्युझिक, बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, बॅचलर ऑफ फाइन आर्टस्, मास्टर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ फाइन आर्टस्, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फोटोग्राफी अ‍ॅण्ड व्हिडीओ शूटिंग, डिप्लोमा इन हॅण्डमेड पेपर.

प्रवेश प्रक्रिया-  बीएड, बीएड- व्हिज्युएली इम्पेअर्ड, बीएड- हिअिरग इम्पेअर्ड आणि एमएड- या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. इतर सर्व अभ्यासक्रमांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

संस्थेतील सुविधा- व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्णत: विनामूल्य आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्थाही उपलब्ध आहे तसेच निवास व्यवस्थेच्या खर्चातही सवलत दिली जाते.

पत्ता- जगद्गुरू रामभद्राचार्य हॅण्डिकॅप्ड युनिव्हर्सटिी, चित्रकूट, उत्तर प्रदेश. ईमेल- jrhuniversity@yahoo.com

संकेतस्थळ- www.jrhu.com

अपंग प्रशिक्षणाच्या आणखी काही संस्था व अभ्यासक्रम

कटकस्थित स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिहॅबिलिटेशन, ट्रेिनग अ‍ॅण्ड रिसर्च आणि कोलकातास्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑर्थोपेडिकली हॅण्डिकॅप्ड या संस्थांमध्ये पदवीस्तरीय विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर सामायिक प्रवेश चाचणी (सीईटी-२०१६) घेतली जाणार आहे. या दोन्ही संस्था केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण  विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहेत.

सीईटीचे स्वरूप- या चाळणी परीक्षेद्वारे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी), बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक अ‍ॅण्ड ऑर्थोटिक्स, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (ओटी) यांचा समावेश आहे. सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- चार वष्रे आणि सहा महिन्यांची इंटर्नशिप. बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेतलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.

परीक्षा पद्धती :  १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेचे दोन भाग असतात- पहिल्या भागात सामान्य क्षमता व सामान्य ज्ञान यांवर प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या भागात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांवर प्रश्न विचारले जातात. प्रश्न बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला एक गुण दिला जातो.

परीक्षा केंद्रे : ही परीक्षा २६ जुल २०१६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

वसतिगृह : मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आहे. निवासव्यवस्था मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर वसतिगृहातील खोल्यांचे वाटप केले जाते.

अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालये, ग्रामीण भागातील पुनर्वसन केंद्रे, जिल्हा रुग्णालये यामध्ये इंटर्नशिप व विद्यावेतन उपलब्ध होते.

अभ्यासक्रमाचे शुल्क : स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेिनग अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेचे अभ्यासक्रमांचे वार्षिक शुल्क- ३१ हजार ६०० रुपये,

वसतिगृह वार्षिक शुल्क- ८ हजार रुपये.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑर्थोपेडिकली हॅण्डिकॅप्ड संस्थेचे अभ्यासक्रमांचे वार्षिक शुल्क- ३० हजार २०० रुपये, वसतिगृह वार्षिक शुल्क- ८ हजार रुपये.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेिनग अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेच्या मास्टर ऑफ फिजिओथेरपी (अर्हता- बीपीटी/ बी.एस्सी. पीटी) आणि मास्टर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (अर्हता- ओटी/ बी.एस्सी. ओटी) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रस टेस्ट- पीजीईटी- २०१६ ही परीक्षा घेतली जाते.

परीक्षा केंद्रे- भुवनेश्वर, चेन्नई, नवी दिल्ली, गुवाहाटी कोलकाता, मुंबई. गुणवत्ता यादीतील क्रमांक, लेखी विनंती आणि उपलब्ध जागा यांनुसार वसतिगृहातील खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे. वार्षिक शुल्क- २७ हजार ५०० रुपये आणि वार्षिक वसतिगृह शुल्क- ९ हजार ३०० रुपये. परीक्षा- २६ जुल २०१६. दोन्ही परीक्षांना अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ मे २०१६.

संपर्क- स्वामी विवेकानंद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेिनग अ‍ॅण्ड रिसर्च, ओलातूर, पोस्ट ऑफिस बरोई, जिल्हा- कटक. ईमेल- dasvnirtar@gmail.com

संकेतस्थळ- www.svnirtar.nic.in

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑर्थोपेडिकली हॅण्डिकॅप्ड, बी. टी. रोड, बॉन- हुगळी, कोलकाता- ७०००९०.

संकेतस्थळ- www.niohkoi.nic.in

ईमेल- nirtar@nic.in , mail@nioh.nic. mail@nioh.nic.in