किमतीबद्दल अधिक जागरूक असलेली जगातील एक भारतीय बाजारपेठ आहे. देशात सर्वाधिक विकले जाणाऱ्या या कारची किंमत ही १० लाखांच्या खालील आहे. पण म्हणून किमतीबाबत नेहमीच अधिक सजग राहणेही योग्य नाही. यामुळे आपण अन्य वाहनांमध्ये असलेले आकर्षक सुविधा तर नाकारात नाही ना, हेही पाहायला हवे.

रेन सेन्सिंग वायपर्स, रिव्हर्स कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीटसारख्या काही सुविधा अनेक वाहनांमध्ये उपलब्ध होत आहेत. हा. एवढे खरे की अन्य देशांच्या तुलनेत भारतात या सुविधा येथील वाहनांमध्ये काहीशा उशिरानेच उपलब्ध झाल्या. कार पार्क स्वत:हून होण्यासारखे वाहनातील तंत्रज्ञान अद्यापही भारतात कमी किमतीच्या वाहनांमध्ये उपलब्ध नाही. काही प्रमाणात ते महागडय़ा वाहनांमध्ये आहे. तेही तुरळकच. हे मोठय़ा प्रमाणात, अधिक वाहनांमध्ये, कमी किमतीतील वाहनांमध्येही असायला हवे.

पूर्णत: चालकरहित कार ही या दशकातील अनोखी संकल्पना येत्या काही वर्षांमध्ये प्रत्यक्षात येणार आहे. फोर्डने याबाबतची घोषणा केली आहे. यानुसार तिची अशी पहिली कार २०२१ पर्यंत येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही कार रेडिओटॅक्सी म्हणून वापरली जाण्याची शक्यता आहे. यामुळे उबर, लिफ्ट, ओलासारख्यांना स्पर्धा निर्माण होईल.

अशा कारमध्ये स्टिअिरग व्हील, एक्सिलेटर, क्लच किंवा ब्रेक पेडल नसेलही कदाचित. पण एक खरे. ही या क्षेत्रातील एक क्रांती असेल. असे पहिल्यांदाच घडत असेल की वाहनासाठी मुख्य असलेली चालक ही व्यक्तीच बाद ठरणार आहे. वाहनासाठी ही व्यक्ती किती महत्त्वाची आहे, हे तुम्ही जाणताच. पण भविष्यातील वाहन पद्धती/तंत्रज्ञानात तेच नेमके नसेल!

अर्थातच अशी कार ही महाग असेल. भारतात ती पाच वर्षे उशिरा आली तरी किमतीबाबत तिची चर्चा होईलच. एकूणच वाहन क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. हायब्रीडवरून इलेक्ट्रिक कारकडे वळणारा आपला प्रवास आणि आता तर चालकरहित क्रांती म्हणजे आपण अद्ययावत तंत्रज्ञानासाठी सज्ज असल्याचेच चिन्ह! मशीन पुन्हा एकदा माणसाचे महत्त्व कमी करीत आहेत का? यामुळे आता बेरोजगाराची चर्चा कदाचित पुन्हा झडू लागेल..

pranavsonone@gmail.com