हॅचबॅक सेगमेंटमध्ये दिवसेंदिवस नव्या कार येत आहेत. तसेच, कार लाँच होताना नवी फीचर (अमुक एक सेगमेंटमध्ये प्रथमच म्हणजे स्टॅण्डर्ड डय़ुएल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आदी) देण्यात येत आहेत. त्यामुळेच बाजारपेठेतील अधिकाधिक हिस्सा आपल्याकडे कसा राहील, या प्रयत्नात कंपन्या जुन्या कारमध्ये नवी फीचर समाविष्ट करून त्या लाँच करीत आहेत. हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार या मारुती, हय़ुंदाई यांच्या असून, सतत ग्राहकांना नवीन देण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून होत आहे. मारुती सुझुकीने या वर्षी इग्निस लाँच केली तसेच, पुढील काही महिन्यांत स्विफ्ट या कारचे पूर्णपणे नवे मॉडेल लाँच होत आहे. स्पर्धेत आपला हिस्सा कमी होऊ  नये तसेच, नवा ग्राहक आकर्षित होण्यासाठी हय़ुंदाईनेही ग्रॅण्ड आय१०चे नवे मॉडेल लाँच केले आहे. स्टाइल आणि लुक याबाबत इग्निस व ग्रॅण्ड आय१० यांचीच सध्या तुलना करावी लागेल. कारण, सध्याची स्विफ्ट स्टाइप व फीचरबाबतीत तशी जुनी झाली आहे.

इग्निस

The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

मारुती सुझुकीच्या कारच्या डिझाइन, लुक व अपीलमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. ग्राहकांना केवळ उत्पादन न विकता प्रीमियम फील देणारी उत्पादने कंपनी विकत आहे. सियाझ, ब्रेझा या कारकडे पाहिल्यावर मारुती सुझुकीने केलेला बदल दिसून येतो. मारुतीने दहा लाख रुपयांच्या घरातील प्रीमियम फीचर आणि लुक आता हॅचबॅक कारमध्येही आणण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी लाँच झालेली इग्निस याचेच एक उदाहरण म्हणता येईल. कार पाहिल्यावरच प्रीमियम टच दिल्याचे जाणवते.

डिझाइन

डॉलबॉय डिझाइनच्या कार मारुतीकडे असल्या तरी त्या पारंपरिक कारमध्येच गणल्या जातात. तसेच, विकसित देशांमध्ये बहुतेक मॉडेल नाहीत. इग्निस हे ग्लोबल प्रॉडक्ट असल्याने टॉलबॉय असूनही त्याला वेगळा म्हणजे क्रॉसओव्हरचा लुक दिला आहे. त्यामुळेच कार हॅचबॅक असूनही पुढून पाहिल्यावर एसयूव्हीचा फील येतो. तसेच, मागील बाजूनेही कार मोठी वाटते. अन् स्पोर्ट्स लुकही दिला आहे. सध्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये अशी कार उपलब्ध नाही. अर्थात, महिंद्र केयूव्ही १०० उपलब्ध आहे. मात्र, कार डिझाइन अपलिंग नाही. महिंद्रची मिनी एसयूव्ही म्हणून केयूव्ही १०० कडे पाहिले जात असले तरी ते इग्निसच्या डिझाइनपुढे फिके वाटते.

फीचर

इग्निसमध्ये कंपनीने बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच या सेगमेंटमध्ये दिलेल्या आहेत. टॉप एण्ड मॉडेलला हेक्सगोनल लॅम्प (पहिल्यांदाच सेगमेंटमध्ये), डे टाइम एलईडी लाइट दिला आहे. बोनेटमध्ये ग्रिलची रचना एसयूव्हीसारखी आहे. ब्लॅक- बेज इंटिरिअर, इलेक्ट्रॉनिक ओआरव्हीएम्स, क्लायमेट कंट्रोल एसी, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सिलिंड्रिकल डोअर हॅण्डलॅम्पबरोबर सुरक्षिततेसाठी दोन एअरबॅग्स व कर्टन एअर बॅग, एबीएस, एबीडी, चाइल्ड लॉक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, रिअर पार्किंग सेन्सर आदी वैशिष्टय़े (मॉडेलनुसार ती बदलतात) समाविष्ट केली आहेत. टॉप एण्ड व्हेरिएंटमध्ये सर्व वैशिष्टय़े असून, १५ इंचाचे ब्लॅक अलॉय व्हील दिले आहेत. तसेच ब्रेझासारखा डय़ूएल कलरचा पर्याय दिला आहे. कारचे स्टिअर स्पोर्टी फील देते. तसेच डोअर हॅण्डलही मोठे आहे. कारची सीटिंग पोझिशन उंच असल्याने सहजपणे बसता-उतरता येते. उंचीमुळे ड्रायव्हरसाठी दृश्यमानता चांगली आहे. उंची व मागील काच यांच्यामुळे कार रिव्हर्स घेताना थोडी अडचण वाटू शकते. अर्थात, रिअर व्हीह्य़ू कॅमेरा (टॉअ‍ॅण्ड मॉडेल) असल्याने ते जाणवत नाही.

सुरक्षितता

भारतात लाँच केल्या जाणाऱ्या कारना क्रॅशटेस्टिंगचे नियम लागू नाहीत. त्यामुळे अनेकदा थर्ड पार्टी युरोपीय एजन्सीने भारतीय कारची क्रॅशटेस्ट केल्यास त्यातील उणिवा पुढे आल्याची उदाहरणे आपल्यापुढे आहेत. इग्निस ही कार याला अपवाद ठरणारी आहे. भारतात प्रस्तावित असणारे क्रॅशटेस्टचे निकष इग्निस पूर्ण करीत असल्याचा दावा आहे.

केवळ स्पोर्टी लुक देण्यावर भर दिलेला नसून देशातील रस्त्यांची स्थिती तसेच ऑफरोड ड्रायव्हिंग करताना अडचण येऊ नये याचा विचार इग्निसमध्ये केला आहे. कारचा ग्राउंड क्लीअरन्स या सेगमेंटमधील अन्य कारपेक्षा अधिक असून, तो १८० एमएम आहे. या सेगमेंटमधील अन्य कारचा ग्राउंड क्लीअरन्स सरासरी १६५ एमएम आहे.

इंजिन

कारला १.२ लिटरचे पेट्रोल असून, बीएचपी ८४ आहे. चार सिलिंडरचे १.३ लिटरचे डिझेल इंजिन असून, बीएचपी ७४ आहे. ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या (एएमटी) पर्याय पेट्रोल व डिझेल मॉडेलमध्ये आहे. कारच्या पेट्रोल व्हर्जनचे वजन ८६० किलो आणि डिझेल व्हर्जनचे ९६० किलो आहे. त्यामुळे पेट्रोल कारचे मायलेज २०.८९ केएमपील, तर डिझेलचे २६.८० केएमपीएल असल्याचा दावा कंपनीचा आहे. फ्यूएल टँक ३२ लिटरचा आहे. शहरात पेट्रोलचे मायलेज साधार १५-१७ केएमपीएल व डिझेलचे १८-२० केएमपीएल, तर एमएमटी मॉडेलचे मायलेज १३-१५ केएमपीएल मिळू शकते.

  • ग्रॅण्ड आय १०

तीन वर्षांपूर्वी भारतात लाँच झालेल्या ह्य़ुंदाई मोटरची ग्रॅण्ड आय १० ही कार खरी तर स्विफ्टला स्पर्धक आहे. मात्र, किंमत आणि फीचरमुळे इग्निसच याची स्पर्धक आहे. कारण स्विफ्टचे नवे मॉडेल या वर्षी बाजारात येत असून, त्यात खूप मोठे बदल करण्यात आले आहेत. स्पर्धा लक्षात घेऊन ह्य़ुंदाईने ग्रॅण्ड आय १० चे अपग्रेड मॉडेल या वर्षांच्या सुरुवातीस लाँच केले. कारमध्ये बाह्य़ व अंतर्गत बदल करण्यात आले आहेत.

डिझाइन

तरुण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्ल्यूडिक या डिझाइन फिलॉसॉफीशी मिळतेजुळते डिझाइन ग्रॅण्ड आय १० मध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न ह्य़ुंदाईने केला आहे. पहिल्या कारमधील पारंपरिक डिझाइनचे हेडलॅम्प काढून त्या जागी नवे हेडलॅम्प हेक्झागोनल ग्रिल हनीकोंब डिझाइनमध्ये दिले आहेत. फॉगलॅम्पसह एलईडी डे टाइम रनिंग लाइट दिला आहे. तसेच, रूपफरेलचा पर्यायही समाविष्ट केला आहे. कारमध्ये मोठा बदल मागील बाजूस करण्यात आला आहे. रिअर बंपरमध्ये ब्लॅक स्ट्रिपचा अंतर्भाव केला असून, त्यात रिफ्लेक्टर लाइट्स देण्यात आले आहेत. मात्र, रिअर बंपरचा नवा लुक काहींना आवडणार नाही. स्पोर्टी लुकसाठी स्पॉयलर देण्यात आला आहे. टॉपएण्ड मॉडेलमध्ये ऑलॉयव्हील्सचा पर्याय दिला आहे.

इंजिन

पहिल्या मॉडेलमध्ये १.१ लिटरचे डिझेल इंजिन होते आणि नव्या मॉडेलमध्ये १.२ लिटरचे इंजिन असून, बीएचपी वाढून ७४ वर नेण्यात आली आहे. असे असले तरी मायलेज २४.९५ केएमपीएल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पेट्रोल इंजिनमध्ये बदल करण्यात आलेला नसून, ते १.२ लिटरचेच आहे. याचे मायलेज १९.७ केएमपीएल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. तसेच, कंपनीने पेट्रोल मॉडेलमध्ये ऑटोमॅटिकचा पर्याय दिला असून, त्यास ४ स्पीड आहे. शहरात पेट्रोल कारचे मायलेज १४-१५ केएपीएल तर डिझेलचे मायलेज १८-२० केएमपीएल, तर ऑटोमॅटिक व्हर्जनचे मायलेज ११-१३ केएमपीएल मिळू शकते.

इंटिरियर

कंपनीने केबिनमध्ये नवा बदल केला आहे. मात्र, मूळ रचना कायम ठेवली आहे. ब्लॅक-बेज रंगातील इंटिरिअरमुळे कारला प्रीमियम लुक मिळाला आहे. सात इंचाची इन्फोटनमेंट सिस्टीम दिली असून, त्यास फोनही कनेक्ट होतो. तसेच, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलबरोबर रिअर एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. टर्नऑन इंडिकेटर हे ओआरव्हीएममध्ये देण्यात आले आहेत.

सेफ्टी फीचर

रिअर पार्ग कॅमेऱ्यासह असिस्ट करणारे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे आणि त्याचा स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. दोन एअरबॅग देण्यात आलेल्या आहेत.

अन्य वैशिष्टय़े

अन्य कारप्रमाणेच आय १० चा ग्राउंड क्लीअरन्स १६५ एमएम एवढाच आहे. त्यामुळे ऑफरोड वा खडबडीत रस्त्यावर कार जपूनच चालवायला हवी. बूट स्पेस २५६ लिटरची आहे. इग्निसच्या तुलनेत फ्यूएल टँक मोठा असून, त्याची क्षमता ४३ लिटर आहे. बाजारपेठेत या कारला इग्निस, स्विफ्ट, फिगो, टियागो या कारची स्पर्धा आहे. त्यामुळेच कंपनीने नवी फीचर देतानाचा किंमतही स्पर्धक राहील याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे कारची किंमत ४.५८ लाख रुपयांपासून ठेवली आहे.  इग्निसचा लुक पूर्णपणे वेगळा असून. कारचे पोझिशनिंगही मारुती सुझुकीने तसेच केले आहे. या कारची विक्री मारुती सुझुकी डीलशिपमध्ये न होता प्रीमियम सव्‍‌र्हिस देत असलेल्या नेक्सा नेटवर्कतर्फे करण्यात येत आहे. इग्निस ही क्रॉसओव्हर शैलीतील कार आहे. ग्रॅण्ड आय १० ही पारंपरिक हॅचबॅक कार आहे. त्यामुळे हटके डिझाइन असणाऱ्यांसाठी इग्निसचा पर्याय चांगला आहे. तसेच, पारंपरिक कार घेऊ  इच्छिणाऱ्यांनी नवी स्विफ्ट येईपर्यंत थोडे थांबायला हरकत नसावी.

ls.driveit@gmail.com