* माझं बजेट सहा लाख आहे. मासिक ड्रायिव्हग ५००१०००किमी.( सातारा पुणे हायवे प्लस सातारा सिटी..). माझे प्राधान्य सुरक्षेला आहे आणि दुसरे प्राधान्य आरामदायीपणाला आहे. तरी उत्तम सेफ्टी फीचर असलेली कोणती पेट्रोल कार घेऊ?

श्रीकांत पवार

* पेट्रोल कारमध्ये तुम्ही टाटा टियागोचे टॉप मॉडेल घ्यावे. त्यात एबीएस, एअरबॅग्ज वगरे सुविधा आहेत. परंतु अगदी दणकट मॉडेल हवे असेल तर फोक्सवॅगन पोलो घ्या. तिचे बेसिक मॉडेल सहा लाखांत आहे.

 

* मी जानेवारीत अल्टो८०० ही गाडी घेतली. मात्र, तिला फॉग लाइट्स नाहीत. परंतु मे महिन्यात लाँच झालेल्या नव्या अल्टोमध्ये हे फंक्शन आहे. मी ते बदलवून घेऊ शकतो का.

जयेश चौधरी

* हेडलाइट्स अपग्रेड करू नका. तुम्ही बाहेरून फॉग लाइट्स बसवून घेऊ शकता. बम्पर्स न बदलता हे करता येणे अगदी सहजसोपे आहे.

 

* मी पहिल्यांदा गाडी घेत आहे. माझे बजेट लाख आहे. माझी रिनग महिन्याला ५०० किमी असेल. मी कोणती गाडी घेऊ. माझा विचार ती गाडी घेऊ. टियागो, रेडी गो की क्विड योग्य ठरेल. पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेल. कृपया सांगा.

स्वप्निल जाधव, मुंबई

* तीन लाखांत तुम्ही सेकंड हॅण्ड मारुती स्विफ्ट ही गाडी घ्यावी. चार-पाच र्वष वापरलेली स्विफ्ट तुम्हाला सहज मिळू शकेल.
* माझे महिन्याचे रिनग ५०० किमी आहे. आम्ही रोज सातआठ जण अपडाऊन करतो. जास्त मायलेजवाली आणि कमी मेन्टेनन्स असलेली आठ आसनी गाडी सुचवा. तीही डिझेल व्हर्जनमधली.

के. राज

* कमीत कमी किमतीत तुम्ही रेनॉ लॉजी घ्यावी. ही गाडी १८ ते २० किमीचा मायलेज देते आणि व्हॅल्यू फॉर मनी, अशा स्वरूपातली गाडी आहे ही. कम्फर्टच्या दृष्टीने तुम्ही इनोव्हा क्रिस्टा ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी घ्यावी. हिचे मायलेज १५ किमी आहे परंतु खूपच आरामदायी गाडी आहे. शिवाय ऑटोमॅटिक असल्याने तुम्हाला त्रास कमी होईल.

 

* सर, मला पर्यटन व्यवसायासाठी दोन कार घ्यायच्या आहेत. माझे बजेट १५ लाख रुपये आहे. मला एक सात आसनी डिझेल गाडी आणि एक चार आसनी सीएनजी गाडी हवी आहे. चांगला मायलेज, कमी मेन्टेनन्स आणि चांगला पिकअप अशी फीचर्स असलेल्या दोन्ही गाडय़ा असाव्यात. योग्य मार्गदर्शन करावे.

विशाल माने

* सात आसनी गाडय़ांतील सर्वात स्वस्त आणि उत्तम गाडी म्हणजे रेनॉ लॉजी. अवघ्या दहा लाखांत ती उपलब्ध आहे. यात तुम्हाला अगदी जुन्या इनोव्हासारखा फील येईल. परंतु तुमचे बजेट जास्त म्हणजे १६ लाख वगरे असेल तर निश्चितच इनोव्हा उत्तम ठरेल. सीएनजीमधील पर्याय म्हणाल तर तुम्ही मारुती रिट्झ घेऊन तिला सीएनजी कीट बसवू शकता. नाही तर वॅगन आर सीएनजी मॉडेल घ्या.

या सदरासाठी प्रश्न पाठवाls.driveit@gmail.com