* सर, मला ऑटो गीअर गाडी घ्यायची आहे. माझे साप्ताहिक ड्रायिव्हग २५० किमी आहे. कृपया ग्रँड आय१०, फोक्सवॅगन पोलो, निस्सान मायक्रा यांपकी कोणती गाडी घ्यावी हे सांगा. माझे वय ५८ आहे.

दीपक ठुसे

सर्वात दमदार ऑटो गीयर कार म्हणजे निसान मायक्रा. या गाडीत वैशिष्टय़पूर्ण असा सीव्हीटी गीअरबॉक्स आहे. या गीअरबॉक्समार्फत ड्राइव्ह अगदी स्मूथ होते आणि गचके कमी लागतात आणि पॉवर तर तुफान मिळतेच. ती हाय क्वालिटी कार आहे. ती तुम्हाला ६.५० लाखांना ऑनरोड मिळेल आणि मायलेजही ठीक देते; पण कमी किमतीत तुम्ही मारुती सलेरिओ घेऊ शकता. हिचे मायलेजही मायक्रापेक्षा जास्त आहे.

 

* सर, मला कार घ्यायची असून मी मारुती सिआझ किंवा ह्य़ुंडाई वेरनाचा विचार करत आहे. दिवसाला ७० ते ८० कि.मी. वापर होणार आहे. तरी यातील कोणती गाडी योग्य ठरेल?

जयराज कातकर

 तुम्ही नक्कीच डिझेलची मारुती सिआझ घ्यावी. ही गाडी सर्वात प्रशस्त असून तिची किंमत कमी आहे. खास म्हणजे या गाडीत एसएचव्हीएस आहे. या तंत्राने गाडी अध्र्याहून जास्त इलेक्ट्रिक बॅटरी वर चालते आणि मायलेज २७ किमी प्रतिलिटर एवढा मिळतो.

 

* सर, मी फिगो डिझेल कार बुक केली आहे. या गाडीचा मेन्टेनन्स जास्त आहे का? कारण माझे फिरणे खूप कमी आहे.

 – मृणाल राऊत

तुमचे फिरणे दरमहा ८०० किमीपेक्षा जास्त असेल तर डिझेल गाडी परवडते नाही तर पेट्रोल गाडी उत्तम. डिझेल फोर्ड फिगोला १०० पीएस इंजिन आहे. ते सर्वात उत्तम आहे पण तुमचा वापर हायवेवर असेल तरच ती योग्य ठरते.

 

* मला टुरिस्ट बिझनेससाठी मारुती स्विफ्ट डिझायर कार घ्यायची आहे. परंतु मला एक प्रश्न आहे की, या व्यवसायासाठी स्विफ्ट डिझायर चांगली की टोयोटा इनोव्हा क्रिस्टा चांगली. कृपया माझा गोंधळ दूर करा.

अरिवद चव्हाण

स्विफ्ट डिझायर टूर ही गाडी सहा ते सात लाखांत उपलब्ध आहे. परंतु इनोव्हा ही तुम्हाला १७ लाखांना मिळते. बजेट मध्यम असेल तर टोयोटा इटिऑस घ्यावी किंवा रेनॉ लॉजी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com