* आमचे तीन जणांचे कुटुंब आहे. आम्हाला हौसेखातर कार घ्यायची आहे. गाडीचा वापर गरजेपुरताच होईल. आम्हाला जुनी (वापरलेली) कार घ्यायची आहे. माझे बजेट अडीच लाख आहे. तरी आपण योग्य कार सुचवावी. जुनी कार घेताना साधारण किती वर्ष वापरलेली आणी किती किलोमीटर चालवलेली गाडी घ्यावी. कृपया मार्गदर्शन करावे.
– श्रीरंग गणेश गोखले, कल्याण.
* जुनी कार साधारणत तीन ते सहा वष्रे वापरलेली असावी. शिवाय तिचे रिनग ५० हजार किमीपेक्षा जास्त झालेले नसावे. तुम्हाला अडीच लाखांत वॅगन आर व स्विफ्ट या गाडय़ा मिळू शकतील.
* मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझा गाडीचा वापर महिन्याला किमान ५०० ते ७०० किमी आहे. माझे बजेट सात ते नऊ लाख रुपयांपर्यंत असून मला मारुती बालेनो घ्यावीशी वाटते. मी इकोस्पोर्ट व बालेनो यांच्यापकी कोणाला जास्त प्राधान्य द्यावे.
– डॉ. कृष्णा सपाटे
* इकोस्पोर्ट आणि बालेनो या दोन्ही गाडय़ा वेगवेगळ्या मॉडेलमध्ये येतात. तुम्हाला जर छोटय़ा उंचीची गाडी चालत असेल तर तुम्ही हुंदाई आय२० घ्यावी. अन्यथा तुम्ही इकोस्पोर्ट घ्यावी. बालेनो पाच ते सहा लाखांत येते. परंतु तुमचे बजेट नऊ लाख रुपये आहे तर नक्कीच टॉप मॉडेलमधील आय२० एलिट अधिक सोयिस्कर ठरेल.
* सर, माझ्याकडे आय१० मॅग्ना ही २०१४ सालची गाडी आहे. तिचे रिनग दहा हजार किमी झाले आहे. मला आता आय१० एक्स्चेंज करून आय२० एलिट मॅग्ना किंवा स्पोर्ट ही पेट्रोलगाडी घ्यायची आहे. तिची किंमत काय होईल व एलिटचा परफॉर्मन्स कसा आहे.
– केशव कुलकर्णी
* आय२० एलिट ही उत्तम कार आहे. तिचा विचार नक्कीच करा. आय१० मॅग्ना एलपीजीचे तुम्हाला अडीच-तीन लाख येतील.
* आमचे सहा जणांचे कुटुंब आहे. आम्ही नुकतीच मिहद्रा टीयूव्ही ३००ची टेस्ट ड्राइव्ह घेतली. आम्हाला ही गाडी पसंत आहे. आमचे दरदिवशी किमान २० ते ३० किमीचे फिरणे असते. ही गाडी घेणे कितपत योग्य ठरेल.
– सुभाष पांचाळ, लातूर
* ही एक उत्तम अशी एसयूव्ही आहे. तुमच्या कुटुंबासाठी अगदी योग्य आहे. मात्र, शहरातील वापरासाठी ही गाडी योग्य नाही, कारण तिचा आकार मोठा आहे. ही यंदाची सर्वोत्तम एसयूव्ही आहे.
* माझी उंची सहा फूट आहे. मला एसयूव्ही घेण्याची इच्छा आहे. माझे बजेट सहा ते आठ लाख रुपये आहे. कृपया सांगा मी कोणती एसयूव्ही घेऊ.
– गिरीश कुलकर्णी
* सहा ते आठ लाखांत एसयूव्ही येणे थोडे कठीण आहे. तुम्हाला टीयूव्ही ३०० ही गाडी योग्य ठरेल आणि तुम्हाला तुमचे बजेट साडेआठ लाखांपर्यंत वाढवावे लागेल. ती उंच माणसासाठी अगदी योग्य गाडी आहे आणि पॉवरफुल व नवीन डिझाइनची गाडी आहे. थोडक्यात पसा वसूल गाडी आहे. जास्त मायलेजसाठी बघत असाल तर फोर्ड इकोस्पोर्ट घ्यावी.
समीर ओक – ls.driveit@gmail.com