29 September 2020

News Flash

टॉप गीअर : ‘यामाहा आर१५’ रेसिंगचा भारतीय डीएनए

परफॉर्मन्स मोटरसायकलमध्ये स्पोर्ट्स सेगमेंट फूलफेअरिंगच्या मोटरसायकलना मागणी वाढत आहे.

‘यामाहा आर१५’

 

यामाहा कंपनीला आरएक्स १०० नंतर खरी ओळख मिळाली ती म्हणजे परफॉर्मन्स वा अर्बन स्पोर्ट्स मोटरसायकलमुळेच. कारण, शंभर सीसीच्या मोटरसायकलच्या बाजारपेठेत कंपनीला यश मिळालेले नाही. मात्र, याची उणीव कंपनीने दीडशे व त्यापेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकल सेगमेंटमध्ये भरून काढली आहे. कारण, यामाहाचा मुळातच मोटरसायकलचा डीएनए हा रेसिंगचा आहे कम्युटिंग मोटरसायकलचा नाही. भारतीय बाजारपेठेत कंपनीने या दोन्हींचा मेळ घातला असून, त्यात यश मिळाले आहे. कंपनीच्या एफझेड मोटरसायकलला नेकेड स्पोर्ट्स मोटरसायकलमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळेच कंपनीने ग्राहकांची आवड लक्षात घेऊन या सेगमेंटवर म्हणजे परफॉर्मन्स मोटरसायकलवर लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते.

परफॉर्मन्स मोटरसायकलमध्ये स्पोर्ट्स सेगमेंट फूलफेअरिंगच्या मोटरसायकलना मागणी वाढत आहे. यामागे कारणेही आहेत. आपल्याकडे वीकेण्ड रायडिंग वाढत असून, स्टाइल स्टेटमेंटसाठी अशा मोटरसायकल घेतल्या जात आहेत. या मोटरसायकलची किंमत साधारण १.२० लाख ते १.५० लाख रुपयांदरम्यान आहे.

यामाहने या सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या आर१५ मोटरसायकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्थात, सुरुवातीच्या मॉडेलमध्ये असणाऱ्या त्रुटी कंपनीने दूर करून आर१५ व्हर्जन २.0 लाँच केले आहे. ही मोटरसायकल कंपनीच्या जागतिक पातळीवर असणाऱ्या स्पोर्ट्स मोटरसायकलसारखी आहे. भारतीय बाजारपेठ, क्रयशक्ती लक्षात घेऊन सादर केलेले हे रेसिंग मोटरसायकलचे मिनी व्हर्जनच आहे.

नव्या मॉडेलमध्ये मोठा बदल म्हणजे पुढील आणि मागील चाकाची रुंदी वाढविली आहेत. तसेच, अ‍ॅल्युमिनियम स्विंग आर्म दिला आहे. यामुळे मोटरसायकलची रोड ग्रिप सुधारली आहे.

आर१५ ला १५० सीसीचे इंजिन असून, १७ पीएस क्षमता आहे. बाजारपेठेत या सेगमेंटमध्ये असलेल्या फूल फेअिरग मोटरसायकलमध्ये ही सर्वात कमी ताकदीची मोटरसायकल आहे. अन्य मोटरसायकल १८ पीएसपेक्षा अधिक आहेत. आर१५ ला सिंगल सिलिंडरबरोबर फ्यूएल इंजेक्शनप्रणाली दिली आहे. फीचरच्या बाबतीतही आर१५ मध्ये बरेच काही देण्यात आले आहे. सेमी डिजिटल इन्स्ट्रमेंट कन्सोल असली तरी आकर्षक आहे. यावरील आकडेवारी ठळकपणे दिसावी यासाठी मूनलाइटचा कन्सोल केलेला आहे. रिअर सीटर फूटरेस्टमुळे मोटरसायकलमध्ये एक माचो लुक दिसतो. तसेच, याचा मेळ स्पोर्टी रायडिंग पोझिशनमध्ये घातला आहे. पीलन रायडरची सीट ही मोटरसायकल चालविणाऱ्यापेक्षा उंच आहे आणि फारसे कुशनिंग नाही. त्यामुळे लाँग ड्राइव्हला गेल्यास मागे बसणाऱ्याला आराम मिळत नाही. तसेच, पीलन रायडरला मागे धरण्यासाठी हॅण्डल दिलेले नाही. त्यामुळे सावधच वा मोटरसायकलचालकाला धरूनच बसावे लागते. अर्थात, या मोटरसायकलचा डीएनए रेसिंगपासून प्रेरणा घेणार आहे. त्यामुळे पीलन रायडरचा विचार केला जावा, असा आपण विचार करणे चुकीचे आहे.

सस्पेन्शनच्या बाबतही यामाहाच्या मोटरसायकल चांगल्या आहेत. पुढील बाजूने टेलिस्कोपिक व मागील बाजूने मोनो शॉप सस्पेन्शन दिले आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी पुढील व मागील चाकास डिस्कब्रेक्स आहे. मात्र, कंपनीने एबीएस (अँटी ब्रेकिंग सिस्टीम)चा पर्याय या मोटरसायकलला दिला पाहिजे आणि ही उणीव जाणवते. टेलिस्कोपिकबरोबर मोनो शॉक सस्पेन्स देण्यात आले आहे आणि ते चांगले आहेत. दीडशे सीसीचे इंजिन पिकअला कमी असले तरी स्मूथ आहे. मोटरसायकल प्रति लिटर ३०-३५ किमी मायलेज देऊ  शकते.

अशी मोटरसायकल ही नक्कीच शहरात म्हणजे गर्दीच्या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी नाही, असे वाटते. कारण हायवेवर एक सतत स्पीड मिळत असल्याने या मोटरसायकलची मजा कळू शकते. तसेच, एरोडायनामिक डिझाइन असल्यामुळे हवेचा दबाव कमी जाणवतो. लाँग ड्राइव्ह सिंगल रायडिंगचा अनुभव चांगला मिळू शकतो. यामाहाच्या मोटरसायकली मेंटेनन्स कॉस्ट हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळेच अ‍ॅव्हरेज, कॉस्ट ऑफ ओनरशिप, रिसेल व्हॅल्यू यांचा विचार नक्की करा.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:13 am

Web Title: yamaha r15 racing bike
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 स्वयंचलित कार.. भविष्य काय?
3 टॉप गीअर : ‘यामाहा’ला ‘एफझेड’चे बळ
Just Now!
X