डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“ काका, बरं झालं तुम्ही आलात. मला आणि अक्षयला तुमच्याशी बोलायचंच होतं. बाबांचा आताच डोळा लागलाय. थोडी त्यांची विश्रांती होऊ देत, तोपर्यंत आपण बोलूया का?”

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

जोशी काका मित्राला भेटायला म्हणून आले होते, पण अपर्णाचं बोलणं ऐकून ते विचार करू लागले, अविनाशच्या सुनेला, अपर्णाला नक्की काय बोलायचं असेल? त्यांनी मनातले विचार बाजूला सारले आणि ऐकू लागले. “काका, सध्या बाबा दिवसातल्या २४ तासांपैकी जवळजवळ २० तास मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. सध्या त्यांची झोपही कमी झाली आहे, रात्री ते बराच वेळ जागे असतात. साधारणपणे ३ ते ४ तास त्यांची झोप होत असेल, बाकी सर्व वेळ त्यांच्या डोळ्यासमोर स्क्रीन असतोच. जेवायला बसले तरी युट्यूब चालूच असतं. व्हाट्सॲपवर फॉरवर्ड झालेले एकूण एक व्हिडिओ बघतात आणि सर्वांना काही ना काही फॉरवर्ड करीत राहतात. युट्यूब वरील प्रत्येक चॅनेलचं राशी भविष्य बघितल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. घरातील वर्तमानपत्र त्यांनी बंद केलं आहे, ऑनलाइन पेपरमध्ये बातम्या वाचता येतात, असं ते म्हणतात. इतके दिवस आम्ही याबद्दल काहीच बोललो नाही, पण कालपासून घरातील वाय-फाय बंद झाला आहे, आणि त्यांच्या मोबाईलवर नेट पॅक टाकलेला नाही त्यामुळं ते अगदी बेचैन झाले आहेत. अक्षयकडून हॉटस्पॉट घेऊन काहीवेळ त्यांचा मोबाईल त्यांनी सुरू करून घेतला, तेव्हा कुठे त्यांचं जेवण झालं. सकाळी तर ते भयंकर चिडले आणि अगदी सैरभैर झाले. मुलांना रागावून गप्प बसवता येतं, पण यांना कसं समजावून सांगणार? ते स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत, त्यांचं हे व्यसन कसं सोडवायचं?”

हेही वाचा… एकेकाळी केवळ ५० पैशांमध्ये केली चहाची विक्री; आज कमवतात दिवसाला २ लाख रुपये; कोण आहेत….

अपर्णा हे बोलत असतानाच अक्षयही तिथं आला, त्यानंही बाबांच्या या सवयीबाबत सांगितलं. जोशीकाकांनी सर्व ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, “अक्षय आणि अपर्णा, तुमचं म्हणणं आणि तुमची व्यथा मला समजली. सोशलमीडियावर ज्येष्ठांची संख्या वाढत आहे आणि अनेक जणांना हे व्यसन जडलं आहे, हेही खरं आहे. ज्येष्ठांनी आपली दिनचर्या ठरवून घेऊन आपल्या छंदामध्ये मन रमवावं, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावं, समवयस्क लोकांमध्ये मिसळून आपला वेळ घालवावा, आवडीच्या पुस्तकांचे ग्रंथांचे वाचन करावे यासाठीच आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाने काही उपक्रम हाती घ्यायचे ठरवले आहे. नवीन वर्षाचा तोच उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. पण अविनाशनं अलीकडे आमच्या निवृत्त लोकांच्या ग्रुप मध्ये येणंही बंद केलं, तेव्हाच या गोष्टी आमच्या लक्षात आल्या होत्या. तो सोशल साईटवर किती ॲक्टिव्ह आहे हेही मी पाहत होतो, म्हणूनच आज त्याला भेटायचं ठरवलं होतं. अविनाशचं मन वळवून मी नक्की या व्यसनातून त्याला बाहेर काढेन, पण मला तुमच्याशीही काही गोष्टी बोलायच्या आहेत. घरातील निवृत्त व्यक्तींना काहीच काम नाही असं समजून, तुम्ही त्यांच्यावर काम लादता का, हेही तुम्ही विचार करून पाहिलं पाहिजे. घरात थांबून तुमची ऑनलाइन खरेदीची पार्सलं घ्यायची काम त्यांनीच करावीत, घरातील मोलकरणी तुमच्या वेळेत येत नाहीत,म्हणून घरात थांबून त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करून घ्यावीत, मुलांच्या शाळा-कॉलेजमधून घरी येण्याच्या वेळा त्यांनीच संभाळाव्यात, हे तुम्ही गृहीत धरता आणि त्यांनी बिनबोभाट हे सर्व करावं याची अपेक्षा ठेवता, त्यांना त्यांच्या वेळेला घरातून बाहेर पडता येत नाही, त्यामुळं त्यांचा सामाजिक संपर्क कमी झाला की घरबसल्या ते सोशल मीडियाच्या आहारी जातात. त्यांनाही त्यांचा वेळ देणं, त्याचं स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे, त्यांना काहीच कामं नाहीत असं समजून त्यांना गृहीत धरू नका. आतापर्यंत नोकरी,संसार,मुलांचं करिअर यासाठी त्यांनी वेळ दिला आहे, म्हणून त्यांचं स्वतःसाठी जगणं राहून गेलं आहे, ते त्यांना करता यायला हवं हेही लक्षात घ्या.”

हेही वाचा… ‘जावई माझा भला ’ महेंद्रसिंग धोनीने बायको अन् सासूलाच बनवले ८०० कोटींच्या कंपनीचे सीईओ

जोशीकाका बरंच काही बोलत होते आणि अक्षय व अपर्णा त्याच्यावर विचार करत होते. बाबाचं मोबाईल व्यसन वाढण्यासाठी आपणही काहीअंशी जबाबदार आहोत. आपण आपल्या नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडतो, पण घरातील सर्व बाजू बाबा सांभाळतात. त्यांनाही त्यांचा वेळ द्यायला हवा, त्यांचा सामाजिक संपर्क टिकायला हवा हे दोघांच्याही लक्षात आलं. आणि यापुढे बाबांना गृहीत न घरता त्यांनाही त्यांची ‘स्पेस’ द्यायची हे त्यांनी नक्की केलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com