गेल्या काही वर्षांत महिला कर्मचाऱ्यांची संख्या झापाट्याने वाढतेय. सर्वच क्षेत्रात महिलांनी करिअरला सुरुवात केल्याने मोठ्या पदांवरही त्यांनी प्रगती केली आहे. परंतु, जगभरात फार कमी कंपन्या आहेत जिथे स्त्री पुरुष समानता मानली जाते. तसंच, स्त्री पुरुष समानता असलेल्या संस्थांमध्ये महिला अधिक खुलेपणाने, प्रामाणिकपणाने आणि उत्साहाने काम करतात, असं डिलॉइट विमेन अॅट वर्क सर्व्हेतून समोर आलं आहे.

जगभरातील फार कमी कंपन्यांमध्ये लैंगिक समानता पाहायला मिळते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी फक्त सहा टक्के महिला लैंगिक समानता असलेल्या संस्थांमध्ये कार्यरत होत्या. अशा कंपन्यांमध्ये महिलांना अधिक सुरक्षित वाटतं. तसंच, कामाच्या ठिकाणी त्यांच्या मानसिक आरोग्यही जपलं जातं. तिथे त्यांना शक्य तितका अधिक आरामही मिळतो.

महिला अधिक प्रामाणिक आणि निष्ठेने कार्य करतात

लैंगिक समानता असलेल्या कंपन्यांमध्ये महिला अधिक लवचिकपणे कार्य करू शकतात. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावर होतो. अशा संस्थांमध्ये महिला अधिक प्रामाणिक आणि निष्ठेने कार्य करतात. परिणामी उच्च दर्जाचं काम त्यांच्या हातून घडतं.

महिलांच्या करिअरला मिळते दिशा

अशा संस्थांमधील महिला कर्मचारी करिअरबाबत अधिक आशावादी आणि अनुभवी असतात. अशा संस्थांमध्ये वरिष्ठांकडून अयोग्य वर्तन, टीकाटिप्पणी मिळत नाही. तसंच, अशा वातावरणात त्या मानसिक दडपणापासून दूर राहतात. परिणामी महिला या कंपन्यांमध्ये अधिकवेळ कार्यरत राहतात. अशा कंपन्यांतील महिला सहसा कंपनी बदलण्याचा विचार करत नाहीत. जवळपास ६२ टक्के महिला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ संबंधित कंपनीत राहतात. लैंगिक समानता असलेल्या कंपन्यांमध्ये ९२ टक्के महिलांना खात्री असते की त्यांना या कंपनीत चांगल्या पदावर बढती मिळू शकेल.

तर, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी २१ टक्के महिला लैंगिक समानता कमी असलेल्या कंपन्यांमध्ये आणि उर्वरित महिला लैंगिक समानता नसलेल्या कंपनीत कार्यरत आहेत.

लैंगिंक समानता असलेल्या आणि नसलेल्या कंपनीत फरक काय?

कंपन्यांप्रती निष्ठाकामाची क्वालिटीशारीरिक आणि मानसिक आरोग्यकामाच्या ठिकाणी प्रोत्साहनकामात आपलेपणाची भावना
लैंगिक समानता असलेल्या कंपन्या७६ टक्के ७५ टक्के७४ टक्के७१ टक्के७१ टक्के
लैंगिक समानता नसलेल्या कंपन्या२६ टक्के२५ टक्के२१ टक्के२२ टक्के२० टक्के