दिल्लीस्थित फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर आपल्या फॅशन डिझाईनिंगचे कौशल्य दाखवणाऱ्या या तरुणीने चक्क कान्स २०२४च्या रेडकार्पेटवर पदार्पण केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेड कार्पेटवर पदार्पण करण्यासाठी या तरुणीने स्वत:च सुंदर गाऊन शिवला आहे. एक नवोदित कलाकार म्हणून ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर पाऊल टाकण्याची संधी नॅन्सीला मिळाली आहे.

नॅन्सी, ज्याने तिचा कान्स पदार्पणसाठी गाऊन स्वत: तयार केला आहे. हा ड्रेस तयार करण्यासाठी तिला जवळपास ३० दिवस लागले. २०० किलोपेक्षा जास्त वजनाचा गुलाबी गाऊन बनवण्यासाठी नॅन्सीने साधरण १००० मीटर फॅब्रिकचा वापर केला आहे. या गाऊनसह तिने गळ्यात सुंदर नेकलेस परिधान केला होता आणि हलका मेकअप केला होता. गुलाबी लिपस्टिक देखील लावली होती. तिचा संपूर्ण लूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
married bachelor marathi news
समुपदेशन : तुम्ही मॅरीड बॅचलर आहात?
akshay kumar recent interview with shikhar dhawan he talk about his wife Twinkle khanna
‘मी ‘गधामजुरी’ करतो… ती ‘दिमागवाली’!’
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
Pune porsche accident, Pune porsche car accident latest updates
पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे?

“प्रवास खूप मोठा होता, परंतु प्रत्येक क्षण मोलाचा होता. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आनंदाने आणि कृतज्ञतेने भारावून गेले आहे. हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे, आणि मला आशा आहे की, माझ्या निर्मितीने तुम्हाला चकित केले आहे कारण तुमच्या पाठिंब्याने मला प्रेरणा दिली आहे. मनापासून धन्यवाद,” असे नॅन्सीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे

हेही वाचा – बायकोच्या ‘या’ सल्ल्यामुळे, Google चे सीईओ आज दिवसाला कमवतात तब्ब्ल पाच कोटी रुपये! पाहा

कान्स 2024 च्या रेड कार्पेटवरील नॅन्सीचे फोटो येथे पहा:

निःसंशयपणे, नॅन्सीला तिच्या ग्लॅमरस कान्स पदार्पणासाठी तिच्या Instagram चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.

हेही वाचा – १०१ व्या वर्षीही शिकवतात योग प्रयोग; फ्रेंच शिक्षिकेचा भारताकडून पद्मश्री पुरस्काराने गौरव

कोण आहे ही नॅन्सी?

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा गावात जन्मलेली आणि वाढलेली नॅन्सी कोविड-१९ साथीच्या आजारापूर्वी दिल्लीत स्थलांतरित झाली. लॉकडाऊन दरम्यान, नॅन्सीने उच्च-फॅशन कॉउचरच्या प्रभावामुळे तिने अद्विती आणि डिझाइन स्वत: तयार केल्या. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच तिला भरपूर लोकप्रियता मिळाली. नॅन्सी स्थानिक बाजारपेठेतून मिळवलेल्या कच्च्या मालापासून संपूर्ण ड्रेस तयार करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या व्हिडीओमध्ये दाखवते. नॅन्सीचे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात. इंस्टाग्रामवर नॅन्सी त्यागीचे ८५४ हजार फॉलोअर्स आहेत. आज कान्स रेड कार्पेटवर पदार्पण करून नॅन्सीने आपल्या करिअरमध्ये प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.