सणावाराला बहुतेक स्त्रिया, मुली आवर्जून साड्या नेसतात. मात्र तुम्हाला नेहमी साडी नेसण्याची सवय नसेल, तर साडीच्या आत पेटिकोट (परकर) कोणत्या प्रकारचा आणि कसा घालायचा ही तुमच्यासाठी समस्या असू शकते. बहुसंख्य स्त्रिया रोज नेसायच्या साड्यांच्या आत कॉटनचा, अनेक कळ्यांचा आणि नाडी असलेला पेटिकोट घालतात. पण तरुणींना अर्थातच हे पेटिकोट आवडत नाहीत. असे अनेक कळ्यांचे पेटिकोट घातल्यावर आम्ही आहोत त्यापेक्षा उगाच जाड दिसतो किंवा त्यावर साडी चांगली चापूनचोपून नेसता येत नाही, अशी पुष्कळ जणींची तक्रार असते. त्यावर मग गेल्या काही वर्षांत साडीच्या पेटिकोटमध्ये कित्येक प्रकार निघाले. कॉटनचेच कमी कळ्यांचे, सॅटिन किंवा होजिअरी कापडाचे पेटिकोट मिळू लागले. खास साड्यांसाठीचे शेपवेअर्सही आले. यातलं काहीही वापरलं, तरी साडी सर्वोत्तम नेसली जावी यासाठी काही साध्या टिप्स फॅशन जगतातली मंडळी पूर्वीपासून वारंवार देत आली आहेत. त्या या लेखात पाहू या.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन: आयुष्यातली पहिली स्त्री महत्त्वाचीच

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

पेटिकोट/ परकर आधी घालून वावरून पाहा

(छायाचित्र सौजन्य – स्टाइलबायमी- इन्स्टाग्राम)


तुम्ही कॉटनचा पेटिकोट वापरा किंवा शेपवेअर. ते आधी घालून किमान काही मिनिटं तरी त्यात वावरून पाहाणं फार आवश्यक आहे. आपण साडी नेसल्यावर आपल्याला थोडंतरी वावरावं लागतं. साडी नेसून तुम्ही घरातलं काम करणार नसाल, तरी किमान मिरवण्यासाठीही तुम्ही ‘कंफर्टेबल’ असणं आवश्यक आहे. त्याची तुम्हाला तेव्हाच खात्री पटेल, जेव्हा पेटिकोट कंफर्टेबल आहे हे तुम्हाला माहित असेल. अती भोंगळ वा अतीघट्ट फिटिंगचा किंवा अतीपातळ वा अतीजाड कापडाचा पेटिकोट त्रासदायक ठरू शकतो.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

पेटिकोटच्या उंचीत वरून दुमडादुमडी नको!

(छायाचित्र सौजन्य – करिश्मा कपूर, सब्यसाची, तान्या घावरी/ इन्स्टाग्राम | डिझाईन – गार्गी सिंग)

अनेक जणींच्या हा मुद्दा लक्षातच येत नाही! पण सणसमारंभ वा लग्नांना साड्या नेसवून देणारी तज्ञ मंडळी मात्र तो आवर्जून लक्षात आणून देतात. पेटिकोट कोणताही घ्या, पण तो खरेदी केल्यावर आपल्या उंचीनुसार त्याची उंची तपासणं आवश्यक आहे. तुमची उंची कमी असेल, तर पेटिकोट पावलाच्या खाली पोहोचेल आणि त्याची उंची कमी करून घ्यावी लागेल. खूप जणी साडी नेसल्यावर हील्स घालतात. त्यामुळे तुम्ही साडीवर ज्या प्रकारच्या चपला घालणार असाल त्या घालून पेटीकोट अंगाला लावून पाहा. त्याची उंची साडी नेसल्यावर साडीच्या होणाऱ्या उंचीपेक्षा काहीशी कमी ठेवायला हवी. खूप जणी आयत्या वेळी यावर उपाय म्हणून पेटिकोट वरून दुमडतात. पण त्यामुळे कमरेभोवती निष्कारण पेटिकोटच्या कापडाचे अधिक वेढे येऊन साडीचं फिटिंग चांगलं होत नाही.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप – पप्पांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय…

पेटिकोटमध्येही ‘मिक्स अँड मॅच’!
पूर्वी साड्यांवर परकर खरेदी करताना आपण ती साडी दुकानात घेऊन जात असू आणि त्याला ‘परफेक्ट’ मॅच होईल असाच पेटिकोट निवडत असू. आता मात्र साडीतज्ञ मंडळी काही वेगळा सल्ला देतात. हल्ली पेटिकोटमध्येही ‘मिक्स अँड मॅच’ हा प्रकार चालतो. म्हणजे पेटिकोटचा रंग साडीला अगदी मॅचिंगच असला पाहिजे असं मुळीच नाही. साडी किती जाड किंवा किती पातळ किंवा किती ‘शिअर’ आहे, यावर ही गोष्ट अवलंबून आहे. काही वेळा साडीच्या बेस कलरपेक्षा थोडा गडद, थोडा जास्त फिका किंवा काही वेळा जरा वेगळ्या रंगाचा फेटिकोटसुद्धा साडीचं सौंदर्य खुलवतो.

आणखी वाचा : कौतुकास्पद! २६ वर्षांची तरुणी झाली स्वीडनच्या क्लायमेट खात्याची मंत्री; जाणून घ्या रोमिना पौर्मोख्तरी आहे तरी कोण?

साडी पेटिकोटमधले विविध प्रकार

ए-लाईन पेटिकोट
नेहमी स्त्रिया वापरतात तो साडी पेटिकोट म्हणजे ‘ए लाईन’ पेटिकोट. नावाप्रमाणे त्याचा आकार साध्या ए-लाईन स्कर्टसारखा असतो. त्यात चार-सहा-आठ अशा कळ्यांचे पेटिकोट मिळतात आणि त्याला वर बांधायला नाडी असते. या पेटिकोटमध्ये वावरणं, चालणं, दुचाकी चालवणं, घरातली कामं करणं अधिक सोपं होतं, कारण पाय मोकळे राहातात.

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

फिश कट पेटिकोट
याला ‘मरमेड पेटिकोट’सुद्धा म्हणतात. हा पेटिकोट अगदी अंगाबरोबर बसतो आणि खाली पावलांपाशीही त्याचा घोळ फारसा जास्त नसतो. त्यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा जरा बारीक वाटता. यातल्या बहुतेक पेटिकोटस् ना नाडीच्या ऐवजी वरती हूक आणि झिप (चेन) असते. यात वावरताना फार मोठ्या ढांगा टाकणं शक्य नसतं. त्यामुळे यातल्या काही पेटिकोटस् ना खाली घेराच्या ठिकाणी स्लिट दिलेली असते, जेणे करून चालणं सोपं व्हावं.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : असुरक्षित सेक्सचे धोकेच अधिक

लेअर्ड पेटिकोट
या पेटिकोटचं डिझाईनसुद्धा फिश कटसारखंच असतं, पण गुडघ्याच्या खाली त्याला घागऱ्यासारखा घेर दिलेला असतो, जेणेकरून वरून शेपवेअरसारखा इफेक्ट मिळतो आणि खाली साडीच्या घेराला थोडासा ‘फ्लेअर्ड इफेक्ट’ मिळतो.

प्युअर कॉटन, सॅटिन, होजिअरी, क्रेप, ब्लेंडेड अशा विविध कापडांचे पेटिकोटस् मिळतात. यातला कॉटनचा पेटिकोट अर्थातच सर्वांत कंफर्टेबल. मात्र तुमच्या साडीचा पोत कसा आहे त्यावरून तुम्ही पेटिकोटची निवड करू शकता.

हे वाचल्यावर पेटिकोट ही गोष्ट वाटते तेवढी क्षुल्लक किंवा दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट निश्चितच नाही, हे तुमच्या लक्षात आलं असेल! आपला कंफर्ट आणि आपल्याला रुचणारी फॅशन पाहून आधीच योग्य पेटिकोट निवडून ठेवलात, तर या दिवाळीत तुम्हाला साड्या नेसून छान तयार होणं आणि मिरवणं आणखी सोपं होईल.