मनाली आणि निधी शाळेपासून आता मास्टर्सपर्यंतच्या घट्ट मैत्रिणी. त्यामुळे, निधी न कळवता अचानक आली, तेव्हाच बाईसाहेब घरात भांडण करून आल्यात हे मनालीनं ओळखलं. आल्याआल्या निधी सुरूच झाली.

“माझ्या आजीचं काय करू गं, तिला माझं काहीच आवडत नाही. येताजाता माझ्या कपड्यांवर कॉमेंट, घरी उशीरा येण्याबद्दल टोमणे, रात्रीच्या शोला मित्रपण सोबत असतील तर आईबाबांना चालतं, पण आजीनं कटकट केल्यावर तेही मला बोलतात. शिवाय तोंडी लावायला ‘आता लग्नाचं बघायला हवं’ हे असतंच. आजकाल तर मी आजीशी बोलणंच सोडलंय.” निधी हताशपणे म्हणाली.

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
posthumous organ donation of two women gave life to four people
शेतात राबणाऱ्या ‘त्या’ दोघींच्या मरणोत्तर अवयवदानातून चौघांना जीवनदान
nashik ex soldier fraud marathi news
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

“आजीवर एवढा राग कशाला? कधी समजावून सांगायचं, कधी सोडून द्यायचं आणि कधीतरी भांडायचं.” मनाली सहजपणे म्हणाली.

“तिची बडबड सुरू झाली, की डोक्यातच जाते ती हल्ली. मग मला नाही समजावून सांगता येत. तुझी नाही का घरच्यांशी भांडणं होत?”

“ होतात की. कधीकधी खूप राग येतो, पण माझ्या कुणी डोक्यात जात नाही. आजी तर मला आवडतेच. फक्त तिच्या काही गोष्टी आवडत नाहीत, तशाच तिलाही माझ्या काही आवडत नाहीत.”

हेही वाचा… हॉकीवाली सरपंच!

तेवढ्यात दारावर टकटक करत मनालीची आजी आत आली. “कशी आहेस निधी? बऱ्याच दिवसांनी आलीस. बेसनाचे लाडू आवडतात ना, घ्या दोघी.” डिश घेत मनालीनं लाडानं आजीच्या गळ्यात हात टाकला. आजी गेल्यावर निधी म्हणाली,

“किती छान बोलता तुम्ही दोघी. माझीही आजीशी लहानपणी खूप दोस्ती होती. पण हल्ली वाद नाहीतर अबोला. चेंज म्हणून आई-बाबांशीपण वादविवाद असतात मधून मधून.”

“अगं, माझं एकदा आजीशी खूप मोठं भांडण झालं. ‘आज्जी टाइप’चं ती कायकाय बोलली, मग मीही उलटून भांडले. त्यानं ती खूप दुखावली, माझ्याशी बोलणंच टाकलं. त्याचा खूप त्रास झाला मला. आजीला दुखवायचा उद्देश नव्हता, पण रागाच्या भरात झालं खरं.”

“माझंही असंच होतं.” निधी म्हणाली.

“त्या दिवशी मी शांतपणे विचार केला. लक्षात आलं, की आजीवरचे संस्कार तिच्या आईने केलेले, आणि थोडे आजीच्या स्वत:च्या काळातले, म्हणजे साठ-सत्तर वर्षांपूर्वीचे जुने आहेत. तिथून आजच्या जगाकडे, तेही घरात राहून बघताना, तिला बाहेरच्या जगातल्या अनोळखी गोष्टींची धास्ती वाटत असणार. तिच्या दृष्टीनं मी अजूनही लहानच आहे. मला कुणीतरी फसवेल, लोक माझ्याबद्दल वाईट बोलतील याची काळजी, भीती वाटत असणार.”

हेही वाचा… आत्या, मामा, काका, ही नाती गायब होतील का?

“खरंच गं, आजीच कशाला, आई-बाबांचं सुद्धा असंच होत असेल कधीकधी.” आजीच्या काळाची कल्पना करत निधी म्हणाली.

“आजीच्या जागी जाऊन विचार केला ना, तेव्हापासून मला रागच येईनासा झाला. तिची बडबड, टोमण्यांच्या शब्दांपेक्षा त्यामागची भीती आणि काळजीच दिसते मला. मग उलटून बोलण्याऐवजी, ती भीती कमी होईल असं काहीतरी मी बोलते. म्हणजे, ‘अगं, उशीर होणार असला तरी दोघी मैत्रिणी आहेत सोबत’, किंवा ‘तू लग्नानंतर सलवार-कमीज घातल्यावर पणजी रागावली, तेव्हा तुला खूप वाईट वाटलेलं, असं तूच सांगतेस ना? तसंच आता आमच्या कपड्यांचं होतं,’ असं काहीतरी सांगते. लग्न या विषयावर चर्चाच टाळते. शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आणि मला मुलगा आवडल्याशिवाय आई-बाबा नक्की लग्नाची घाई करणार नाहीत. मग आजीशी भांडून तिच्या मनातली भीती का वाढवायची?”

“हो गं, विनाकारण वाद.”

“अगं, मध्यंतरी मजाच झाली. ओळखीतल्या कुणा मुलीचं जबरदस्ती लग्न झालं आणि आता त्यांचं जमेना’ असं आजीच सांगत होती. तेव्हा, ‘बघ, घाई करून काही उपयोग नसतो.’ असं बोलून मी संधी साधली, तर माझ्याशी वाद घातला, की ‘लग्न वेळेवरच झालं पाहिजे’ पण चार दिवसांनी आजीच तिच्या मैत्रिणीला पटवत होती, ‘तुझ्या नातीच्या लग्नाची घाई करू नको,’ म्हणून.”

हेही वाचा… गच्चीवरची बाग: घरच्या घरी ओला मसाला

“काय सांगतेस? म्हणजे तुझ्याशी वाद, पण मुद्दा मान्य.”

“हो ना. तुला-मला इगो आहे, तर आजीला नसणार का? तर, मुद्दा असा सखे, मोठ्यांशी डील करतानाही आपल्याकडे ‘चॉइस’ असतो. एकेक शब्द धरून वाद घालायचे, की त्या शब्दांमागच्या भीती आणि काळजीशी डील करायचं?”

मोकळेपणाने हसत निधी उठली. तिला आता पटकन आजीकडे जावंसं वाटत होतं.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com