scorecardresearch

Premium

खडतर परिस्थिती, प्रशिक्षणादरम्यान वडिलांचं निधन, IAS अधिकारी रितिका जिंदलचा प्रेरणादायी प्रवास

रितिका जिंदलने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

ritika jindal
खडतर परिस्थितीचा सामना करत रितिका जिंदल बनली IAS अधिकारी

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परिक्षा देतात. परंतु फारच कमी विद्यार्थी ही परिक्षा पास करू शकतात. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे या परिक्षेसाठी खूप मेहनत घेत असतात. प्रतिकूल परिस्थितीतूनही वाट काढत आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण करतात. आज आपण अशाच एका विद्यार्थीनीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने वडिलांच्या निधनाचा धक्का पचवत यूपीएससी परीक्षेत ८८ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

हेही वाचा- सियाचीनमध्ये पहिल्यांदाच लष्कराकडून महिला डॉक्टरची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहेत कॅप्टन गीतिका कौल

dene samajache marathi news, dene samajache initiative pune marathi news
स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!
UP Man Brijesh Pal suicide
“शिक्षण घेण्यात अर्ध आयुष्य गेलं, पण…”, यूपीतल्या तरूणाने पदवी जाळून स्वतःला संपवलं
case registered, extortion, businessman, offensive videos, mumbai
आक्षेपार्ह चित्रफीतीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी, ३५ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
ashok chavan statement on adarsh scam after joining bjp zws
आदर्श हा राजकीय अपघात! भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

कोण आहे रितिका जिंदल

या महिला आयएएस अधिकारीचे नाव आहे रितिका जिंदल. रितिकाचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. येथूनच तिने तिचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. इयत्ता १२ वी मध्ये, रितिकाने उत्तर भारतात CBSE बोर्ड परीक्षेत टॉप केले होते. यानंतर तिने दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. ९५ टक्के गुणांसह रितिकाने संपूर्ण कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता.

हेही वाचा- Crime Against Women : “गुन्हे वाढले नाहीत, महिला पुढाकार घेऊन FIR दाखल करत आहेत”

रितिका जिंदलला लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते, त्यामुळे तिने कॉलेजमध्ये असतानाच यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ग्रॅज्युएट लेव्हलच्या अभ्यासानंतर, रितिका पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षेला बसली आणि तिने पहिल्याच प्रयत्नात या परिक्षेचे तिन्ही टप्पे पार केले. पण अंतिम यादीत ती काही गुणांनी मागे पडली. मात्र, तिने हार मानली नाही आणि दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर रितिका जिंदलने कठोर परिश्रम केले आणि सन २०१८ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात ८८ वा क्रमांक मिळवून यूपीएससी परिक्षा पास केली. त्यावेळी रितिका फक्त २२ वर्षांची होती.

हेही वाचा- रेडिओ जॉकी ते मिझोरामच्या सगळ्यात तरुण महिला आमदाराचा मान; जाणून घ्या बेरिल व्हॅनीहसांगी यांचा प्रेरणादायी प्रवास

रितिका दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करत असताना तिच्या वडिलांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. रितिकासाठी हा कठीण काळ होता, परंतु असे असतानाही तिने अडचणींना तोंड देत आपली तयारी सुरू ठेवली आणि आज ती आयएएस अधिकारी असून हिमाचल, मंडी येथे एसडीएम पदावर कार्यरत आहे. आपल्या आजारी वडिलांची काळजी घेत रितिकाला यूपीएससी परीक्षेची तयारी करणे खूप कठीण होते. एका मुलाखतीत तिने याबाबत भाष्य केले होते ती म्हणालेली, “मी एका लहानशा गावातून आले आहे ज्यामध्ये फक्त मूलभूत संसाधने उपलब्ध आहेत. जेव्हा माझे वडील आजारी असायचे तेव्हा आम्हाला त्यांना उपचारासाठी प्रत्येक वेळी लुधियानाला घेऊन जावे लागे आणि मला त्यांच्यासोबत रुग्णालयात जावे लागायचं. माझ्या वडिलांना आयुष्याशी लढताना पाहून मला खूप बळ मिळाले आणि या परीक्षेसाठी मी खूप मेहनत घेतली.

प्रक्षिक्षणाच्या काळातच वडिलांच निधन

रितिका जेव्हा LBSNAA मसुरी येथे IAS प्रशिक्षण घेत होती, तेव्हा तिच्या वडिलांचा कर्करोगामुळे निधन झालं. रितिकाच्या आई-वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने आएएस अधिकारी बनावं. या ध्येयानेच रितिकाने वडिलांच्या निधनानंतरही IAS प्रशिक्षण पूर्ण केलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young ias officer ritika jindal cleared upsc exam in second attempt know about her struggle story dpj

First published on: 09-12-2023 at 19:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×