पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना देशाच्या नकाशाच्या वापराबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारताच्या नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा, चुकीच्या नकाशाचा वापर करणे हा कायदेशीर गुन्हा असून, या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद, दंड होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : शनिवारी, रविवारी एक्स्प्रेस-वे वापरताय? ही बातमी वाचाच…

हेही वाचा – बालभारती पौडफाटा रस्त्यावरून राजकारण तापले…शिवसेना ठाकरे गटाची भाजपवर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने अभ्यासक्रमात काही बदल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर युजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात देशाच्या नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा याची खात्री करावी असे सांगत युजीसीने कायदा आणि न्याय मंत्रालयाने १९९० मध्ये कायद्यात केलेल्या सुधारणेचा संदर्भ दिला आहे. त्यानुसार कोणीही भारतीय नकाशाचा वापर केल्यास आणि तो भारतीय सर्वेक्षण विभागाच्या नकाशाप्रमाणे नसल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो. या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद आणि दंडाची तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.