Women’s Day special: महिलांचे हक्क आणि अधिकार याबाबत समाजामध्ये जागरुती व्हावी यासाठी ८ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. १९७७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महिला दिनाबद्दलची अधिकृत घोषणा केली होती. महिलांना समान संधी मिळावी, समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांचे समाजातील महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

महिला दिनाची यंदाच्या वर्षाची थीम ही ‘DigitALL: Innovation and technology for gender equality’ आहे. सतत अपडेट होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्त्री आणि पुरुष यांच्यामधील समानता यावी या थीममागील प्रमुख उद्दिष्ट आहे. हे औचित्य साधत व्हॉट्सअ‍ॅप या रोजच्या वापरातल्या सोशल मीडिया अ‍ॅपमधील काही सोप्या ट्रिक्सची माहिती देणार आहोत. या ट्रिक्स महिला सुरक्षेच्या, त्यांच्या गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहेत. ऑनलाइन पद्दतीने होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी यांची मदत होऊ शकते.

Inlaks Shivdasani Scholarship, Indian Students in Higher Education, Indian Students Abroad Education, Supporting Indian Students, scolarship for abroad education, marathi news, education news, scolarship news, abroad scolarship, career article, career guidance, scolarship for students, indian students,
स्कॉलरशीप फेलोशीप : इनलाक्स शिवदासानी शिष्यवृत्ती
Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
irctc indian railways black box of indian railway crew voice video recording system cvvrs installed in trains loco engine
रेल्वेगाड्यांमध्येही आता विमानासारखी ‘ब्लॅक बॉक्स’ यंत्रणा, अपघात रोखण्यासाठी होईल उपयोग; वाचा
Porn Bots Pops Up On Screen Because You Engage With It Says Former Meta Employee
स्क्रोल करताना अचानक पॉर्नसारखे व्हिडीओ का दिसतात? मेटाच्या माजी सहसंस्थापकाच्या पोस्टमुळे नेटकरी भडकले

Block आणि Report

बहुतांश स्त्रियांना अनोळखी नंबरवरुन मेसेज किंवा कॉल येत असतात. यांचा नेहमीच त्रास होत असतो. ब्लॉक आणि रिपोर्ट केल्याने या समस्येवर मात करता येईल. एखादा नंबर ब्लॉक केल्यामुळे समोरची व्यक्ती मेसेज करु शकणार नाही. तर रिपोर्ट केल्याने त्या व्यक्तीने पाठवलेले शेवटचे पाच मेसेज तसेच चॅटमध्ये राहतील. पुरावा म्हणून हे मेसेज वापरले जाऊ शकतात.

Disappearing messages

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘end-to-end encryption’ ही सुविधा उपलब्ध आहे. तरीही काही यूजर्सना अधिक गोपनीयता हवी असते. या फीचरमुळे पाठवलेला मेसेज चोवीस ताल, सात दिवस किंवा नव्वद दिवस अशा ठराविक कालावधीनंतर अदृश्य होतो. ‘view once’ या फीचरचा वापर केल्याने शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडीओचा रेकॉर्ड राहत नाही.

आणखी वाचा – International Women’s Day 2023: महिला दिन ‘८ मार्च’ रोजी साजरा करण्यामागे खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर..

Screenshot blocking

व्हॉट्सअ‍ॅपवरील फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज यांचा स्क्रीनशॉट काढता येतो. ‘view once’ चा वापर केल्यानंतरही स्क्रीनशॉट काढण्याची परवानगी व्हॉट्सअ‍ॅप देते. अशा वेळी स्क्रीनशॉट ब्लॉकिंगचा वापर करता येतो. या ट्रिकमुळे समोरची व्यक्ती चॅटमध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीचा स्क्रीनशॉट काढू शकणार नाही. तसेच स्क्रीनशॉट ब्लॉकिंगचा वापर केल्यास स्क्रीन रेकॉर्डिंग करणे अशक्य असते. यामुळे चॅट, फोटो किंवा व्हिडीओ यांचे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यानंतर तयार होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीही दिसणार नाही.

Exit groups without notifying

सुरुवातीला एखाद्या यूजरने ग्रुप लेफ्ट केल्यावर ग्रुपमध्ये असलेल्या अन्य सदस्यांना त्याबद्दलची माहिती मिळत असे. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी सेटिंग्सचा वापर करुन यूजर्स इतरांना सूचित न करता ग्रुपमधून बाहेर पडू शकतात. ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मात्र ठराविक व्यक्तीने ग्रुप सोडल्याचा मेसेज दिसतो.

आणखी वाचा – International Women’s Day 2023: ‘हे’ पाच सेफ्टी गॅजेट्स ठरतील उत्तम महिला दिन गिफ्ट, किंमत आहे फक्त…

Control on your personal details

यूजर्संना त्यांच्या वैयक्तिक माहितीचे व्यवस्थापन करण्याची सोय व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. प्रोफाईल फोटो, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस अशा गोष्टी कोण पाहत आहे किंवा कोण पाहू शकणार आहे हे यूजर्स स्वत: ठरवू शकतात. ही माहिती कोणापर्यंत पोहचू शकते यावर नियंत्रण ठेवू शकता.

Enable ‘Two-Step Verification’ feature

‘Two-Step Verification’ फीचरमुळे कोणत्याही यूजरला सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडता येतो. हे फीचर वापरण्यासाठी सहा अंकी पिन आवश्यक असतो. हा पिन टाकून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिसेट किंवा व्हेरिफाय करता येते. फोन/सिम कार्ड चोरीला गेल्यास अथवा फोन खराब झाल्यास या फीचरची मदत घेता येते.

परवानगी शिवाय एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये अ‍ॅड होणे त्रासदायक असते. व्हॉट्सअ‍ॅपमधील सेटिंग्समध्ये काही बदल करुन कोणत्या ग्रुपमध्ये अ‍ॅड होऊ शकता यावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी Go to Settings >> Privacy >> Groups, and set the following असे बदल करा.