एकदा आपण घरी असं खत तयार करू लागलो की कुंडीत भरण्यासाठी वेगळी माती किंवा इतर घटक आणावे लागत नाहीत. पालापाचोळा, काडीकचरा आणि आपलं हे तयार खत एवढ्या गोष्टी झाडं लावण्यासाठी पुरतात. यांच्या वापराने कुंडी वजनाला हलकी होते आणि सहज हवी तेव्हा तिची जागाही बदलता येते.

मागील लेखात आपण मोठी जागा असेल तर कंपोस्ट कसं करायचं याची माहिती घेतली. आज आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. आपल्याकडे एखादी छोटी गॅलरी किंवा खिडकी लगत असलेले ग्रील्स एवढी जागा जरी असली तरीही आपण कंपोस्ट करू शकतो. यासाठी एखादा फुटका माठ किंवा जुनी कुंडीही चालते. पुरेशी छिद्र असलेल्या माठ किंवा कुंडीत तळाला वाळलेल्या पानांचा थर देऊन घरातला ओला कचरा यात जमवायला सुरुवात करायची. मधे मधे वाळलेली पाने किंवा नारळाच्या शेंड्यांचा थर द्यायचा. जेणेकरून थोडा कोरडेपणा राहिल. हा छोटा माठ किंवा कुंडी भरायला साधारण एक महिना लागेल. पूर्ण भरलेला माठातील कचरा थोडा पसरून वाळवून घेतला की कंपोस्ट तयार.

What’s the right time for sunlight intake for Vitamin D
ड जीवनसत्त्व मिळविण्यासाठी सूर्यप्रकाशात जाण्याची योग्य वेळ कोणती? लक्षात घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Pune growing urbanization, PMPL, Pune metro,
सावध ऐका पुढल्या हाका…
Karwa Chauth Fasting what to eat during fasting pre and post fasting for Karwa Chauth 2024
करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
tapeworms pills effect on body
Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
Mosquitoes increasing in the house
घरात डासांची दहशत वाढतेय? डासांचा नायनाट करण्यासाठी करा ‘हे’ तीन जबरदस्त उपाय
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…

हेही वाचा >>>शेतकऱ्याची लेक, अकरावीत अनुत्तीर्ण; मात्र MPPSC परीक्षेत जिद्दीमुळे पटकावला ६ वा क्रमांक! पाहा तिचा प्रवास…

जर कोणाला थोडाफार जास्तीचा खर्च करून अधिक सुसूत्र मांडणी करायची असेल तर एक मध्यम आकाराची किंवा मग आपल्या उपलब्ध जागेनुसार मोठी किंवा छोटी प्लास्टिक बास्केट घ्यायची. या बास्केटला आतल्या बाजूला बारीक छिद्र असलेली प्लास्टिक जाळी लावायची. डास येऊ नयेत म्हणून आपण खिडक्यांना जी जाळी लावतो ती वापरायची. आजकाल बाजारात किंवा ऑनलाइनसुद्धा ग्लू गन मिळतात त्याचा वापर करून ही जाळी बास्केटच्या आणि झाकणाच्या आतल्या बाजूला लावून घ्यायची. ग्लू गनने हे काम अगदी झटपट आणि सोपं होतं. आता झाली आपली कंपोस्ट बास्केट तयार.

यात पहिला थर नारळाच्या शेंड्या, कोकोपीट किंवा मग वाळलेला पाला वापरून द्यायचा. यानंतर घरातला भाज्यांची सालं आणि देठांचा कचरा घालायला सुरुवात करायची. फक्त हा कचरा घालताना बारीक तुकडे करून घालायचा. तसं केल्याने खत लवकर तयार होतं. यात एखादा हलका थर कोरड्या मातीचा द्यायचा असेल तर तोही दिला तरी चालतो. पण माती अगदी थोडी वापरावी. ओल्या काचऱ्याच्या एका थरावर सुक्या कचऱ्याचा (नारळाच्या शेंड्या, कोकोपीट, वाळलेला पालापाचोळा) थर मात्र न विसरता लावायचा.

हेही वाचा >>>पती हत्येप्रकरणी दोषी ठरल्यास पत्नीला घटस्फोट मिळेल

ही बास्केट भरायलाही साधारण महिनाभर लागेल. छोट्या जागेत कंपोस्ट करताना आपल्याला दोन गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे जरूरीपेक्षा जास्त ओलसरपणा राहायला नको आणि दुसरं म्हणजे कचरा बारीक तुकडे करून घ्यायचा आणि एकदोन दिवसांनी तो खालीवर थोडा हलवून घ्यायचा. मोठ्या ड्रममध्ये कंपोस्ट करताना या गोष्टी नाही केल्या तरी चालतात.

ही सगळी सावधगिरी एवढ्यासाठी घ्यायची की, या कंपोस्ट मधे कुजण्याची प्रक्रिया उत्तम व्हावी व अळ्या किंवा किटक होऊ नयेत. तसंच ही बास्केट कोरड्या जागी ठेवायची. कुजण्याच्या प्रक्रियेत तयार होणारं पाणी ज्याला कंपोस्ट टी म्हटले जाते ते या बास्केटमधे केलेल्या कंपोस्टमधे जमा होत नाही. त्यामुळे आवश्यक तेवढा कोरडेपणा राहावा यासाठी काळजी घ्यावी लागते. जेणेकरून उगीचच कामं वाढू नयेत.

बास्केटमधील कंपोस्ट आपल्याला फारसं सुकवावं लागत नाही, तर जरूरीप्रमाणे नवीन कुंडी भरण्यासाठी किंवा झाडांना तसंच देता येतं. माठ किंवा कुंडीत कंपोस्ट करत असाल तर माठाखाली एखादी प्लास्टिक बशी जरूर ठेवावी. माठ सछिद्र असल्यामुळे तो पावसाळ्यात पाझरतो आणि ओल वाढते.

बाजारात कंपोस्ट करण्यासाठी विविध कल्चर किंवा लिक्वीड मिळतात. काहीजण गांडूळ कल्चरही घालतात. पण या छोट्या कंपोस्ट पध्दतीमधे आपण थोडीफार माती वापरणार असू तेव्हा आणि एरवीही अशा कल्चरची गरज पडतच नाही. मी या तिन्ही पद्धतीने कंपोस्ट केले आहे. कोणताही जास्तीचा खर्च किंवा जास्तीचे घटक न वापरता विनाश्रम उत्तम कंपोस्ट तयार होतं.

खत तयार होताना, कुजण्याची प्रक्रिया होते म्हणजे नेमकं काय होतं हे जरा नीट समजून घेतलं की आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपचं मिळत जातात. त्या अनुषंगाने आपण बदल करत जातो. यातूनच निसर्ग आपल्याला शिकवतो, हे विधान पूर्णपणे पटतं.

एकदा आपण घरी असं खत तयार करू लागलो की कुंडीत भरण्यासाठी वेगळी माती किंवा इतर घटक आणावे लागत नाहीत. पालापाचोळा, काडीकचरा आणि आपलं हे तयार खत एवढ्या गोष्टी झाडं लावण्यासाठी पुरतात. यांच्या वापराने कुंडी वजनाला हलकी होते आणि सहज हवी तेव्हा तिची जागाही बदलता येते. मातीचा वापर न केल्यामुळे गच्चीवर किंवा गॅलरीत मातीचे जे डाग पडतात तेही पडत नाहीत. डोंगर उपसून विकायला आणलेली तथाकथित गार्डन सॉईल न वापरल्याने पर्यावरण रक्षणात खारीचा वाटा उचलल्याचं समाधानही मिळतं.

एवढ्या सविस्तर माहिती नंतर तुम्हीही हा प्रयोग करायला उत्सुक असाल. मग चला तयारीला लागा आणि हो काही प्रश्न असतील तर जरूर विचारा.आपल्या प्रतिक्रिया ही कळवा.

mythreye.kjkelkar@gmail.com