साखर ही उसाच्या रसावर रासायनिक प्रक्रिया करून बनविली जाते. प्रोटीन्स व खजिन द्रव्यांचा अभाव असूनही चवीने मधुर व दिसायला पांढरीशुभ्र असणारी साखर लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते. आधुनिक काळात, तर प्रत्येक तयार पदार्थांत साखरेचाच समावेश केलेला असतो. जाम, बिस्किट्स, चॉकलेट्स, केक, मिठाई अशा अनेक पदार्थांत साखरेचा सढळपणे वापर केला जातो.

साखर बनविण्याची प्रक्रिया

Kobi Sabzi Benefits What Changes In Body When You Eat Cabbage Once A week
दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे; एक वाटी भाजीत किती कॅलरीज दडल्यात पाहा
benefits of cabbage for face
निरोगी शरीराबरोबरच कोबीची भाजी देईल चमकती त्वचा; जाणून घ्या कसा बनवायचा कोबीचा फेसपॅक
Womens Health Marina alternative to hysterectomy
स्त्री आरोग्य : गर्भाशय काढून टाकण्याला ‘मेरीना’चा पर्याय?
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Pohe Kurdai Recipe in Marathi News Valvan Recipes In Marathi
ना गॅस पेटवायचा ना पीठ शिजवायचे; सोप्या पद्धतीने कमी वेळात बनवा “पोहा कुरडई”, ही घ्या सोपी रेसिपी
Digestion Reduce Bad Breathe How To make Mouth Smell Fresh
१ चमचा बडीशेपमध्ये ‘हे’ दोन पदार्थ घालून तोंडाची दुर्गंधी ते अपचन दोन्ही त्रास करा दूर; फायदे वाचून लगेच बनवाल हे मिश्रण
environmentalist initiative to fill dry water bodies for wildlife
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….

उसाचा रस हा पचनास अतिशय हलका असतो. या रसाला अटविले जाते व त्यात चुना घालून उकळल्याने त्यातील मळ काढून टाकला जातो. नंतर सतत आटवीत राहिल्यामुळे व अनेक रसायनिक पदार्थांचा वापर केल्यामुळे हाच उसाचा घट्ट रस पचण्यास कठीण होतो. सल्फर डायऑक्साईड वायू, फॉर्मालीन, रिफायनिंग व ब्लिचिंग या सर्व रासायनिक प्रक्रियांतून घट्ट रस आटविला जाऊन, पांढरीशुभ्र दाणेदार साखर बनवली जाते. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साखर एक शुद्ध रासायनिक पदार्थ बनतो व अशी ही साखर वर्षांनुवर्षे टिकते. ती कधीही खराब होत नाही. कारण, रासायनिक विषारी पदार्थाचा माराच इतका असतो की, साखरेला कीड कधीच लागू शकत नाही; परंतु या सर्व प्रक्रियांमुळे साखर आपल्या शरीराला त्रासदायक ठरते. कारण, त्यातील मौल्यवान घटक साखर बनवताना नष्ट होतात.

हेही वाचा – ‘गंगा भागीरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

गुणधर्म

प्रोटीन्स जीवनसत्त्व, खनिजद्रव्य, क्षार यांचा अभाव साखरेमध्ये असतो, तर यामध्ये फक्त कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात व त्यामधून फक्त शरीराला उष्मांक (कॅलरीज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे साखरेतून शरीराचे पोषण अजिबात होत नाही. फक्त आजारी असताना उदा :- जुलाब होणे, शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे. अशा वेळी शरीरातील मांसपेशींना साखरेतील कार्बोहायड्रेट्समुळे शक्ती प्राप्त होते, म्हणून अशा आत्यंतिक अवस्थेत साखर-पाणी रुग्णाला पिण्यास देतात. अशा वेळी साखर सहजतेने व त्वरेने रक्तात शोषली गेल्यामुळे रुग्णाला पटकन आराम वाटतो.

साखर पचविण्यासाठी स्वादुपिंडाला फार कष्ट करावे लागतात. या कामासाठी स्वादुपिंडातील इन्सुलिन फार खर्ची होते. त्यामुळे इन्सुलिनची कमतरता निर्माण होऊन मधुमेह हा आजार निर्माण होतो. याकरिता साखरेचा वापर अगदी गरजेपुरताच करावा. एक अंश साखरेमधून एकशेसोळा उष्मांक (कॅलरीज) मिळतात. एक कप चहामध्येही अनेकजण दोन चमचे साखर घेतात. एक चमचा साखरेतून दोन गव्हाच्या पोळ्या खाण्याइतका उष्मांक आपल्या शरीराला मिळतो.

हेही वाचा – गच्चीवरची बाग: लोखंडी जाळी, किचन ट्रे इत्यादी…

थोडक्यात, या एक कप चहामधून चार पोळ्या पचविण्यासाठी लागणारी ताकद खर्च होते. दिवसभरातून दोन कप चहा घेतल्यास हीच ताकद, दुप्पट लागते. त्यामुळेच अति चहा, अति साखरेचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, संधिवात हे आजार निर्माण होतात. कारण, इन्सुलिनची मात्रा एवढी साखर पचविण्यासाठी कमी पडते व त्यातूनच आजाराची लागण होते, म्हणून चहा, मिठाई, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स अशा प्रकारचे साखरेचा मुक्तहस्ताने वापर असणारे पदार्थ घेण्याचे टाळावे. घेतलेच तरी अगदी कमी प्रमाणात व कमी साखर टाकून घ्यावे. पाश्चात्त्य देशांतसुद्धा पांढरी साखर खाऊ नये, म्हणून विविध प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन केले जाते. आपल्याकडेही आता बरीच जनजागृती होते आहे.

पर्यायी पदार्थ

साखरेऐवजी प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवताना लाल गुळाचा वापर करावा, पिवळा गूळ वापरू नये, गुळाचा रंग पिवळा करण्यासाठीही रसायनांचा वापर करतात. कॉस्टिक सोड्याने काकवी धुऊन काढतात व त्यामुळे पिवळा गूळ हानिकारक आहे. लाल गुळामध्ये लोह, खनिजद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. म्हणून लिंबू-गूळ-सरबत, गुळाचा चहा, पुरणपोळी, गुळाचा शिरा, गूळपोळी, शेंगदाण्याची चिक्की, लाडू असे विविध गुळाचे पदार्थ खावेत. त्याचबरोबर साखरेऐवजी काकवीचा वापर करावा.

हेही वाचा – ‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’: महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत केवळ एक टक्का वाढ

मधुमेह असणाऱ्यांनी गूळ व साखर या दोन्ही पदार्थाचा उपयोग करू नये. मधुमेही रुग्णांनी फक्त सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, पपई अशी फळे खावीत. इतर सर्वांनी त्यासोबत खजूर, खारीक, मनुके, मध, अंजीर, चिकू या सर्व प्रकारची फळे, पदार्थांचा आहारात समावेश करावा.

हे पदार्थ नैसर्गिक असल्याने पचनास सुलभ असतात. हे खाल्ल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची कमतरता भरून येते व जीवनसत्त्व, प्रोटीन्स, खनिजे, क्षार अशी आवश्यक असलेली घटकद्रव्ये शरीराच्या पोषणासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे शरीराचे पोषण होऊन आरोग्य प्राप्त होते.

(sharda.mahandule@gmail.com)