नीलिमा किराणे

सिद्धार्थ आणि राहीची नव्याने मैत्री झाली होती. कलीग म्हणून आधीपासून ओळख असली, तरी एकाच प्रोजेक्टवर काम करायला लागल्यानंतर मनातल्या गोष्टी शेअर करण्याइतका मोकळेपणा आला होता. एकदा सिद्धार्थ म्हणाला, “अजूनही वाटतं, की माझा ‘सीजीपीए’ (Cumulative Grade Point Average) आणखी चांगला असू शकला असता. अभ्यास ‘पद्धतशीर’पणे न केल्यामुळे मार्क कमी पडले, आपण क्षमतेइतकं मिळवलं नाही हा सल अजूनही बोचतो.”

It is important to be careful while buying a home
सावधानपणे व्यवहार करणे आवश्यक !
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

“पण तुझा CV तर छान आहे. तुला प्रोजेक्टमध्ये घ्यायला अनेक प्रोजेक्ट मॅनेजर उत्सुक असतात, अचीव्हमेन्ट्स आहेत, तरीही तुला असं का वाटतं?” राहीने नवलाने विचारलं.

“वाटतं खरं. मी हुशार असलो तरी गावाकडून आलेलो, इंजिनीअरिंग कॉलेजातल्या शहरी मुलांमध्ये कॉम्प्लेक्स वाटायचाच. पहिल्या वर्षी कसाबसा पास झालो. तेव्हापासूनच ‘आपण कमी पडतोय’वाली भावना सुरू झाली. मग आम्ही समानधर्मी मुलांनी एक ग्रुप बनवला. एकेकाने एकेक टॉपिक करून ग्रुपमध्ये सेशन घ्यायचं, पुढे ग्रुप डिस्कशन. या मेथडमुळे इंटरेस्ट आला, इंजिनीअरिंग कळतंय असं वाटायला लागलं. कॉन्फिडन्स वाटला. त्या सेमिस्टरला मार्कदेखील बरे पडले.

“मग एकदा एका विषयावरचे डाऊट क्लिअर करायला आम्ही दोन सीनियरना, उन्मेष आणि शिवानीला बोलावलं. उन्मेष त्या विषयातला टॉपर होता. त्यांनी आमच्या शंका दूर केल्या, पण आमच्या डिस्कशन मेथडला वेड्यात काढलं.

“अरे, तुमच्या या पद्धतीने इतके विषय आणि इतके टॉपिक कधी होणार?

इंजिनीअरिंगचा अभ्यास असा थोडाच करतात? गावठीपणा सोडा, स्मार्ट स्टडी शिका.” दोघंही असं म्हणाल्यावर आमचा ग्रुप डिस्कशनचा उत्साह संपला. ग्रुपही पांगला.”

“मग?” राहीनं उत्सुकतेनं विचारलं.

“मग मी अनेक पद्धती ट्राय केल्या. कधी क्लास लावले, नोट्स, जुने पेपर सोडवणे, यू-ट्यूब असा धडपडत पुढे गेलो; पण ‘पद्धतशीर अभ्यास’ जमलाच नाही याची आजही खंत वाटतेच.” सिद्धार्थने मन मोकळं केलं.

“मला तुझं पटतच नाहीये. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षी सगळेच माती खातात. मी पण खाल्ली. पुढेही काही विषय अवघड जातातच; पण चार वर्षांत तुझा एकदाही विषय राहिला नाही हे विशेष नाही का? ‘पद्धतशीर’ म्हणजे काय? उन्मेषची पद्धत? प्रत्येकाची समजून घेण्याची पद्धत वेगळी असते रे. तुमची डिस्कशन मेथड हा चांगला पर्याय होता. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढत होता. कुणाच्या तरी कमेंट्समुळे तुम्ही तुमची जमलेली पद्धत उगीच सोडलीत असं वाटतंय. थोडी वेळखाऊ पद्धत होती खरी; पण पुढे गरजेप्रमाणे आपोआप मॉडिफिकेशन झालं असतं.”

“खरंच ग, असा विचार सुचलाच नाही. उन्मेष सीनियर, शहरी, स्मार्ट आणि त्या विषयातला त्याच्या बॅचचा टॉपर. त्यामुळे त्याचं मत सीरिअसली घेतलं बहुतेक.”

“तुमच्या उन्मेष-शिवानीचा फायनलचा स्कोअर काय होता रे?” राहीनं विचारलं.

“उन्मेषला बहुतेक दोन विषयांसाठी दोन अटेम्प्ट लागले आणि शिवानीचंही असंच काही तरी.” सिद्धार्थ आठवत म्हणाला.

“बघ, असे गुरू तुम्हाला ‘ग्यान’ पाजून गेले आणि तूही इतकी वर्षं त्यात अडकलास. तुम्हाला अवघड जाणाऱ्या एखाद्या विषयात टॉपर होता म्हणजे त्याचं सगळंच खरं ही अंधभक्ती झाली.” राही म्हणाली.

“खरंच, मूर्खपणाच झाला गं.” सिद्धार्थला पटलंच.

“तुला अभ्यासाची उत्तम समज आहे, आज फील्डमध्ये नाव आहे, तरीही ‘पद्धतशीर अभ्यास जमला नाही’ या बावळट न्यूनगंडात तू कशामुळे अडकलास हे लक्षात येतंय का?”

“आपण गावातून आलोय आपण स्मार्ट नाही हे खोलवर मान्य असल्यामुळे? की उन्मेषच्या पर्सनॅलिटीतला कॉन्फिडन्स?”

“ते आहेच, पण त्यामुळे, त्याचं मत तू घट्ट धरून बसलास. डेटा – म्हणजे प्रत्यक्षात काय घडतंय हे तपासलंच नाहीस, इथे गडबड झाली. पुढच्या वर्षांमध्ये तू अभ्यासात वेगवेगळे प्रयोग करून चांगला स्कोअर केलास याचा अर्थ तू क्रिएटिव्ह आहेस, गरजेप्रमाणे बदल करण्याची क्षमता आहे. या तुझ्या मूलभूत अचीव्हमेन्ट्स न मोजता, तू ‘टॉपर’ या शब्दाबद्दल भक्तिभाव आणि न्यूनगंडात राहण्याचा ‘चॉइस’ केलास. आता तरी नेहमी डाटा तपासत राहून स्वत:कडे वस्तुनिष्ठपणे बघशील का? असं सायंटिफिकली पाहण्यालाच ‘पद्धतशीर’ म्हणतात आमच्यात.” राहीने टोमणा मारला.

“मान्य आहे राही मॅडम, डाटा प्रोसेसिंग शिकवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.” सिद्धार्थ मोकळेपणाने हसत म्हणाला.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com