scorecardresearch

अंतर्वस्त्र निवडताना ‘Period Panties’ ला महिला देतायत प्राधान्य; कसा करायचा वापर? जाणून घ्या फायदे

What Is Period Panty: तुम्ही नियमित अंतर्वस्त्रे जशी वापरता तशीच पण अधिक प्रभावशाली अशी ही पिरियड पॅंटी काय आहे चला जाणून घेऊया…

Underwear Guide What Are Period Panties How are they replacing pads tampons and period cup How to use Panty
अंतर्वस्त्र निवडताना 'Period Panties' ला महिला देतायत प्राधान्य (फोटो: Pexels)

Period Panties: मासिक पाळीचे चार दिवस सुखकर कसे करायचे यासाठी आजवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. मासिक पाळीत अनेक महिलांना वारंवार सतावणारी चिंता म्हणजे पिरियड पॅड्स. कधी तोकडे पडणारे तर कधी रुंद असूनही नेमकी हवी तशी मदत न करणारे पिरियेड पॅड्स हे खरोखरच त्रासदायक ठरतात. आता यावर उपाय म्हणून महिला कप व टॅम्पॉनस असे पर्याय वापरू लागल्या पण त्यातही अनेकींना एक गैरसोय जाणवते. सतत काहीतरी टोचत राहत असल्याची तक्रारही काही महिला करतात. अशावेळी दोन्ही पर्याय एकत्र करून पिरियड पॅंटी हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. तुम्ही नियमित अंतर्वस्त्रे जशी वापरता तशीच पण अधिक प्रभावशाली अशी ही पिरियड पॅंटी काय आहे चला जाणून घेऊया…

पिरियड पॅंटी म्हणजे काय? (What Is Period Underwear)

पिरियड पॅंटी या वेगळ्याप्रक्रारे डिझाईन केल्या जातात. या नियमित अंतर्वस्त्रांपेक्षा थोड्या अधिक हाय वेस्ट असतात म्हणजेच यातून आपल्याला पोटाला व पूर्ण पृष्ठभागाला आधार देता येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात आपण पॅड्स लावतो तिथे पिरियडचे रक्त शोषून घेण्यासाठी कपड्यांचे थर असतात. पण हे कपडे आतून शिवलेले असतात त्यामुळे त्यांचा आकार दिसणे व कॅमल टो सारख्या समस्या टाळता येतात. काही उत्तम प्रतीच्या पिरियड पॅंटीमध्ये ता कपड्यांचे पाच ते सहा लेयर्स हे नीट शिवलेले असतात.

पिरियड पॅंटीची गरज काय? (How is period panty used?)

मासिक पाळीच्या सर्व दिवसांमध्ये तुम्हाला पिरियड पॅंटी वापरण्याची गरज नाही. तुम्ही केवळ अधिक रक्तस्रावाच्या दिवशीच या पॅंटी वापरू शकता. तुम्हाला अधिक रक्तस्त्राव होत असल्यास तुम्ही पॅड्ससह हे अंतर्वस्त्र वापरू शकता जेणेकरून चुकून पॅड मधून जर बाहेर रक्तस्त्राव होऊ लागला तर ही पॅंटी ते शोषून तुमचे कपडे डागाळण्यापासून रोखू शकेल. काही पिरियेड पॅंटी मध्ये पॅड्सचे साईड विंग्स लावण्यासाठी वेगळं कापड दिले जाते ज्यामुळे तुम्ही वेगाने हालचाल करताना सुद्धा सुरक्षित राहू शकता.

हे ही वाचा<< चेहऱ्यावरचे केस काढल्यास वेगाने वाढतात? जाड होतात? फेशियल हेअरबाबत त्वचा तज्ज्ञांनी सोडवले सर्व मुख्य प्रश्न

पिरियड पॅंटी आपण दोन पद्धतीने वापरू शकता, पहिला वापर म्हणजे अधिक रक्तस्त्राव होत असल्यास पॅड्ससहित ही पॅंटी वापरावी अन्यथा कमी रक्तस्त्राव असल्यास पॅड्स शिवाय तुम्ही पॅंटी वापरू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 13:32 IST
ताज्या बातम्या