कोणताही ड्रेस, टॉप, ब्लाऊज खरेदी करताना अथवा शिवून घेताना आपण त्याच्या गळ्याला (नेक किंवा योक) काय फॅशन केली आहे हे आवर्जून पाहातो. तशीच बाह्यांची फॅशनसुद्धा लक्ष वेधून घेणारी असते. आपल्याला सर्वसाधारणपणे साध्या बाह्या, थ्री-फोर्थ, कोल्ड शोल्डर, पफ स्लीव्हज् आणि स्लीव्हलेस/ स्पॅघेटी हे प्रकार माहिती असतात. पण याव्यतिरिक्तही फक्त बाह्यांचेच कितीतरी प्रकार आहेत, जे प्रत्येक फॅशनप्रेमीच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवेत! त्यातले काही आकर्षक प्रकार पाहू या.

आणखी वाचा : विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

कॅप स्लीव्हज् – अनेक जणांचा ‘कॅप स्लीव्हज्’ आणि ‘फ्लटर स्लीव्हज्’मध्ये गोंधळ होतो, पण हे दोन्ही प्रकार पूर्णत: वेगळे आहेत. ज्यांना पूर्णत: स्लीव्हलेस कपडे घालायला संकोच वाटतो, पण फार मोठ्या बाह्याही आवडत नाहीत, त्यांच्यासाठी ‘कॅप स्लीव्हज्’ अतिशय उत्तम ठरतात. ‘रेग्युलर स्लीव्हज्’पेक्षा आखूड आणि खांद्यांवर छोटीशी छत्री असावी, तशा या बाह्या दिसतात. त्यानं खांद्याच्या बाजूचा काही भाग वरून झाकला जातो. कुडते, टॉप आणि साडीवरच्या ब्लाऊजमध्येही कॅप स्लीव्हज् खुलून दिसतात. या बाह्यांमधून ‘अंडरआर्मस्’ दिसतात, त्यामुळे ते ‘शेव्ह’ केलेले असणं लक्षात ठेवावं लागतं.

आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?

फ्लटर स्लीव्हज्- फ्लटर स्लीव्हज् प्रकारात झोळ, फोल्डस् किंवा प्लेटस् असलेल्या बाह्या खांद्याच्या वर सुरू होऊन नुसत्याच सोडलेल्या असतात, खालून शिवलेल्या नसतात. आकर्षक आणि तरूण ‘लूक’ देणाऱ्या या बाह्या आहेत. या बाह्यांमध्येही हात वर केल्यावर अंडरआर्मस् दिसतात.

रॅग्लन स्लीव्हज् – या बाह्या बहुतेक वेळा मोठ्या किंवा थ्री-फोर्थ बाह्यांच्या टी-शर्टस् मध्ये दिसतात. कॉलरपासून या बाह्या एकसंध कापडाच्या तुकड्यात शिवलेल्या असतात. सहसा या बाह्यांचा रंग टी-शर्ट किंवा टॉपच्या ‘बेस कलर’पेक्षा वेगळा असतो. म्हणजे उदा. टी-शर्ट जर ग्रे रंगाचा असेल, तर कॉलरपासून सुरू होणाऱ्या एकसंध रॅग्लन स्लीव्हज् मरून, नेव्ही ब्लू किंवा इतर कोणत्या रंगाच्या असू शकतात. या बाह्या वेगळ्या रंगात असल्यानं उठून दिसतात. वॉर्डरोबमध्ये एकतरी रॅग्लन बाह्यांचा टी-शर्ट हवाच!

आणखी वाचा : स्तनपानाचे फायदे आई आणि बाळालाही!

बॅटविंग स्लीव्हज् – ‘बॅटविंग’ म्हटल्याबरोबर वटवाघळाचे पंखच तुमच्या डोळ्यांसमोर आले असतील! या बाह्यांचा आकार असतोच तसा. खांद्यापाशी, जिथे बाही सुरू होते तिथे बाहीला मोठा झोळ असतो. या झुळझुळीत बाह्या काखेत खूपच रुंद असतात आणि बाहीच्या पुंगळीची खालची बाजू थेट कमरेच्या जवळ आलेली असते. असे बॅटविंग टॉप्स किंवा टी-शर्ट कमरेपाशी मात्र फिट बसणारे (कमरेपाशी घट्ट) असतात. हात पसरल्यावर या बाह्यांचा आकार झोळदार पंखांसारखा दिसतो.

आणखी वाचा : किती वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान द्यावे?

स्लिट स्लीव्हज् – स्लिट स्लीव्हज् या साधारणत: थ्री-फोर्थ किंवा पूर्ण लांबीच्या असतात. यात खांद्यापासूनचा बाहीचा काही भाग साधा आणि बंद असतो. त्यापुढची बाही थोडी झोळदार आणि ‘स्लिट’ असलेली अर्थात- मध्ये कापलेली असते. त्यामुळे बाही थ्री-फोर्थ किंवा पूर्ण असली तरी त्यातून हात मोकळा राहातो. कॅज्युअल टॉप्स आणि ड्रेसेसमध्ये स्लिट स्लीव्ह चांगली दिसते. मात्र या बाह्या घरातलं काम किंवा स्वयंपाक करताना फारशा सोईच्या नसतात, कारण त्यांच्या अर्धपताका फडकत राहून मध्ये मध्ये येतात!

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

केप स्लीव्हज् – यांना बाह्या कितपत म्हणावं शंकाच आहे! केप स्लीव्हज् मध्ये ड्रेस किंवा टॉपला बाह्या न शिवता साधारण फ्लटर स्लीव्हज् ची उंची असते तितक्या उंचीचं झोळदार किंवा चुण्यादार कापड गळ्यापाशी शिवलेलं असतं. हे कापडच स्लीव्हज् चं काम करतं आणि पुढच्या आणि मागच्या गळ्याच्या खालीही या कापडाच्या चुण्या रुळतात. हा प्रकार वारंवार फॅशनमध्ये दिसतो. मात्र केप स्लीव्हज् सुद्धा सर्वांनाच चांगल्या दिसतात असं नाही, त्यामुळे असा टॉप किंवा ड्रेस घेण्यापूर्वी तो आधी घालून जरूर पाहा. आणखी एक, या बाह्यांमध्येही अंडरआर्मस् च्या खालचा भाग मोकळा राहातो हे लक्षात ठेवा.

आणखी वाचा : सुंदर मी होणार : निगा हात आणि पायांची

कफ स्लीव्हज् – हा प्रकार अलिकडे खूप फॅशनमध्ये दिसतो. ट्राऊझरवर घालायचे शर्टस्टाईल टॉप्स किंवा काही वेळा साडीवर वा लेहंग्यावर घातले जाणारे अतिशय फॅशनेबल क्रॉप टॉप्स, यात कफ स्लीव्हज् दिसतात. यात पुरूषांच्या फॉर्मल शर्टाची बाही जशी असते, तशीच बाही शिवलेली असते. म्हणजेच बाहीला मनगटाजवळ ‘कफ’ची फॅशन असते. काही वेळा या बाह्या घोळदार शिवल्या जातात, तर काही बाह्यांच्या कफच्या ठिकाणी एम्ब्रॉयडरी केलेली असते, तीही छान दिसते.