डॉ. स्वाती हजारे
स्तनपान पर्यायाने आईचे दूध याचा लाभ केवळ बाळालाच नाही तर आईलाही होत असतो. ते कसे ते सविस्तर पाहू. प्रथम बाळास होणारे लाभ पाहू यात.
बाळाला होणारे फायदे
१) बाळ जेव्हा जन्मास येते तेव्हा त्याच्या शरीरातील जैविक संस्था (उदाहरणार्थ – मेंदू – मज्जासंस्था, पचनसंस्था, श्वसन संस्था आणि इतरही) या अपक्व – कमी जास्त प्रमाणात असतात. म्हणून शरीरधारणासाठी आवश्यक प्रथिने, कार्बोदके आणि स्नेह (फॅट) तसेच इतरही आवश्यक तत्त्वे जसे की कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, झिंक, सोडियम-क्षार, क्लोराईड अशा अनेक तत्त्वांचे योग्य प्रमाण आईच्या दुधात असते; जे बाळाला त्याच्या वाढीसाठी पूरक असते आणि त्याचबरोबर त्याच्या शरीरावर पचनासाठी त्याचा भार न देता, अगदी हलक्या पद्धतीने ते पचवले व शोषले जातात.

आणखी वाचा : किती वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान द्यावे?

anushka sharma return to India with son akaay kohli and daughter vamika
अखेर वामिका अन् अकायसह भारतात परतली अनुष्का शर्मा, पापाराझींना दाखवली लेकाची झलक
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
premachi goshta fame actress Tejashree Pradhan sister Shalaka Pradhan is a wildlife photographer
अभिनेत्री तेजश्री प्रधानची बहीण कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या…

२) प्रतिजैविके – जन्मानंतर बाळ बाहेरच्या अनेक गोष्टींच्या संपर्कात येतानाच अनेक संसर्ग त्याला जडण्याची शक्यता असते. (व्हायरल, बॅक्टिरिअल आणि इतर इन्फेक्शन्स). या व्याधी / संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिजैविके / इम्युनोग्लोबिन, अँटीबॉडीज तसेच पांढऱ्या पेशी या मुबलक प्रमाणात आईच्या दुधातून बाळास मिळतात. त्यामुळे त्याची अनेक संसर्ग व्याधींविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते म्हणूनच तर दुधाला ‘पांढरे रक्त’ असे संबोधले जाते.
३) याचबरोबर लॅक्टोफेरिन नावाचे तत्त्व, लोह तत्व योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करते; ज्यामुळे बाळाचा पाहिल्या सहा महिन्यात तरी ॲनिमियापासून बचाव होतो. तसेच हे लेक्टोफेरिन काही विशिष्ट विषाणू, जीवाणूंबरोबरही लढून, बाळाचे या संसर्गातून संरक्षण करते.
४) ओल्गोस्कॅरीडस् ( Oligosaccharides) – हे जवळपास २०० प्रकारचे असतात तेही बाळाच्या मेंदूच्या वाढीपासून ते संसर्ग विरोधापर्यंतचे काम करतात. हे देखील केवळ आईच्या दुधातूनच बाळास मिळतात.

आणखी वाचा : किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?

५) काही पेशी ज्यांना HAMLET हॅम्लेट म्हणतात – त्या बाळाला भविष्यात होऊ शकणाऱ्या काही विशिष्ट कर्करोगांपासून बचाव करते.
६) मूल पेशी – आईच्या दुधातील या पेशींपासून इतर दुसऱ्यापेशी निर्माण करण्याची ताकद असते. (उदाहरणार्थ – मज्जापेशी, यकृतपेशी)
ही आणि अशी अनेक तत्त्वे आईच्या दुधात असल्याने ६ ते १२ महिन्यांच्या बाळाच्या नाजूक अवस्थेत त्याच्यासाठी महत्त्वाचे असते.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

इतर फायदे –
१) हे दूध बाळाला हवे त्यावेळी अगदी सहज उपलब्ध होते. म्हणजे आई बाळाला कधीही स्तनपान करू शकते, त्यासाठी कुठल्याही वेळ, स्थळाचे बंधन नसते.
२) तसेच आईच्या शरीराच्या तापमानानुसार दुधाचे तापमान असते, जे बाळासाठी योग्य असते.
३) स्तनपानाने आई आणि बाळ यांच्यामध्ये एक दृढ नाते तयार होते, जे बाळाला सुरक्षिततेची भावना देते आणि परिणामी त्याची मानसिक आणि बौद्धिक वृद्धी होते.
४) तसेच स्तनपान करणारी बाळे त्यांची भूक असेल तेवढ्या प्रमाणातच दूध पितात, ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या बाल्यावस्थेतील स्थूलता (Childhood Obesity) टाळता येऊ शकते.

आणखी वाचा : International Day of the Girl Child: एका दिवसासाठी ‘ती’ झाली भारतातील ब्रिटिश उपउच्चायुक्त

आईला होणारे फायदे

१) प्रसुतीनंतरच्या काळात आईला योनीमार्गे रक्तस्त्राव चालू असतो. मूल जेव्हा जेव्हा स्तनांवर दूध पिते, तेव्हा तेव्हा काही संप्रेरके स्रवून त्याचा परिणाम गर्भाशय पूर्ववत आकारास आणण्यास केला जातो. (म्हणजेच गर्भधारणेमुळे वाढलेला गर्भशयाचा आकार – कमी होतो) यामुळे होणारा रक्तस्रावही कमी होतो.
२) स्तनपान हा पुढील गर्भधारणा लांबविण्यासाठी असलेला नैसर्गिक उपाय आहे. कमीत कमी ६ महिने तरी. मूल फक्त स्तनपानावरील दुधावर असेल (म्हणजे कुठलेही पावडर – फॉर्म्युला मिल्क मुलाला दिले गेले नसेल) -तर गर्भधारणा रोखण्यासाठी मदत होते.
३) आईच्या गर्भधारणा ते प्रसवा दरम्यानच्या वजनवाढीस पुन्हा प्रसवानंतर पूर्ववत वजनावर आणण्याचे काम स्तनपान करते. कारण दूध तयार करण्यासाठी आवश्यक कॅलरीज आईच्या शरीरातूनच वापरल्या जातात.

आणखी वाचा : सुंदर मी होणार – डोळे आणि ओठांची काळजी

४) अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया स्तनपान करतात, त्यांना भविष्यातील संभाव्य गर्भाशय किंवा स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी असतो.
५) गर्भधारणेमध्ये किंवा प्रसवानंतर काही स्त्रियांना मानसिक आजार (नैराश्य, सायकॉसिस) होण्याची शक्यता असते किंवा ही शक्यता स्तनपानाने बहुतांशी कमी होते.
असे अनेक फायदे आई आणि बाळाला स्तनपानाने मिळत असतात. म्हणूनच आईने जेवढी वर्षे शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त वर्षे स्तनपान सुरू ठेवले तरी बाळ आणि माता यांच्या आरोग्यासाठी ते हितावह असते.
drswatihajare@gmail.com