पावसाळा कथा-कविता आणि चित्रपटांमध्ये कितीही ‘रोमँटिक’ वाटला, तरी पाऊस पडत असताना किंवा नुकताच पडून गेल्यानंतरच्या चिकचिकाटात बस-लोकल-रिक्षा-दुचाकीची कसरत करणं, धडपडत ऑफिसला पोहोचणं आणि तिथे दिवसभर काम करून संध्याकाळी पुन्हा तोच धडा गिरवत घरी परतणं किती कटकटीचं असतं हे आपणा सामान्यांनाच माहिती. (त्यातही पुरूषांचं बरं असतं हो! स्वत:चं आवरलं, की चालले ऑफिसला. घरी आल्यावर कोचावर पाय पसरून बसलं, की चहा येतोच हातात! काही पुरूष याचा हिरीरीनं प्रतिवादही करतील आणि ‘आम्ही अपवाद आहोत’ वगैरे सांगतील. पण किती घरांत खरोखरच असा ‘अपवाद’ असतो, ते घरातल्या ‘चतुरा’ सांगतील तुम्हाला!) आजच्या ‘वर्किंग विमेन’ चतुरांना नुसतं ऑफिसचं काम करून मोकळं होता येत नाही. घरातल्या कामांचं नियोजन डोक्यात सतत घोळत असतं, मग अगदी कामांना मदतनीस असतानाही! त्यात पावसाळ्यात रोज कामावर जाताना कोणते कपडे घालायचे हा एक स्वतंत्र प्रश्न असतो. (एकतर नुसते गॅलरीत वाळत टाकलेले कपडे वाळता वाळत नाहीत, मग खोल्यांमध्ये दोऱ्या बांधा किंवा खुर्च्या मांडा आणि टाका वाळत- पंखा फुल्ल स्पीडमध्ये लावून! किती समस्या सांगाव्यात!) आज मात्र आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या अवलंबल्या तर पावसाळ्यात तुमचा ‘कपडे कोणते घालू?’ हा प्रश्न चुटकीसरशी सुटेल आणि नियोजनातला थोडा वेळ वाचेल.

लांबलचक कुर्ता या दिवसांत नको. हलकीफुलकी शॉर्ट कुर्ती किंवा ट्युनिक वापरण्यासाठी हे दिवस उत्तम आहेत. तुम्हाला शॉर्ट कुर्ती किंवा ट्युनिक्स आवडत नसतील किंवा ऑफिसला घालायला योग्य वाटत नसतील, तरी एक उपाय आहे. हल्ली कॉटन, लिनन, व्हिस्कॉस रेयॉन वा प्युअर पॉलिस्टरचे ‘शर्ट स्टाईल’ किंवा ‘मँडरिन कॉलर’ कुर्ते मोठ्या प्रमाणावर मिळू लागले आहेत. असे ‘नी लेंग्थ’ वा ‘अबॉव्ह नी लेंग्थ’ कुर्ते या दिवसांत ऑफिसला घालण्यासाठी सुटसुटीत ठरतील.
आणखी वाचा : बायकांनो, दाढी केलीत का?

How to recognize that body water is decreasing in summer and How do you care
Health Special: उन्हाळ्यात शरीरातले पाणी घटते आहे ते कसे ओळखाल? काळजी कशी घ्याल?
leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य

व्हिस्कॉस रेयॉन आणि पॉलिस्टर कापड भिजलं, तरी लगेच वाळतं. कॉटन आणि लिनन वाळायला वेळ लागत असला, तरी कपड्याला जर कॉटनचं अस्तर लावलेलं नसेल आणि मूळचं कापड फार जाड नसेल, तर त्यात हवा खेळती राहून ते लवकर वाळेल. कॉटनचं अस्तर असलेले कुडते वाळायला मात्र जास्त वेळ लागतो. त्यामुळे या दिवसांत कुडत्यांचं अस्तर सिंथेटिक कापडाचं किंवा कुर्ता चांगल्या कापडाचा, पण बिनाअस्तरचा असला तर बरं.

घोळदार सलवारी, पटियाला, जमिनीवर रुळणाऱ्या पलाझो, कॉटनच्या चुडीदार आणि चुडीदार लेगिंग हे कपडेही सारखा पाऊस पडणाऱ्या स्थळी घालायला योग्य नाहीत. त्याऐवजी कमी जाडीच्या कॉटन वा लिननपासून शिवलेल्या, खास कुर्त्यांवर घालण्यासाठी मिळतात त्या ट्राउझर, सिगारेट पँटस् , क्रॉप्ड पलाझो, अँकल लेंग्थ लेगिंग उत्तम. एरवी सहसा घातल्या न गेल्यामुळे नुसत्या पडून राहाणाऱ्या घोट्यापर्यंतच्या कमी घोळदार धोती पँटस् या दिवसात वापरून पाहाता येतील.
आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

monsoon fashion
  • मोठ्या ओढण्या, दुपट्ट्यांचे हे दिवस नव्हेत. त्याऐवजी पॉलिस्टर वा जॉर्जेटचे स्टायलिश स्कार्फ वापरता येतील.
  • अनेक कपड्यांचा (विशेषत: कॉटन) नवीन असताना रंग जातो. अगदी लाल रंगासारख्या भडक रंगांच्या लेगिंगचाही रंग जातो. तुम्हाला दररोज थोडंतरी भिजावं लागत असेल, तर कपडे निवडताना ही गोष्ट डोक्यात ठेवणं आवश्यक.
  • अनेकदा वेस्टर्न ट्राउझर्ससुद्धा आपल्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या असतात आणि आपण त्या दरवेळी खालून दुमडतो. पण पावसाळ्यात पाण्यातून प्रवास करताना ट्राउझर भिजली, चिखल उडला, तर खालच्या दुमडलेल्या घड्या बराच वेळ ओल्याच राहतात. अशा वेळी ट्राउझर अल्टर करून घेतलेली चांगली. किंवा घेतानाच क्रॉप्ड लेंग्थ ट्राउझर घ्यावी.

आणखी वाचा : ‘स्पोर्टस् ब्रा’चं कोडं

  • साधारणपणे कॉर्पोरेट ऑफिसेसना पाश्चात्य कपड्यांचं काहीही वावडं नसतं. ‘इन-शर्ट’बरोबर नीटनेटका ‘लूक’ देणारे नी-लेंग्थ स्कर्ट- मग तो फॉर्मल ए-लाईन स्कर्ट असो किंवा पेन्सिल स्कर्ट- हे पावसाळ्यात उत्तम.
  • पावसाळ्यातलं कुंद, दमट वातावरण सगळीकडे एक उदासवाणा, शिथिलतेचा ‘फील’ आणतं. अशा ‘डल’ वातावरणात कपड्यांमध्ये ‘डल’ रंग वापरणं टाळावं. या दिवसांत ‘मूड’ ताजातवाना व्हावा यासाठी पिवळा, केशरी, गुलाबी, निळा, वाईन रेड अशा रंगांचे कपडे वापरावेत, असं फॅशन तज्ज्ञ सांगतात.
  • पांढरे कपडे तर मुळीच नको! (एकतर चिखल उडण्याची भीती असते आणि भिजल्यावर पांढऱ्या आणि फिकट रंगांच्या कपड्यांतून आरपार दिसतं, तो धोका वेगळा.)