22 August 2017

News Flash

प्रेसिडेंट पॉटर

‘‘यांच्या नेतृत्वाखाली काम करावयास मिळणे, हे आमचे भाग्यच.’’

लोकसत्ता टीम | Updated: June 15, 2017 3:11 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

ट्रम्प यांनी मंत्रिमंडळ बठकीचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जे झाले ते पाहून सारे बधिरावस्थेतच गेले..

‘‘यांच्या नेतृत्वाखाली काम करावयास मिळणे, हे आमचे भाग्यच.’’ ‘‘असा नेता देशाला मिळणे या इतकी मोठी बाब अन्य नाही.’’ ‘‘इतकी कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या देशाच्या इतिहासात फारच कमी प्रसंगी नेतृत्वस्थानी राहिली आहे.’’ ‘‘आपल्या देशाच्या इतिहासात इतका मोठा करकपातीचा निर्णय घेण्याचे धर्य अन्य कोणाही नेत्यांत नाही.’’ ‘‘आपल्या देशप्रमुखांनी इतक्या अल्प वेळात इतके निर्णय घेतले आहेत की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकत नाही’’. ‘‘अशा नेत्यांचा उपप्रमुख म्हणून माझी निवड होणे याइतके गौरवास्पद अन्य काही नाही.’’ ‘‘..’’ वगैरे वगैरे वगैरे.

वाचकहो! ही सारी विधाने आपणा सर्वास अतिपरिचयाची असली आणि ती आपले जनप्रिय नेते वेंकय्याजी नायडू यांच्या मुखातून निघालेली आहेत असा आपला भास होणे साहजिकच असले तरी गरसमज करून घेऊ नका. ती आपल्या देशातील नाहीत. अर्थात काही खवट वाचक यात एका वाक्याची भर घातली तर हे सारे आपलेच वाटेल असे म्हणतील. ते विधान म्हणजे आपल्या नेत्यांस थेट परमेश्वराचा अवतार ठरवणे. ते फक्त या विधानांत झाले नाही. असो. काय झाले नाही, हा काही येथील मुद्दा नाही. तर काय आणि कोठे झाले ते येथे महत्त्वाचे आहे. झाले ते असे की एकापाठोपाठ एक मंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळप्रमुखाची इतकी तारीफ केली की ती ऐकून सारा देश सुन्नच झाला. अनेकांना आपली श्रवणक्षमता कायमची गेली तर बरे, असे वाटोन गेले. नको नको.. हे असले ऐकणे नको, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. तर काही अति शहाणे होते ते स्वत:च्या मनास प्रश्नकत्रे झाले : आपल्या देशाचे नाव उत्तर कोरिया असे तर नाही वा आपण सारे अचानक प्याँगवाँग येथे स्थलांतरित झालो नाही. पण नाही ते खरे नव्हते. खरे होते ते हे असे एकापाठोपाठ मंत्र्यांचे आपल्या नेत्याचे आरती गाणे. पण हे वाचोन आपणास असा प्रश्न पडू शकेल की हे सारे देशवासीयांच्या कानावर पडलेच कसे?

या प्रश्नाच्या उत्तरात तर खरी मेख आहे. ती अशी की या साऱ्याचे थेट प्रक्षेपण की हो झाले. म्हणजे खासगी, सरकारी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्वच वाहिन्यांनी या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करीत तितकाच ऐतिहासिक प्रसंग घराघरांत पोहोचवला. त्यातील दोन वाहिन्या भलत्याच आगाऊ. त्यांना काही हे सहन होईना. देशाच्या इतिहासात असे काही झालेले नाही, असे त्यांचे म्हणणे. ते खरेच. परंतु तरीही समोर जे काही आरतीगान सुरू आहे त्यामुळे आपल्या तटस्थतेस मोठी बाधा पोहोचेल असे त्यांचे म्हणणे पडले आणि अखेर कानावर हात ठेवत या आरतीगान समारोहाचे थेट प्रक्षेपण त्यांनी बंदच केले. किती हा कर्मदरिद्रीपणा त्यांचा. प्रेस्टिटय़ूट्स कुठले. नेत्यांचे गुणगान इतक्या तगडय़ा वृत्तवाहिन्यांनादेखील झेपले नाही यावरून वाचकहो, कल्पना करता येईल की त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल.

तर असा प्रसंग घडला तो सांप्रत काळी जगात एकमेव असलेल्या महासत्तेच्या केंद्रस्थानी. म्हणजे व्हाइट हाऊसात. होय होय. तेच ते. अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान, कार्यालय इत्यादी. यात काहीही अतिशयोक्ती नाही. या महासत्तेचे प्रमुख जे की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्यावहिल्या संपूर्ण मंत्रिमंडळ बठकीचे कामकाज थेट प्रक्षेपित करावयाचा निर्णय घेतला आणि समस्त अमेरिका आणि सीएनएन, एनबीसी, फॉक्स अशा तगडय़ा वाहिन्यांच्या जगभरातील प्रेक्षकांचे डोळे, कान आदी सर्व जाणिवावयवांचे पारणेच की हो फिटले. ही घटना घडून २४ तासांहून अधिक काळ उलटला असला तरी अमेरिकी प्रशासनादी क्षेत्रांतील सर्व कर्मचारी तसेच नागरिक अजूनही बधिरावस्था अनुभवत असून या नागरिकांना बसलेला मानसिक धक्का इतका तीव्र आहे की अचानक देशभरातील सर्व मानसोपचारतज्ज्ञांकडे रांगा लागल्या आहेत. सर्व अमेरिकी वृत्तवाहिन्यांनीही आपल्या देशप्रमुखाच्या मानसिकतेचे विश्लेषण करण्याचे काम पुन्हा नव्याने सुरू केले असून असा कसा आपला अध्यक्ष या प्रश्नाने वार्ताहरविश्वाचे मस्तक अजूनही गरगरत आहे. ट्रम्प यांचे मंत्रिगणही असे थोर थोर की त्यांनी आपण जे काही बोललो ते परत बाहेर येऊन आपापल्या खात्यांतून ट्वीटदेखील केले आणि हे सर्व सुरू असताना ट्रम्प महाशयांना पाहणे म्हणजे कैवल्यानंदच. तो अनुभव एकदम आध्यात्मिकच तसा. मंत्रिगण एकापाठोपाठ एक आपले गुणगान करीत आहेत, आपल्यावर कौतुकफुलांचा वर्षांव करीत आहेत आणि गोरेगोमटे, श्वेतकेशधारी डोनाल्ड आपल्या चेहऱ्यावरील स्मित या कानापासून त्या कानापर्यंत पसरवीत या समूहगानाचा आनंद घेत आहेत, असे ते दृश्य. डोळ्यांचेच नव्हे तर बुद्धीचेही पारणे फेडणारे. समस्त जगाने ते याचि देही याचि डोळा पाहिले. हे येथेच संपत नाही बरे. व्हाइट हाऊसात असे समूह कौतुकगान सुरू असताना तिकडे बाहेर ट्रम्पभक्तांनीही आपापल्या परीने आपल्या नेत्याच्या ऐतिहासिक क्षमतेवर कौतुकाक्षतांचा वर्षांव केला. अशा तऱ्हेने समस्त अमेरिका ट्रम्प रंगी रंगलेली पाहायला मिळाली. दुर्मीळच क्षण तो.

त्याची झिंग उतरल्यावर अमेरिकेत आता चर्चा सुरू झाली असून मंत्रिमंडळाच्या बठकीचे असे थेट प्रक्षेपण करावे किंवा काय असा प्रश्न चíचला जात आहे. अमेरिकेतील तमाम प्रसारमाध्यमांनी या घटनेचे मिळेल तितके वर्णन केले असून त्यातून एक बाब तेवढी समोर येते. ती म्हणजे या प्रसारमाध्यमांना बसलेला धक्का. मंत्रिमंडळाच्या बठकीत अनेक महत्त्वाचे, देशहिताचे, परराष्ट्र संबंधांचे मुद्दे चर्चिले जातात. परंतु आपला अध्यक्ष मंत्रिमंडळ बठकीस असा चव्हाटय़ावर आणू लागला तर आपले कसे होणार, असा प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना पडलेला आहे आणि माध्यमांनीही तोच मुद्दा समोर मांडला आहे. परंतु वेगळे काही करून दाखवणे हेच ट्रम्प महाशयांचे मोठेपण असल्यामुळे त्यांना या प्रश्नांची जराही काळजी नाही. परत ते प्रश्न मांडणाऱ्यांना प्रेस्टिटय़ूट्स, फेक न्यूज आदी शेलक्या शब्दभूषणांनी घायाळ करण्यास स्वत: अध्यक्ष आणि त्यांचा भक्तगण असे दोन्हीही तयार असल्याने सगळ्यांचीच पंचाईत.

टाइम साप्ताहिकाच्या एडी गॉर या स्तंभलेखकाने ट्रम्प यांच्या या वर्तनाचे वर्णन थेट हॅरी पॉटर या बालनायकाशी केले. खरे तर एडी हे ट्रम्प यांच्या या वर्तनाच्या विश्लेषणासाठी महालेखक शेक्सपिअर याच्या ज्युलियस सीझर याचा आधार घेणार होते. परंतु हे सांस्कृतिक वजन अध्यक्षांना काही पेलवणार नाही, हे जाणवल्यामुळे त्यांनी चार पायऱ्या खाली येऊन पॉटर याचा आसरा घेतला. पॉटर याच्या कादंबरीतील लॉर्ड वोल्देमॉर्ट यांची व्यक्तिरेखा म्हणजे जणू ट्रम्पच असे त्यांचे म्हणणे. हा लॉर्ड कमालीचा आत्मकेंद्री असतो आणि शेवटी शेवटी तो आपण स्वत: सोडून अन्य कोणासही जगण्याचा अधिकार नाही, असे मानू लागतो. नंतर आपल्या या आरती गाणाऱ्या सहकाऱ्यांना ट्रम्प असेच म्हणणार आहेत असे या एडींचे भाकीत. असो. त्याच वेळी भारतात मात्र ट्रम्प यांच्या या वर्तनाने भाजपमध्ये वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. पारदर्शी कारभारासाठी मंत्रिमंडळ बठकीचे थेट प्रक्षेपण करा ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली सूचना ट्रम्प यांच्यापर्यंत कशी पोहोचली ही ती चिंता. तिचे निराकरण करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी अमेरिकाभेटीत ट्रम्प यांच्याकडूनच करून घ्यावे असेही काही भाजप नेत्यांना वाटू लागले आहे. परंतु ते होईपर्यंत सर्वानी हॅरी पॉटर वाचावे असे फर्मान निघाल्याचे कळते.

First Published on June 15, 2017 3:11 am

Web Title: donald trump devendra fadnavis uddhav thackeray bjp shiv sena narendra modi
 1. D
  DINESH GULVE
  Jun 17, 2017 at 7:36 pm
  मा. संपादक महोदय, यांना माफ करा... मा, सर, काही गण आपणास अत्यंत हलक्या शब्दात प्रतिक्रिया देतात, हा त्यांचा दोेष नाही, असते एकेकाची बुद्धी. आपण बीड येथे आला होतात, तेव्हा म्हणाले होतात, जो पर्यंत ा लोक शिव्या देतात, तो पर्यंत माझे काम चांगले आहे, असे मी मानतो. काँग्रेस सत्ता होती तेव्हा लोक तुम्हाला संघवाले म्हणायचे, आज काँग्रेसवाले म्हणतात... ज्यांनी तुमचे तीन वर्षापूर्वीच लेख वाचलेत त्यांना समजेल तुमची भूमिका, असो. गण गोत खवळेल...
  Reply
 2. N
  Nikhil Asawadekar
  Jun 17, 2017 at 7:38 am
  क्या बात है! मस्तच अग्रलेख!!
  Reply
 3. S
  Shreekant Tare
  Jun 16, 2017 at 3:42 pm
  तुम्हाला काय त्रास आहे यार? ते ट्रम्प महाशय तुमच्या एयर क्न्डीशिय्न ऑफिस पासून साडे बारा हजार किमी लांब बसलेत मडमेला कुशीत घेऊन.बरं, त्यांनी किंवा त्यांच्या कुणा कार्याने कधी 'काय कुबेर साहेब, आज काय बोलू बैठकीत हे पाठवा ना लिहून' असं तुम्हाला म्हटल्याचं ऐकिवात नाही. उगाच 'कुणाची म्हैस अन कुणाला उठबैस...............'
  Reply
 4. K
  Kiran vyas
  Jun 16, 2017 at 12:57 pm
  तुम्ही नेहमीच मोदी,ट्रम्प यांना टिकेचे धनी बनवता. सरकारविरुद्ध बोलणे हे लोकशाहीचे प्रमाणच आहे परंतु त्यांच्याबद्दल थोडेफार चांगले सुद्धा वाचायला आवडेल. उगाचच लोकशाहीमध्ये ते निवडून आलेले नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
  Reply
 5. कपिल पाटील
  Jun 15, 2017 at 6:24 pm
  अरे रे प्रशांशा पचाली नाही आणि लेख हि पचली नाही काय निष्कर्ष काढायचं तेच समजलं नाही।
  Reply
 6. S
  suresh deuskar
  Jun 15, 2017 at 6:02 pm
  अग्रलेखावरील प्रतिक्रिया वाचणे हा एक बौद्धिक(?) आनंदाचा भाग बनला आहे. आपल्या देशात, राज्यात बौद्धिक संपदा इतकी उच्चं (हुच्च् नव्हे) आहे याचे दर्शन होते. प्रतिक्रियाकारांचा आभारी आहे.
  Reply
 7. समीर देशमुख
  Jun 15, 2017 at 5:31 pm
  रामदास भामरेच्या नावाने प्रतिक्रिया देणाऱ्या समुदाय विशेष च्या माणसा, जर संस्कृत भाषा कळत नसेल तर सरळ सरळ मराठीत लिही नाहीतर तुझ्या मातृभाषेत लिही. जर अमेरिकेचा उल्लेख करायचा तर गीतेतील श्लोकातून 'भारत' हा शब्द काढून टाक आणि तिथे अमेरिकेचा उल्लेख कर. जर भारतात अधर्म वाढला तर भगवान श्रीकृष्ण अमेरिकेत कशाला जन्म घेतील?
  Reply
 8. N
  narendra
  Jun 15, 2017 at 3:29 pm
  मंत्रिमंडळ बैठकीचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण ही मूळ कल्पना उद्धवजींची आहे त्यांच्या या कल्पनेची निमूटपणे कार्यवाही डोनाल्डजींनी खरेच करून दाखवली याबद्दल दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले पाहिजे त्यांच्यातील अतूट मैत्रीचा फायदा मोदीजींनी देशसेवेसाठी करून घ्यावा .
  Reply
 9. R
  raj
  Jun 15, 2017 at 2:22 pm
  नायडू आठवले पण डुप्लिकेट गांधी कुटुंबाची पंटर गिरी करणारे तुमचे लोक नाही आठवले?
  Reply
 10. T
  Tempo Inst
  Jun 15, 2017 at 1:49 pm
  चान्गला लेख. मेख लक्षात आली. भक्तांचे दिवस आहेत.
  Reply
 11. R
  rmmishra
  Jun 15, 2017 at 1:42 pm
  वाSS, वाSS, फारच छान उपरोधिक अग्रलेख! अभिनन्दन! मजा आलि वाचतान्ना। साम्प्ररतकालिन सर्वच सत्तधिका-यान्ना लागु।
  Reply
 12. S
  Shrikant Yashavant Mahajan
  Jun 15, 2017 at 1:09 pm
  उध्दव ठाकरेंनी सर्वप्रथम मातोश्रीत कँमेरे लावून त्याचे प्रक्षेपण सर्व शाखांकडे पोहचेल असे करावेम्हणजे सर्व देणी घेणी व्यवहार पारदर्शी होतील. माझा तर संशय असा आहे की, उध्दवंना आपले मंत्री काय बोलतात वा गप्प राहतात यांचा खराखुरा वृत्तांत मिलत नाही वाटतय
  Reply
 13. R
  Ramdas Bhamare
  Jun 15, 2017 at 12:59 pm
  यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् in USA ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि in USA ॥
  Reply
 14. G
  Giri
  Jun 15, 2017 at 11:04 am
  ह्या अग्रलेखाची खरी मेख वेगळीच आहे - जर सगळे समोरासमोर झाले तर माध्यम म्हणून आपल्याला कोण विचारणार ,आपण कश्याप्रकारे एकाची बाजू घेऊन बातम्या कश्या दाखविणार, आपण उघडे पडणार म्हणून ह्या अग्रलेखाचा प्रपंच. आज तिकडे झाले उद्या इकडे होईल म्हणून हा खटाटोप. (टीप: ा काही ट्रम्पशी घेणे देणे नाही, तो त्याच्या देशात सुखी मी माझ्या देशात)
  Reply
 15. U
  umesh
  Jun 15, 2017 at 10:57 am
  निर्थक विषयावरील निरर्थक संपादकीय हे संपादकीय कुबेर यांनी लिहिले नाही हे ज कळते कारण ते प्रेस्टिट्यूट्स वगैरे शब्द वापरून संपादकीयाला खालच्या पातळीवर आणणार नाहीत बाकी लोकसत्ता महाप्यातून निघतो की वॉशिंग्टन डीसीतून असा प्रश्न पडला आहे लोकसत्ताने खास अमेरिकन मतदारांना शिक्षित करुन पुढील वेळेस तरी त्यांनी ट्रंप यांच्यासारख्या कुबेरशत्रुला निवडून देऊ नये म्हणून पोटोमॅक नदीकाठी कार्यालय थाटलेले दिसते
  Reply
 16. A
  Ashutosh Patekar
  Jun 15, 2017 at 10:54 am
  . फार गडबडीत लिहिलेला वाटतोय..
  Reply
 17. S
  Somnath
  Jun 15, 2017 at 10:34 am
  ट्रम्पग्रस्त कुबेर राज्या लष्कर प्रमुखांवर वावदूकगिरी लेख लिहिण्यासाठी लेखणीपेक्षा मेंदू जास्त वळवळ करत होता आता लष्कर प्रमुखाची तुलना सडक छाप गुंडांशी करणाऱ्या तुमच्या लाडक्या प्रवक्त्यावर लेख कधी खरडणार का तुमच्या मेंदूची वळवळ थांबून नेहमीप्रमाणे मळमळ आणि ओकाऱ्या सुरु झाल्यात मोदी आणि ट्रम्प यांच्या नावाने.पॉटर हा शब्द तुम्हाला तंतोतंत लागू पडतो.एका प्रादेशिक पेपरचे संपादक आहेत याची तरी जाणीव ठेवा. अखंड भक्तीत आणि डुप्लिकेट गांधी घराण्याची आरती ओवाळणारे प्रतिक्रिया द्यायला पिसाळल्यागत तुटून पडतील.
  Reply
 18. S
  Somnath
  Jun 15, 2017 at 10:11 am
  याड लागलं र याड लागलं ट्रम्प,मोदी यांचं याड लागलं. त्रुम्पग्रस्त संपादक साहेब या लेखाला अग्रलेख म्हणावा का प्रहसन म्हणावे हेच आम्हा पामर वाचकांना सांगा आणि अशी कोणती घटना घडली कि लगेच तुम्ही सातासमुद्राच्या पल्याड उडी मारून तुम्ही अचानक फक्त मानाने व्हाईटहाऊस मध्ये स्थलांतरित होतात आणि ज्याच्याशी देणे घेणे नाही त्या गोष्टींवर द्वेषमूलक सडक छाप लेखणी खरडून वाचकांना भ्रमित करावे.गांधी घराण्याची आरती ओवाळणाऱ्यानी दुसऱ्याला उपदेशाचे पांचट आणि बेचव ढोस पाजू नये.बालबुद्धीच्या थोराड युवा नेता राहुल मध्ये असे कोणते गुण ठासून भरलेले आहेत आणि ते एवढे उतू जात आहे कि ते सर्वोच्य पदावर विराजमान झाल्यावर उतू जाणार नाहीत यावर एकदा तरी लेखणी खरडुनी सडक छाप का होईना आरती ओवाळणारा लेख लिहावा.वाचक आनंदाने डोळ्यात तेल घालून वाचतील.फक्त गांधी घराण्याचीच आरती ओवाळायची असा कायदा करण्यासाठी खरे तर तुमच्यासारख्यानी वावदूकगिरी करण्यापेक्षा पुढाकार घ्यावा तेवढेच लेखणी खरडण्यापेक्षा गांधी घराण्याचे पुण्य मिळेल कि ते तेहतीस कोटी देवांचे मिळणार नाही.
  Reply
 19. प्रसाद
  Jun 15, 2017 at 9:19 am
  अमेरिकन सत्ताधाऱ्यांचे आत्मकेंद्रित वर्तन आणि सत्तेच्या वळचणीला राहणाऱ्यांचे 'अहो रूपं, अहो ध्वनि' वाचून भारतातील अनेक प्रसंग आठवतात. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे नेत्याला अजून परमेश्वराचा अवतार ठरवले जाणे फक्त बाकी आहे. पण आपण त्यापासून फार दूर नाही. देवकांत बारुआ यांची सुप्रसिद्ध 'इंदिरा इज इंडिया' ही आरती हेच सिद्ध करते. राजीव गांधींनी भर पत्रकार परिषदेत वेंकटेश्वरन या कार्यक्षम अधिकाऱ्याला दिलेला डच्चू आठवतो. तेव्हाही तेथे उपस्थित समस्त जागतिक पत्रकारवर्गाचे आणि तो प्रसंग टीव्हीवर 'लाइव्ह' पाहणाऱ्यांचे डोके ती आत्मकेंद्रित कार्यपद्धती पाहून गरगरू लागले होते. अलीकडे राहुलजींनी आत्मप्रौढी मिरवण्याच्या नादात आपल्याच सरकारचा अध्यादेश भर व्यासपीठावर पंतप्रधानांच्या देखत टरकावून कसा फेकला तेही आठवते. तमिळनाडू सारख्या राज्यात तर नेत्यांना / अभिनेत्यांना देवच मानून त्यांची मंदिरे बांधली जातात. आपल्याकडे 'क्रिकेटचा देव'ही आहेच! तेव्हा या बाबतीत आपण महासत्तेच्या फार मागे नाही याचा अभिमान बाळगला पाहिजे!
  Reply
 20. H
  Hemant Kadre
  Jun 15, 2017 at 9:08 am
  अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रंप यांची निवड झाली व लोकसत्ता संपादकांचा अंदाज पार चुकल्याचे सिध्द झाले. समंजस व्यक्ती असेल तर अंदाज चुकल्याचे खुल्या दिलाने मान्य करते पण गिरीष कुबेर असे मान्य करण्यास तयार नसावेत असे दिसते. अमेरिकी अध्यक्षांमध्ये एकही चांगला गुण नाही असे आपण ध्वनीत करता. त्यांची स्तुती झाली की तुमचा जळफळाट होतांना दिसतो. लगेच ट्रंप यांची स्तुती करणाऱ्यांना 'भक्त' नावाने संबोधण्यास सुरूवात करता. अत्रे, माडखोलकर, गीळ, कुरंदकर यांचे 'वक्रोक्ती' लेख मी वाचले आहेत पण तुम्ही या सुंदर शैलीचा अगदी पचका केला. लोकसत्तासारख्या दैनिकाच्या संपादकांना भाषाशुध्दीकरिता सांगावे लागणे म्हणजे कलीयुगच! "हे रामचंद्र कह गए ...." ची आठवण होते.
  Reply
 21. A
  anand
  Jun 15, 2017 at 9:06 am
  बाष्कळ बडबड म्हणजे हा अग्रलेख
  Reply
 22. Load More Comments