‘अनलॉकर’ हे  मोफत अँड्रॉइड अ‍ॅप फोन अनलॉक करण्यासाठी सादर करण्यात आले असून ते अँड्रॉइड फोनची लॉक केलेल्या स्क्रीनचे रुपांतर माहिती व मनोरंजनात करतो. हे अ‍ॅप वापरणाऱ्याने अ‍ॅक्सेस केलेल्या कंटेटनुसार लॉक स्क्रीनमध्ये बदल करतो. हे एप्प रुपये किंवा यूकॉइन्सच्या (अनलॉकरचे रिवॉर्ड पॉइंट्स) स्वरुपात बक्षिस देते, ज्याचा उपयोग यूशॉप या अनलॉकरच्या शॉपिंग पोर्टलवर वेगवेगळी डील्स, सवलत, शॉिपग व्हाउचर किंवा बोली लावण्यासाठी करता येईल.
लॉक स्क्रीनवरील कंटेन्टचे वेगवेगळ्या चॅनेलमध्ये वर्गीकरण केले जाते झ्र् त्यात इनक्रेडिबल इंडिया, हू सेड इट!, आरओएफएल, फंडू फॅक्ट्स, ब्लास्ट फ्रॉम पास्ट, गर्ल गँग, स्पोर्ट्स अपडेटस्, वंडर्स फॉर लाइफ, बिझनेसविषयी बातम्या, सिनेमाचे परीक्षण आणि राष्ट्रीय बातम्या यांचा समावेश आहे. यूजर आपल्या आवडीनुसार पाहिजे ते चॅनेल सबस्क्राइब करून त्याच्या यूस्क्रीनवर मनोरंजनाची सोय करून घेऊ शकतो.
पुलकित आहुजा, संचालक, टेक्नॉलॉजी आणि ऑपरेशन्स, अनलॉकर म्हणाले, ह्लू?जर फोनवर नेहमी ज्या गोष्टी करत असतात त्याच करण्यासाठी आम्ही त्यांना बक्षिस देतो आणि त्यांचे मनोरंजनही करतो. अनलॉकरने आणलेल्या जबरदस्त लॉक स्क्रीन चॅनेल्समुळे यूजर्सना क्रांतीकारी तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येणार असून त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.