कर्जफेडीत तीन लाखांची सूट; अ‍ॅक्सिस बँकेची शुभ आरंभकर्ज योजना

नियमित कर्ज भरणाऱ्या गृह कर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करणारी योजना खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँकेने सादर केली आहे. मात्र त्यासाठी ३० लाख रुपयेपर्यंत व २० वर्षे कालावधीसाठी कर्ज घेतलेले असावे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्जदारांना कर्जाचा एकही हप्ता चुकविता येणार नाही.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Security guards have fake police character verification certificates
पिंपरी : धक्कादायक! सुरक्षारक्षकांकडे बनावट पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे
free medical facility to employees on election duty
नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

वार्षिक ८.३५ टक्के गृह कर्ज असलेल्या या योजनेमुळे गृह कर्जदारांचे मुद्दल आणि व्याज असे धरून ३ लाख रुपये या कालावधीत बचत होणार आहेत. २० वर्षांच्या कर्ज कालावधीत चौथ्या, आठव्या आणि १२ व्या वर्षांत कर्जदाराचे प्रत्येकी चार हप्ते माफ केले जाणार आहेत.

अ‍ॅक्सिस बँकेचे कर्ज नियमित भरणाऱ्यांसाठी असलेली ही ‘शुभ आरंभ’ विशेष योजना गुरुवारी येथे सादर करण्यात आली. बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आनंद यांनी तिची वैशिष्टय़े पत्रकार परिषदेत सांगितली. काही हप्ते माफ केल्यामुळे बँकेच्या व्याजातून होणाऱ्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होईल, अशी शक्यता आनंद यांनी यावेळी फेटाळून लावली. उलट या अनोख्या योजनेमुळे आवश्यक घटकांमध्ये कर्जाच्या वितरणात वाढ होईल, असा दावाही त्यांनी केला.

या नव्या उत्पादनाद्वारे परवडणाऱ्या दरातील घरांना प्रोत्साहन देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या एकूण किरकोळ कर्ज हिश्श्यामध्ये परवडणाऱ्या दरातील घरांसाठी दिलेल्या कर्जाचे प्रमाण अवघे पाच टक्के आहे. सध्या या गटासाठी बँकेची आशा होम फायनान्स नावाने ही योजना आहे.

हप्तेमाफी..

  • जर ३० लाख रुपयांचे गृह कर्ज २० वर्षांसाठी घेतले गेले. वार्षिक ८.३५ टक्के व्याजदराने त्याचा २५,७५१ रुपये कर्जफेडीचा मासिक हप्ता बसेल. जर कर्जदाराने प्रामाणिकपणे व नियमित कर्जफेडीची कामगिरी केली आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या नव्या योजनेचा तो लाभार्थी ठरला, तर त्याला ३० लाखाच्या कर्जावर एकूण १,२३,४५६ रुपये मुद्दल माफ होईल. एरवी या कर्जफेडीच्या संपूर्ण मुदतीत गृहकर्जदाराकडून होणारी एकूण परतफेड ही ६१,८०,१४१ रुपये असेल. मात्र नव्या योजनेनुसार त्याला ५८,७१,१३४ रुपयेच कर्जफेड करावी लागेल. म्हणजेच व्याजफेडीसह त्याची एकूण बचत ३,०९,००७ रुपये होईल.