सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांमधील ८८०० हून अधिक  नोकरभरतीसाठी परीक्षेचा कार्यक्रमाची  बँक भरती मंडळाची (आयबीपीएस) जाहिरात अलिकडेच प्रसिद्ध झाली आहे. ‘प्रोबेशनरी ऑफिसर्स’ पदासाठी भरतीची चालू वर्षांतील सहावी परीक्षा आहे. तर खासगी क्षेत्रातून नव्याने परवाना मिळविलेल्या बँकांमधून वर्षभरात तब्बल २५ हजाराच्या घरात नोकरभरती होणे अपेक्षित आहे. विशेषत:  ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांना यात संधी मिळणे अपेक्षित आहे. नवागत बंधन बँकेने तर गत वर्षभरात ८,५०० च्या घरात कर्मचारी भरतीची प्रक्रिया पूर्णही केल्याचे स्पष्ट केले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून सार्वत्रिक बँकिंगसाठी परवाना मिळविलेल्या दोन बँकांपैकी ती एक आहे. तर नवागत ११ देयक (पेमेंट) बँका व सूक्ष्म वित्त बँकांनीही नोकरभरतीच्या आपापल्या योजना जाहीर केल्या आहेत.

बंधन          ८,५००

आयडीएफसी     २,०००

उज्जीवन ३,०००

जनकलक्ष्मी     २,०००

दिशा   २,०००

उत्कर्ष मायक्रोफायनान्स   २,०००

सूर्योदय        ३००

एयू फायनान्शियर्स ५००-१,०००

कॅपिटल लोकल एरिया बँक ५००-१,०००

इक्विटास होल्डिंग्ज      ५००-१,०००

आरजीव्हीएन मायक्रोफायनान्स ५००-१,०००

एकूण ११ देयक बँकांकडून प्रत्येकी किमान ४५ या तऱ्हेने साधारण ५०० कर्मचारी भरती अपेक्षित आहे.

 

 

छोटय़ा व्यापाऱ्यांना खेळत्या भांडवलाच्या साहाय्यासाठी इंडीफाय आणि सुविधा इन्फोसव्‍‌र्हची भागीदारी