एस्कॉर्ट्स या ट्रॅक्टर बनविणाऱ्या कंपनीतर्फे बुधवारी ‘फेरारी-जे’ आणि ‘फार्मट्रॅक-एक्झिक्युटिव्ह सिरीझ’ हे दोन नवीन ट्रॅक्टर सादर केले.
फेरारी- जे हा २६ एचपी ट्रॅक्टर बागायती आणि द्राक्षमळ्यांसाठी बनविण्यात आला असून लवकरच तो देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
चार समान आकाराची चाके, लहान त्रिज्येत ट्रॅक्टर वळविता येण्यासाठी पुढील बाजूस इंजिन, वजनाची समान विभागणी आदी या वाहनाची वैशिष्टय़े असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. तर फार्मट्रॅक हा ट्रॅक्टर तरूण शेतकरी वर्गासाठी असून तो ४५, ५० आणि ६० एचपी अशा तीन प्रकारांत उपलब्ध होणार आहे.
ट्रॅक्टरचे स्वरूप आकर्षक बनविण्यासाठी त्यात डिजिटल वेगमापक, एलइडी हेड लँप्स, सस्पेंडेड क्लच आणि ब्रेक पेंडल्स आदी सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.