वाजपेयी सरकारच्या काळात भारतीय आयुर्विमा मंडळ (एलआयसी)ने सुरू केलेली ‘वरिष्ठ पेन्शन विमा योजना (व्हीपीबीवाय)’ नव्या रूपात सादर होत असून, शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या योजनेचे रीतसर उद्घाटन करणार आहेत.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात, वरिष्ठ पेन्शन योजना नव्या रूपात सादर केली जाण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मूर्तरूप मिळालेली ही योजना ‘एलआयसी’मार्फत राबविली जाणार आहे.
ही केंद्र सरकारने प्रायोजित केलेली योजना असून, एलआयसी तिची निधी व्यवस्थापक आहे. एलआयसी या योजनेतून उभा राहिलेला निधी रोख्यांमध्ये गुंतवून तत्कालीन दराने परतावा मिळवेल आणि गुंतवणूकदारांना ९ टक्के या निश्चित व्याज पेन्शनरूपात देईल. गुंतवणूकदारांना ९ टक्के व्याज देण्यासाठी एलआयसीला जर काही रक्कम कमी पडत असेल तर केंद्र सरकारकडून त्या रकमेची भरपाई केली जाणार आहे.
 पात्रता :
*वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले भारतीय ज्येष्ठ नागरिक
करदायित्व:
*योजनेतून मिळविलेले उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त असेल.
केव्हा व कुठे?
*१५ ऑगस्ट २०१४ ते १४ ऑगस्ट २०१५ या दरम्यान ही योजना गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे.
*योजनेचे अर्ज एलआयसीच्या कार्यालयात तसेच वेबस्थळावर उपलब्ध होतील.
योजनेचे फायदे :
*द.सा.द.शे. ९ टक्के दराने परताव्याची हमी
*संपूर्ण हयातभर गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न ‘पेन्शन’ स्वरूपात मिळेल.
*मासिक, त्रमासिक, अर्धवार्षिक अथवा वार्षिक यापैकी निवड केलेल्या कोणत्याही पर्यायातून ते मिळविता येईल.
*पेन्शनरच्या मृत्युपश्चात त्याने भरलेली रक्कम नामनिर्देशित वारसाला प्रदान केली जाईल.
पेन्शन रक्कम :
*या योजनेत किमान ६६,६६५ रुपये ते कमाल ६,६६,६६५ रुपये या रकमेदरम्यान एकरकमी व एकदाच गुंतवणूक करता येईल.
*या गुंतवणुकीतून अनुक्रमे ५०० रु. दरमहा आणि ५,००० रु. दरमहा पेन्शन मिळविता येईल.
*योजनेत कमाल दरमहा ५,००० रुपये पेन्शन मिळू शकेल
*ही कमाल मर्यादा व्यक्तिगत नव्हे तर कुटुंबाला लागू आहे.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान