विमा क्षेत्राला ब्रोकर्सची गरज लागते; कारण मध्यस्थ हा ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतो. ग्राहकांच्या गरजा जाणून घेऊन त्याला उपलब्ध उत्पादनांमधून नेमके कुठले उत्पादन त्याच्या गरजांची पूर्ती करू शकेल हे सांगणाऱ्या मध्यस्थाची गरज असते. सांगताहेत.. महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्सचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप देव्हारे.

महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्सचा नेमका काय व्यवसाय आहे? आणि विमा क्षेत्रात मध्यस्थांची गरज का भासावी?

विमा उद्योगाच्या नियामकाने भारतात तीन प्रकारच्या विमा ब्रोकर्सना परवानगी दिली आहे. पहिला थेट विमा ब्रोकर. या प्रकारचे ब्रोकर्स हे ग्राहकांना थेट विमा उत्पादने विकू शकतात. दुसरा रिइन्शुरन्स ब्रोकर्स. या प्रकारचे ब्रोकर्स विमा कंपन्यांना त्यांच्या जोखमीचे व्यवस्थापन करायला मदत करतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे कंपोझिट इन्शुरन्स ब्रोकर्स. या प्रकारचे ब्रोकर्स विमा उत्पादने विकण्यासोबत रिइन्शुरन्सच्या व्यवसायसुद्धा करू शकतात. महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स हे कंपोझिट ब्रोकर्स या प्रकारचे ब्रोकर्स आहेत. विमा क्षेत्राला ब्रोकर्सची गरज लागते; कारण मध्यस्थ हा ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असतो. ग्राहकांच्या गरजा जाणून घेऊन त्याला उपलब्ध उत्पादनांमधून नेमके कुठले उत्पादन त्याच्या गरजांची पूर्ती करू शकेल हे सांगणाऱ्या मध्यस्थाची गरज असते. ही भूमिका मध्यस्थ बजावत असल्याने विमा क्षेत्रालासुद्धा ब्रोकरची गरज भासते.

महिंद्रा उद्योग समूह विमा क्षेत्रात उतरण्याचे कारण काय?

महिंद्रा उद्योग समूह देशातील प्रमुख वाहने आणि ट्रॅक्टर उत्पादक आहे. ही वाहने आणि ट्रॅक्टर कर्ज काढून खरेदी केली जातात. महिंद्रा इन्शुरन्सचे ‘आरोग्यं धन संपदा’ हे ब्रीद्वाक्य आहे.

महिद्रा कर्जदाराचा आरोग्य विमा कर्जदाराच्या आयुर्विमा आणि संपत्तीची निर्मिती होण्यासाठी मालमत्तेचा विमा अशी त्रिसूत्री आहे. एक कर्जपुरवठादार कर्जदाराचे आरोग्य त्याचे जीवन आणि सुस्थितीतील मालमत्ता हे महत्वाचे आहे. या भूमिकेतून  तारण असलेल्या मालमत्ता ज्याच्या नावावर आहे त्याचा आरोग्य विमा, वाहन ज्याच्या मालकीचे आहे त्याचा जीवन विमा आणि कर्ज दिलेल्या वाहनाचा विमा आम्ही देत होतो. ही सेवा देण्यातील मर्यादा लक्षात आल्यामुळे महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्सची स्थापना केली.

व्यवसाय अधिकतर ग्रामीण भागाशी संबंधित आहे..

महिंद्रा फायनान्सची सुरुवात झाल्यानंतर साधारण २००४ साली आम्ही या व्यवसायात येण्याचा विचार करत होतो. दरम्यानच्या काळात विमा नियंत्रकांची आमचा संवाद होत असे. या संवादा दरम्यान नियंत्रकांनी आम्हाला सुचविले की,  शहरी भागात विम्याची गरज असल्याची जाणीव व सहज उपलब्धता आहे. परंतु ग्रामीण भारतात चित्र काहीसे वेगळे आहे. तसेच आमचा ग्राहक वर्ग ग्रामीण भारतातील असल्याने आम्ही आमचा व्यवसाय ग्रामीण भरतात केंद्रित केला आहे.

व्यवसायाचे वैशिष्टय़ काय?

राष्ट्रीय महत्व असलेल्या गोष्टी आम्हालासुद्धा महत्वाच्या आहेत. किंबहुना आमच्या वाटतात. भारताला एक समृद्ध राष्ट्र व्हावयाचे असेल तर ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्ही ग्रामीण भारतातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देतो.

विमा उत्पादने विकण्यासाठी असलेली कौशल्य आम्ही विकसीत करतो. ग्रामीण भारतातील हेच युवक आमची उत्पादने विकतात. त्यासाठी आम्ही शहरातून प्रशिक्षित मनुष्यबळ पाठवत नाही.

ग्रामीण भारतातील लोकांची Rयशक्ती शहरी नागरिकांच्या मानाने कमी असल्याने आम्ही विम्याचे अनेक नवीन प्रकार विकसित केले. आमच्या असे लक्षात आले की, एखाद्याला विम्याचा १,००० किंवा १,२०० चा हप्ता एकाचवेळी भरणे कठीण होते.

या साठी आम्ही परवडणारा विमा ही संकल्पना विकसित केली. ज्याप्रमाणे ‘डेली रिचार्ज’ सुविधा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे आम्ही हप्ता भर आणि विमा कवच विकत घ्या, या प्रकारचा उत्पादन प्रकार विकसित केला आहे. विम्याच्या हप्ता टप्याटप्याने स्वरूपात भरून विमा कवच मिळविण्याचा पर्याय आम्ही ग्रामीण भागातील विमा इच्छुकांना उपलब्ध करून दिला आहे. अशा अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचे आम्ही जनक आहोत. या कारणांनी जास्तीत जास्त विमा इच्छुकापर्यंत पोहचलो आहोत.

भविष्यातील योजना काय?

आम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भारताची विम्याच्या क्षेत्रातील क्षमता खूप मोठी आहे. आम्ही भारताच्या लोकसंख्येच्या बळावर आमच्या व्यवसाय विस्ताराच्या अनेक योजना आहेत. जगातील आघाडीच्या १०० विमा ब्रोकर्समध्ये आमची गणना व्हावी हे आमचे व्यवसायाचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.