पर्यटनाची हौस भागविताना भारतीय व्यक्ती ठिकाणांबाबत अधिक सजग असतात; त्यासाठीची जय्यत तयारीही ते करतात मात्र प्रवासी विम्याबाबत मात्र ते अगतूक नसतात, असे निरिक्षण पुढे आले आहे.
‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय विरुद्ध देशांतर्गत प्रवासाबाबत विविध १,०६३ जणांच्या केलेल्या सर्वेक्षणात मते नोंदवून घेतली. मुंबई, कोलकता, अहमदाबाद, हैदराबाद व चंडीगड या शहरांसह अनेक छोटय़ा शहरांमधून याबाबत मत जाणून घेण्यात आले.
कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात आढळून आले आहे की, २५ टक्के जणांनी गेल्या तीन ते पाच वर्षांत विदेश वारीची तर अंदाजे ३० टक्क्य़ांनी देशांतर्गत प्रवासाची वारंवारिता वाढवली आहे. ३९ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बिगर मोसम सवलती चालना देणारा घटक ठरल्या. तर अधिक वेळा देशांतर्गत टूर करण्यासाठी ५७ टक्के जणांसाठी अनियोजित सहल हे महत्त्वाचे कारण दिले.
प्रवासाची वारंवारिता वाढल्याने गेल्या तीन ते पाच वर्षांत देशांतर्गत प्रवाशांनी परदेश भ्रमणाच्या तुलनेत (१९ टक्के) देशातच मोठय़ा सुटीचा (२७ टक्के) आनंद घेतला. देशांतर्गत व विदेशी ठिकाणी दीर्घ प्रवासासाठी विनियोग्य उत्पन्नातील वाढ (६३ टक्के) आणि सवलती/डील (४३ टक्के) हे घटक कारणीभूत ठरले. परंपरागत खर्चाच्या मानसिकतेचे प्रतिक म्हणजे अंदाजे ९० टक्के सहभागींनी कर्जापासून लांब राहत व अन्य स्वरूपातील मदत न घेता आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवासासाठी वैयक्तिक बचतीचा वापर केल्याचे मत या सर्वेक्षणाने नोंदविले आहे.   
पाहणीत आढळले की, इंटरनेट वापराच्या बाबतीत भारतीय जगातील तिसऱ्या क्रमांकाचे असले तरीही परदेशी (८५ टक्के) व देशांतर्गत (७८ टक्के) ‘लिजर ट्रिप’साठी तिकीट खरेदी करण्यासाठी कल ‘ट्रॅव्हल एजंट’कडे असतो, असे या सर्वेक्षणानिमित्ताने समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांपकी केवळ ४ टक्के जणांनी त्यांची परदेशी प्रवासाची तिकिटे ‘ऑनलाइन ट्रव्हल पोर्टल’मार्फत खरेदी केली तर २० टक्के देशांतर्गत प्रवाशांनी नोंदणीसाठी ‘ऑनलाइन ट्रव्हल पोर्टल’चा वापर केल्याचे या सर्वेक्षणाने म्हटले आहे.
भारतीय देशांतर्गत प्रवासाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवासविम्याला अधिक महत्त्व दिल्याचे आढळून आले आहे. ‘लिजर ट्रिप’ करत असताना देशांतर्गत प्रवास विम्याच्या (४ टक्के) तुलनेत परदेशी प्रवासविम्याची (३८ टक्के) खरेदी भारतीयांनी अधिक केल्याचे दिसून आले आहे. दोन्ही स्वरूपातील प्रवासासाठी प्रवासविमा योजना घेतली जाण्याची गरज यातून स्पष्ट होते. परदेशी प्रवास विमा खरेदी करण्यामागील मुख्य कारणे वैद्यकीय आणीबाणी व सामान हरवणे याविषयी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
प्रवास विमा खरेदी करत नसलेल्यांपकी ५० टक्के जणांना अन्य योजना घेतली असल्यास ही योजना घेणे आवश्यक नाही, असे वाटते. तर विमाकवच नसलेल्या देशांतर्गत प्रवाशांपकी अंदाजे ६० टक्के जणांनी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवासाचा कालावधी कमी असल्याने योजना घेण्याची गरजच नसल्याने नमूद केले.
भारतीयांचे प्रवासाचे प्रमाण वाढले असले तरी प्रवास विमा खरेदी करण्याची व प्रामुख्याने आशियाई देशांत जाण्यासाठी तसेच देशांतर्गत प्रवासासाठी प्रवास विमा घेण्याचे प्रमाण अतिशय कमी दिसून आले. वैद्यकीय आणीबाणी तसेच सामान हरवण्यासारख्या प्रवासाशी संबंधित दुर्घटना याच्याशी संबंधित माहित नसलेल्या जोखमींना सुरक्षाकवच देण्यासाठी प्रवासविमा घेण्याचे महत्त्व भारतीय प्रवाशांनी जाणणे गरजेचे आहे.
– संजय दत्ता, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स