फंड घराण्याच्या मालमत्तेतील घसरणीचे निमित्त

१३ लाख कोटी रुपयांच्या भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडण्याची तयारी आणखी एक विदेशी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी करत आहे. एलआयसी व नोमुरा यांच्या एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड या संयुक्त मालमता व्यवस्थापन कंपनीतील आपला ३५ टक्के हिस्सा जपानी भागीदार नोमुरा कंपनी विकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

२०१२ मध्ये एलआयसी या देशातील सर्वात मोठय़ा आयुर्वमिा कंपनीकडून ३५ टक्के हिस्सा जपानच्या नोमुराने खरेदी केला होता. या संयुक्त मालमत्ता कंपनीत सर्वाधिक ४५ टक्के हिस्सा एलआयसीचा व २० टक्के हिस्सा एलआयसीची उपकंपनी असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहकर्ज वितरण कंपनीचा, तर ३५ टक्के हिस्सा नोमुराचा आहे.
सप्टेंबरअखेर एलआयसी नोमुरा ११,१५७ कोटीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहत होते. जुल २००९ मध्ये तत्कालीन एलआयसी म्युच्युअल फंडाची मालमत्ता ५१,५०२ कोटी असताना नोमुराने ३५ टक्के हिस्सा ३०८ कोटींना खरेदी केला होता.
जुल २००९ पासून म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता दुप्पट होऊनही या फंड घराण्याच्या मालमत्तेत मोठी घसरण झाली. हेच नोमुरा संयुक्त कंपनीतून बाहेर पडण्यास कारण ठरल्याची उद्योगात चर्चा आहे.