चिनी मोबाईल फोन निर्माता ओप्पोने भारतातून वाढत असलेली मागणी पाहता, येत्या ऑगस्टपासून देशांतर्गत जुळणी प्रकल्प स्थापित करून पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ओप्पो मोबाईल्स इंडियाचे मुख्याधिकारी टॉम लू यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठ तसेच नजीकच्या देशात निर्यातही करता येईल इतक्या क्षमतेच्या प्रकल्पासाठी चाचपणी कंपनीने सुरू केली आहे. तथापि या संबंधाने गुंतवणूक रक्कम व अन्य तपशील त्यांनी दिला नाही. शिओमी, कूलपॅड आणि जिओनी या हँडसेट्स निर्मात्या विदेशी कंपन्यांनीही भारतातून उत्पादन घेण्याचा मानस अलीकडेच स्पष्ट केला आहे.