एमटी एज्युकेअर लि. या वैविध्यपूर्ण उत्पादने असलेल्या आणि अनेक राज्यांत कार्यरत असलेल्या नामांकित राष्ट्रीय शैक्षणिक कंपनीने, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करता यावे यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणावर लìनग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएस) ही अशा प्रकारची पहिली सुविधा आहे.
रोबोमेट+ यास गेली २७ वष्रे शिकवण्याचा अनुभव असलेल्या हजारो एमटी एज्युकेअर शिक्षकांचे पाठबळ आहे आणि वर्गात शिकवण्याच्या त्यांच्या अनुभवाचा उपयोग रोबोमेट+ मध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती एमटी एज्युकेअरचे अध्यक्ष महेश शेट्टी यांनी दिली.
जागृती करण्याच्या कालावधीत आतापर्यंत, रोबोमेट+ अ‍ॅपने गुगल प्ले स्टोअरवर ५ लाख डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. हजारो विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अमिताभ बच्चन यांनी एमटी एज्युकेअरच्या रोबोमेट+चे मुंबईत अनावरण केले.