गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी मालमत्ता विक्रीत सहारा समूहाला कोणताही रस दिसत नाही, असा आक्षेप सेबीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नोंदविला. समूहाच्या विदेशातील तीन हॉटेल मालमत्ता विकण्याचे त्वरित आदेश द्यावे, असे आर्जवही तिने यावेळी केले. गुंतवणूकदारांचे पैसे परस्पर अन्य योजनांमध्ये वळविल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रता रॉय हे मार्चपासून नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात अटकेत आहेत. त्यांच्या जामीनासाठी १० हजार कोटी रुपये भरण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी विदेशातील मालमत्ता विकण्यास परवानगीदेखील देण्यात आली. मात्र सहारा समूह मालमत्ता विकण्यासाठी फारसा पुढाकार घेताना दिसत नाही, असे प्राप्त तक्रारींचा हवाला देत आढळून आले असल्याचे सेबीने म्हटले आहे.
हार्ले डेव्हिडसनच्या तीन नवीन प्रस्तुती
हार्ले डेव्हिडसनच्या तीन नव्या दुचाकींचे अनावरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप प्रकाश यांनी गुरुवारी मुंबईत केले. ब्रेकआऊट, स्ट्रीट ग्लाइड स्पेशल व सीव्हीओ या नावाच्या या महागडय़ा व वजनदार मोटरसायकलची किंमत अनुक्रमे १६.२८, २९.७० व ४९.२४ लाख रुपये आहे.