भविष्यातील अद्भुत तंत्रज्ञानाचा अवलंब करून वातानुकूलन यंत्रांच्या बाजारपेठेत नव्या प्रवाहाची रुजुवात करण्यात अग्रेसर ठरलेल्या व्हिडीओकॉनने ‘आर्यबॉट’ हे नवीन यंत्र बाजारात आणून आपला लौकिक कायम ठेवला आहे. जगातील हे पहिले सॅटेलाइट एसी उपकरण असल्याचा कंपनीचा दावा असून, ते कोणत्याही अँड्रॉइड अथवा आयओएस प्रणालीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी संधान जोडू शकते. मशीन टू मशीन संधान आणि इंटरनेट ऑफ थिंग्जशी निगडित उपकरणांच्या भारतीय बाजारपेठेत ‘आर्यबॉट’ मानाचे स्थान कमावेल, असा विश्वास व्हिडीओकॉनचे तंत्रज्ञान व नावीन्यता विभागाचे प्रमुख अक्षय धूत यांनी सांगितले. नव्या उपकरणामुळे व्हिडीओकॉनने आर्थिक वर्ष २०१६ अखेर एसी बाजारपेठेचा १५ टक्के हिस्सा कमावणे अपेक्षित आहे, असे कंपनीच्या एसी विभागाचे मुख्य परिचालन अधिकारी संजीव बक्षी यांनी सांगितले.