मागील अभ्यास वर्गामध्ये कॉल व पुट याबद्दल माहिती घेतली. आजच्या अभ्यास वर्गामध्ये विकल्प खरेदी करणारे म्हणजे कॉल व पुट खरेदी करणारे व विकल्प विकणारे यांच्यातील फरक जाणून घेऊ.
मर्यादीत तोटा व अमर्याद नफा (Limited Loss, Unlimited Profit): ऑप्शन्स विकत घेणाऱ्यांसाठी लिमिटेड तोटा व अनलिमिटेड नफा असतो त्याचप्रमाणे ऑप्शन्स विकणाऱ्याला लिमिटेड नफा व अनलिमिटेड तोटा असतो. ऑप्शन्स विकत घेणारा अधिमूल्य (प्रिमिअम) देऊन अधिकार घेतो पण जबाबदारी नाही व ऑप्शन्स विकणारा अधिमूल्य (प्रिमिअम) स्वीकारतो व जबाबदारीही घेतो. विविध पर्यायामध्ये लागणारी गुंतवणूक व त्यावर मिळत असलेल्या नफ्याची टक्केवारी खालील उदाहरणावरून कळेल.
वरील उदाहरवरून असे लक्षात येईल की ऑप्शन्समध्ये नफ्याची टक्केवारी इतर प्रकारांपेक्षा खूप जास्त आहे. जर निर्णय चुकला असता तर ऑप्शन्स खरेदीदाराला जास्तीत जास्त ९५०० रुपयांचे नुकसान झाले असते परंतु फ्युचर्स वा इक्विटी (शेअर्स) खरेदीदारास ऑप्शन्सच्या मानाने जास्त नुकसान झाले असते.
आतापर्यंत आपणास हे लक्षात आले असेल की ऑप्शन्समध्ये सहभागी होणारे चार घटक म्हणजे
१) कॉल खरेदी करणारे  २) पुट खरेदी करणारे  ३) कॉल विक्री करणारे ४) पुट विक्री करणारे यांच्या सोबतच विविध डावपेचांसाठी  ५) फ्युचर्स  विकणारे आणि ६) फ्युचर्स विकत घेणारे असे एकंदरीत सहा अंग विविध डावपेचांसाठी वापरण्यात येतात. मागील लेखामध्ये आपण कॉल खरेदीदाराचा नफा तोटा तक्ता कसा असतो हे सविस्तर उदाहरणासह बघितले आहे. इतर अंगांचा नफा तोटा तक्ता खालील प्रमाणे असेल.
ऑप्शन्सबाबतच्या काही संकल्पना समजून घेऊ.
 स्ट्राईक भाव (strike price): ऑप्शन्स करार हे वेगवेगळ्या भावांचे असतात त्या भावांना स्ट्राईक भाव (strike price) असे म्हणतात उदा. एसबीआयचा स्पॉट भाव ३१८ आहे पण ऑप्शन्स करार रुपये ३०५, ३१०, ३१५, ३२०, ३२५, ३३० इत्यादी.
 मनीनेस: जे कॉल ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा कमी भावाचे असतात त्यांना इन द मनी (In the money) व खूप कमी भावाचे स्ट्राईक असल्यास डीप इन द मनी- DEEP ITM म्हणतात व जे कॉल ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा जास्त भावाचे असतात त्यांना आऊट ऑफ द मनी (Out of the Money) असे म्हणतात. व खूप जास्त भावाचे असतात त्यांना डीप आऊट ऑफ द मनी (Deep OTM) म्हणतात.
तसेच जे पुट ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा जास्त भावाचे असतात त्यांना इन द मनी (In The money) व खूप जास्त भावाचे असतात त्यांना डीप इन द मनी (DEEP ITM) म्हणतात जे पुट ऑप्शन्स स्पॉट भावापेक्षा कमी भावाचे असतात त्यांना आऊट ऑफ द मनी (Out of the Money) व खूप कमी भावाचे स्ट्राईक असल्यास डीप आऊट ऑफ द मनी (Deep OTM) असे म्हणतात.
स्पॉट भावाच्या जवळपास असणाऱ्या कॉल वा पुटच्या स्ट्राईक भावांना अ‍ॅट द मनी (At the money) असे म्हणतात.
 प्रिमिअम: ऑप्शन्सच्या प्रिमिअममध्ये दोन गोष्टी अंतर्भूत असतात
 १. अंतर्भूत किंमत (Intrinsic Value): स्ट्राईक भाव व स्पॉट भावामधला फरक.
केवळ इन द मनी (n The money) लाच अंतर्भूत किंमत असते. तसेच Time Value  ही असते.
२.    बाह्यभूत किंमत (Extrinsic Value / Time Value): प्रिमिअम वजा इन्ट्रेन्सिक व्हॅल्यू.
उदा. एसबीआयचा स्पॉट भाव ३१८ आहे. प ण कॉल ऑप्शन्स स्ट्राईक रुपये ३१० व याचा भाव (Premium) १४  रुपये आहे, म्हणजे अंतर्भूत किंमत ८ (३१८ – ३१०) व बाह्यभूत किंमत ६ (१४ वजा ८) आहे.
बाह्यभूत किंमत (Extrinsic Value / Time Value): आऊट ऑफ द मनी (OTM) किंवा अ‍ॅट द मनी (ATM)  ऑप्शन्स ना फक्त टाईम व्हॅल्यू असते. स्ट्राईक अ‍ॅट द मनी (At the money)  असल्यास सर्वात जास्त बाह्यभूत किंमत असते व त्या खालोखाल इन द मनी (In The money*) ऑप्शन्सना व सर्वात कमी आऊट ऑफ द मनी (OTM) ऑप्शन्सना असते त्याचप्रमाणे एक्सपायरी जेवढे दिवस दूर असते तेवढी जास्त बाह्यभूत किंमत असते व एक्सपायरीला सर्व ऑप्शन्सची बाह्यभूत किंमत शून्य होत असते.
तिथी ऱ्हास (Time Decay): एक्सपायरीला टाईम व्हॅल्यू शून्य होत असते. तसेच प्रत्येक दिवसागणिक ऑप्शन्सची किंमत कमी कमी होत असते या संकल्पनेला तिथी ऱ्हास (टाईम डीके) असे म्हणतात. व एक्सपायरी जसजशी जवळ येईल तसतसे टाईम डीके वाढत असते, म्हणजे सुरुवातीला जर दिवसागणिक रु. ०.३७२ कमी कमी होत असते तर शेवटी शेवटी ऑप्शन्सच्या किमतीचा ऱ्हास खूप वाढलेला असून रु. ०.६० असू शकतो म्हणेच प्रत्येक दिवसागणिक एसबीआयचा ३१० च्या कॉलचा भाव १४ रु. असताना प्रथम आठवड्यात रु ०.३७ प्रमाणे कमी होत होता. परंतु शेवटच्या आठवड्यात ऱ्हास वाढून ऑप्शन्सची किंमत रुपये ०.६०ने कमी होत होती.
(पुढील अभ्यास वर्गामध्ये आपण विकल्पांची संवेदनशीलता – ग्रीक्स व ऑप्शन्सच्या भावावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करू या.)
primeaocm@yahoo.com

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!