av-02
समभाग गुंतवणुकीतील आíथक आवर्तने अनेकांच्या परिचयाची असतील. परंतु व्याजदराची आवर्तने सर्वानाच परिचित असतीलच असे नाही. २००४ पासून सुरु झालेल्या व्याजदर वाढीने एक आवर्तन पूर्ण केले असून व्याजदर कमी होण्यास सुरवात झाली आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा स्थिर उत्पन्न गुंतवणूक करण्याचा हा आदर्श काळ समाजाला जातो. या कारणाने जानेवारी २०१५ पासून या स्तंभातून शिफारस करत असलेला स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक करणारा हा चौथा म्युच्युअल फंड आहे. जे गुंतवणुकदार बँकांच्या ठेवींमध्ये किंवा कंपनी ठेवींमध्ये व्याजाची पुर्गुतवणूक करणाऱ्या (Cumulative) प्रकारच्या ठेवीत गुंतवणूक करीत आहेत अशा गुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय आहे. कमी होत असलेल्या व्याजदरामुळे अनेक ठेवीदार दीर्घ मुदतीच्या ठेवी करीत आहेत.
२७ फेब्रुवारी २०१५ च्या गुंतवणूक तपशिलाप्रमाणे या फंडाची मालमत्ता ४६८ कोटी होती. फंडाच्या एकूण गुंतवणुकीच्या ९३.८ टक्के गुंतवणूक ही केंद्र
सरकारच्या रोख्यात आहेत, ज्यांची पत सर्वोच्च समजली जाते. ४.३७ टक्के पॉवर फायनान्स कंपनी या केंद्र सरकारच्या मालकीच्या व AAA
(ट्रिपल ए) उच्च पत निर्धारण केलेल्या रोख्यात आहे. फंडाची रोकड सुलभता राखण्यासाठी १.८३ टक्के गुंतवणूक Collateralized Borrowing
and Lending Obligation (CBLO) मध्ये आहे. २७ फेब्रुवारी २०१५ च्या गुंतवणुकीच्या तपशिलाप्रमाणे गुंतवणूक केलेल्या रोख्यांची सरासरी मुदत १२.२८ वष्रे व ‘मॉडिफाईड डय़ुरेशन’ ७.४६ वष्रे असून पोर्टफोलिओच्या परताव्याचा दर ७.७४ टक्के आहे. याचा अर्थ ‘मॉडिफाईड डय़ुरेशन’ ७.४६ वष्रे म्हणजे मर्यादित जोखीम स्वीकारून ही एक वष्रे, तीन वष्रे व पाच वष्रे या कालावधीत परताव्याच्या दारात हा फंड आपल्या इतर स्पर्धकांपेक्षा अव्वल ठरल्याचे वरील कोष्टकावरून ध्यानात येते. या कारणास्तव या फंडाची शिफारस तीन वष्रे मुदतीच्या (‘डबल इंडेक्सेशन’ मिळण्याची काल मर्यादा) कालावधीसाठी करण्यात येत आहे. १६ मार्च रोजी शिफारस केलेल्या ‘एलआयसी नोमुरा इक्विटी फंड’ खरेदी करण्यासाठी EQUITY  हा एसएमएस पाठविण्यासाठी दिलेला क्रमांक ९९३०७१८५५५ असा वाचावा.
mutualfund.arthvruttant@gmail.com
av-03