abhyas-vargमागील अभ्यास वर्गामध्ये आपण शॉर्ट स्ट्रॅडल (short Straddle) व शॉर्ट स्ट्रॅन्गल (short strangle) हे डावपेच कसे वापरावेत हे शिकलो. मुख्य म्हणजे अस्थिरता अंत म्हणजे काय हे शिकलो. निर्णय लागून संभ्रमता नष्ट होत असल्यास काय करावे इत्यादी डावपेचांचा आपण अभ्यास केला.  
आज आपण ‘लाँग बटरफ्लाय’ शिकू या.
दिशा – तटस्थ (Neutral)-  म्हणजे मला बाजार वर जाईल की खाली जाईल हे नक्की सांगता येत नाही.
अस्थिरता (Volatility)- मंदीची आपण अशी अपेक्षा करतो की, बाजार एकत्रीकरण (consolidation) मध्ये किंवा एका ठरावीक पातळीत वर खाली (rangebound) राहणार आहे आणि ध्वनित अस्थिरता ((Implied Volatility) ही बटरफ्लाय खरेदी करण्यासाठी आदर्श परिस्थिती आहे. पण अस्थिरता आता कमी होणार आहे व तिथी ऱ्हासचा जास्तीत जास्त फायदा आपण घ्यायचा आहे.  
av-01
लॉंग स्ट्रॅडल किंवा लॉंग स्ट्रॅन्गल विकत घेतल्याने होणारा दोन्ही बाजूंचा अधिमूल्याचा (प्रीमियम) खर्च व दर दिवशी त्या विकल्पामध्ये होणारा ऱ्हास हे सर्वात मुख्य अमर्याद तोटय़ाची परिस्थिती निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे शॉर्ट स्ट्रॅडल व शॉर्ट स्ट्रॅन्गल डावपेचांमध्ये बाजार एका बाजूने म्हणजे अचानक तेजी अथवा मंदी आली तर, अमर्याद तोटय़ाची परिस्थिती निर्माण होते, हे आपण टाळू शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे त्या करिता वापरात येणारा डावपेच म्हणजेच लॉंग बटरफ्लाय (long butterfly) होय.
केव्हा वापरावे: आपणास हे माहित आहे की, मनीनेसनुसार विकल्पावर डेल्टा, वेगा, थीटाचा वेगवेगळा परिणाम होत असतो. एटीएम कॉल्स किवा पुटमध्ये सर्वात जास्त थीटा म्हणजे तिथी ऱ्हास असते. नेमका याच गोष्टीचा उपयोग करून कमाई करता येऊ शकते.
महत्त्वाचे निर्णय लागताक्षणी जेव्हा संभ्रमावस्था प्रचंड असल्यामुळे कॉल व पुटचे भाव प्रचंड वाढलेले असतात आणि आता निकाल लागल्यामुळे ती संभ्रमता संपणार असून ध्वनित अस्थिरता (Implied Volatility) कमी होऊन विकल्पांचे भाव कमी होणार आहेत. परंतु त्या परिणामी बाजार / शेअर वर जाईल कीखाली जाईल हे समजत नसते अशावेळी सदर डावपेच वापरावेत. किंवा बाजार / शेअर एका विशिष्ट पातळीत (rangebound) सुदृढीकरणात (Consolidation) जाणार असे वाटल्यास सदर डावपेच वापरावेत. ए टी एम (ATM) कॉल किंवा पुट हे विकल्प आपण विकतो , व हे केव्हा विकतो तर जेव्हा एखादी मोठी घटना जसे निवडणुका, न्यायालयाचा निर्णय, कंपनीचे वित्तीय निकाल इत्यादी होऊन गेलेले असता किंवा निकाल लागत असतासमयी विकतो. महत्वाची घटना झाली असल्याने बाजारात / शेअरमध्ये संभ्रम व अनिश्चितता तात्काळ कमी व्हायला लागेल व त्यामुळे कॉल व पुटचे अधिमूल्य कमी होईल. त्यामुळे आपल्याला फायदा होतो.
परंतु बाजार / शेअर जर मोठ्या प्रमाणात वर किंवा खाली गेल्यास विक्री केलेल्या कॉल किवा पुटचा तोटा अमर्याद राहणार आहे. ते टाळण्यासाठी किंवा केवळ अमर्याद तोटा होऊ नये व सुरक्षा उपाय म्हणून ए टी एम च्या आजूबाजूचे कॉल किंवा जर पुटचा बटरफ्लाय करायचा असल्यास पुट्स विकत घ्यावा, त्यावेळी त्यांचा थीटा कमी असल्याने खूप तोटा संभवत नाही. बटरफ्लाय मध्ये शॉर्ट स्ट्रॅडल (short Straddle) व शॉर्ट स्ट्रॅन्गल (short strangle) पेक्षा खूप कमी आíथक धोका आहे.
आपणास हे लक्षात आले असेल की लॉंग बटरफ्लायमध्ये आपण एकीकडे कॉलचा बुल स्प्रेड घेतो व त्याचवेळी दुसरीकडे कॉलचा बेअर स्प्रेड घेतो. कोणत्या तरी एका स्प्रेडमध्ये तुम्हाला नफा होणारच आहे.
काय करावे?  
१) बाजार भावाजवळचे दोन कॉल विकावे व एक ओटीएम व एक आयटीएम कॉल विकत घ्यावा (आयटीएम कॉल जरी महाग वाटत असला तरी त्यात अंतर्भूत किंमत (Intrinsic Value) जास्त असते व बाह्यभूत किंमत (extrinsic Value) फार कमी असते त्यामुळे काळजीचे कारण नाही.)       
२) बाजार भावाजवळचे दोन पुट्स विकावे व एक ओटीएम व एक आयटीएम पुट्स विकत घ्यावा.
खर्च: निव्वळ खर्च अत्यल्प. यामध्ये मर्यादित नफा व मर्यादित तोटा अभिप्रेत आहे.  
तोटा: मर्यादित जास्तीत तोटा झ्र् विकल्प विक्री करून मिळालेले प्रीमियम वजा खरेदीसाठी लागलेले प्रीमियम,
नफा: मर्यादित, विकलेल्या कॉल्स व खरेदी केलेले कॉल्सच्या स्ट्राईकमधला फरक वजा एकंदर खर्च व जास्तीत जास्त नफा – शेअर्स जर विकलेल्या स्ट्राईक जवळ बंद होत असता.
नफा तोट्याचे गणित कसे राहील हे समजण्यासाठी अगोदर झालेले अभ्यासवर्ग वाचावेत.
बाहेर केव्हा पडावे?
जेवढे दिवस बाजार दृढीकरणात (Consolidation) राहील तेवढा नफा होईल, तेवढा नफा घेऊन बाहेर पडावे. किंवा अगोदरच ठरवलेला तोटा वा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
या डावपेचाचे खालील फायदे आहेत:
खरेदी करताना द्यावा लागणारा प्रीमियम व विकलेल्या विकल्पच्या मिळालेल्या प्रीमियममुळे एकंदरीत खर्च कमी होतो. खरेदी व विक्री केलेल्या विकल्पासाठी ग्रीक्स जसे डेल्टा, वेगा, थीटाचा परिणाम परस्पर विरोधी असल्याने एकंदरीत परिणाम नगण्य होतो. बाजारातल्या मोठ्या लोकांना तुम्हाला व्यवहारामधून बाहेर पाडणे शक्य होत नाही.
उदाहरणार्थ :
मी १५ मे २०१५ रोजी एशियन पेंट हा शेअर विचारात घेतो. कारण एशियन पेंटचा तिमाही निकाल १८ मे रोजी जाहीर होणार आहे. निकाल कसा राहील हे मला माहित नाही व निकालाच्या परिणामाला बाजार कसा प्रतिसाद देईल हेही मला ठरविता येत नाही, त्यामुळे माझा अंदाज तटस्थ (Neutral) आहे. पण १८ मे रोजी निकाल लागताक्षणी संभ्रमता संपुष्टात येईल, हे नक्की. म्हणून मी डेल्टा, थीटा, गॅमा, वेगा इत्यादीचा अभ्यास केला आणि लाँग बटरफ्लाय डावपेच वापरून पाहिला.  
(विशेष सूचना : लेखातील चालू बाजारातील शेअरचे उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)
 info@primetechnicals.com