majha-portfolio32बेयिरग उत्पादनात जगातील अव्वल स्थानावर असलेल्या एसकेएफ समूहाची एसकेएफ इंडिया ही भारतातील उप कंपनी (subsidiary)१९६१ मध्ये स्थापन झाली. देशांतर्गत बाजारात २७% हिस्सा असलेली ही कंपनी भारतातही आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापकी ४७% उत्पन्न औद्योगिक क्षेत्रातून तर ५३% उत्पन्न वाहन क्षेत्रातून आहे. वाहन क्षेत्रात दुचाकी आणि चार चाकी या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी उत्पादन करणाऱ्या एसकेएफच्या सर्वच प्रमुख वाहन कंपन्या av-05ग्राहक आहेत. याखेरीज औद्योगिक क्षेत्रातही सर्वच म्हणजे स्टील, खाण उद्योग, ऊर्जा, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील कंपन्यांनाही एसकेएफ आपली उत्पादने पुरवते. कंपनीची पुणे, बंगळुरू आणि हरिद्वार येथे उत्पादन केंद्रे आहेत. येत्या दोन वर्षांत वाहन आणि इतर औद्योगिक क्षेत्रातील मरगळ नाहीशी होईल, अशी अपेक्षा आहे. गुणवत्ता, वाढीव उत्पादन क्षमता, आयात, पर्यायी उत्पादने आणि अर्थात उद्योग क्षेत्रातील वाढता उत्साह या सर्वाचा एकत्रित सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांतील या बहुराष्ट्रीय कंपनीतील घडामोडी पाहता ‘ओपन ऑफर’द्वारे कंपनी शेअरचे अधिमूल्याने ‘बाय बॅक’देखील करू शकेल. सध्या मिड कॅप शेअर थोडे महाग वाटत असले तरीही एसकेएफसारखे शेअर मध्यम कालावधीत फायदा मिळवून देऊ शकतात.