मेष
ओम अदभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

वृषभ
ओम आदि गुरवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ओम राम दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – नारंगी

कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

सिंह
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

कन्या
श्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – निळा

तुळ
दत्त मंदिरात निशिगंधाची फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयाचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक
दत्त मंदिरात पांढऱ्या पदार्थांचे अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पिवळा

धनु
श्री भानवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम अतिद्रैयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

कुंभ
ओम राहवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- नारंगी

मीन
दत्त महाराजांचा मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नये.
आजचा रंग – गडद लाल

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu