15दो स्तांनो, तुम्हाला माहीतच असेल की पूर्वी युरोपात संख्या लिहिण्यासाठी रोमन कॅपिटल अक्षरांचा वापर होत असे. उदाहरणार्थ
I = 1, V =5 , x= 10 इत्यादी.  ही अक्षरे विशिष्ट पद्धतीने एकमेकांशेजारी लिहून निरनिराळ्या संख्या बनविता येतात. घडय़ाळांवरील आकडे किंवा काही पाठय़पुस्तकांवर इयत्ता दाखवण्यासाठी रोमन अंकांचा वापर केलेला तुम्ही पाहिला असेल.

रोमन संख्यांमध्ये दशमान पद्धतीचा वापर केला जात नाही. तसेच रोमन संख्या पद्धतीमध्ये शून्याला स्थान नाही. रोमन संख्या लिहिण्याची एक पद्धत आहे. त्यासाठीचे असलेले नियम समजून घेतल्यास या संख्या सहजपणे लिहिता येतात. जसे की-
० I आणि X ही अक्षरे सलग तीनपेक्षा जास्त वेळा वापरता येत नाहीत. तर  V हे अक्षर सलग दोन वेळा वापरता येत नाही.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

० I   किंवा V  ही अक्षरे मोठय़ा संख्येच्या अक्षराच्या उजवीकडे लिहिले असल्यास I   किंवा v ची किंमत मोठय़ा संख्येच्या किमतीत मिळवली जाते. उदाहरणार्थ श्क =  10 + 5 + 1 = 16

० जेव्हा I  हे अक्षर V  किंवा  X च्या डावीकडे लिहिलेले असते तेव्हा क ची किंमत श् किंवा  च्या किमतीतून वजा केली जाते. परंतु I  हे अक्षर एकापेक्षा जास्त वेळा V   किंवा  Xच्या आधी वापरता येत नाही. उदाहरणार्थ, ८ ही संख्या रोमन अंकात IIX  ऐवजी VIII अशा प्रकारे लिहिली जाते.

अशा प्रकारचे नियम अतिशय सोप्या शब्दात htm या लिंकवर वाचायला मिळू शकतात. हे नियम येथे उदाहरणासहित समजावून सांगितले आहेत. http://www.roman-numerals.org/ या साइटवर नियमांबरोबरच लहान संख्येपासून मोठय़ा संख्यांपर्यंतच्या रोमन अंकावरील विविध खेळ, प्रश्नमंजूषा उपलब्ध आहेत. तसेच प्रिंट करून घेण्यासाठी वर्कशीट्सदेखील उपलब्ध आहेत.
या साइटच्या माध्यमातून रोमन अंक शिकल्यावर विविध ठिकाणच्या जुन्या वास्तूंवरील बांधकामाचे रोमन अंकात असलेले साल तुम्हाला वाचता येईल, याची आम्हाला खात्री आहे.
manaliranade84@gmail.com