0013अबिराचा रंग
भक्तांचा संग
कमरेवर हात
संतांची साथ
उभा विटेवरी
चंद्रभागे तीरी
विठ्ठल

कधी जमिनीवर असतो
तर कधी पाण्यात वसतो
चारी बाजूला माझ्या तटबंद
बुरुजावरून करतात टेहळणी
डोंगर माझे मुख्य वसतीस्थान
शिवरायांमुळे मला जगती मान
किल्ला

पर्यावरणाची काळजी घेत
काहीही न खाता-पिता पळते
सहजपणे कोणालाही परवडते
एक, दोन किंवा तीन
चाकांची असते
सायकल

कोंबडा आरवताक्षणी
सुरू होतात माझी गाणी
मोरपिसाचा मुकुट डोक्यावरी
हाती चिपळ्या नि एकतारी
भिक्षा मागतो घरोघरी
वाणी माझी असते खरी
वासुदेव

ज्योती कपिले – jyotikapile@gmail.com